Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

लातूर प्रतिनिधी वार

शनिवार, 6 जुन 2026.
अधिक जेष्ठ कृष्ण षष्ठी

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

आज सकाळी 10 पर्यन्त चांगला दिवस आहे .
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर/संध्याकाळी 7:04 नंतर कुंभ

6 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
. तुम्ही जन्मतः कलाकार व कलाप्रिय आहात .तुमच्या कलेचा तुम्ही धूर्तपणे व्यावसायिक उपयोग करतात. तुमच्या सहवास इतरांना सुखावह होतो. तुमच्या अनितीच्या कल्पना निराळे असल्याने तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. सामाजिक रूढी परंपराना तुम्ही फाटा देतात .स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल विश्वास असून स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे कल असतो. तुम्ही संभाषण कलेत प्रवीण असता. जीवनात अधिकार व मान मिळतो .आयुष्य आरामदायक व सुख-लोलूप देण्याकडे कल असतो .सुगंधी द्रव्य व आकर्षक कपडे यांचे तुम्ही शौकीन असता. अनपेक्षित पैसा मिळतो परंतु पैसा साठवण्याची फारशी आवड नसल्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती असते .तुमच्या जवळील कले पासून फारसा आर्थिक फायदा होत नाही हे माहीत असून सुद्धा त्यावर खर्च करता आणि त्याबाबत तुम्हाला पश्चाताप होत नाही. केलेल्या कष्टाचे चीज होते .आरोग्याने सुदृढ असतात. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते पण तिला योग्य ती साथ तुम्ही देता .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी रमता. घरात टापटीप व व्यवस्थितपणे ठेवण्याकडे कल असतो. एक निष्ठावान जबाबदार आई व पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता. बुद्धिमान ,आकर्षक ,कलाप्रिय असलेल्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होता.

शुभ दिवस :- सोमवार ,मंगळवार गुरुवार, शुक्रवार

शुभ रंग :- निळा, गुलाबी

शुभ रत्न :- पाचु,मोती ,हिरा
( रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली आवश्यक तपासून पहा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रिणींनो आज
कामाचा ताण वाढेल पण तुम्ही तो सहज हाताळाल. आर्थिक निर्णयात सावध रहा. संध्याकाळनंतर मन हलके होईल.

♉ वृषभ

मैत्रिणींनो आज
नोकरीत प्रगतीचे संकेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. घरात शांत वातावरण राहील.

♊ मिथुन

मैत्रिणींनो आज
नवीन कल्पना सुचतील पण अंमलबजावणी थोडी थांबवावी. प्रवास किंवा फोनवर महत्त्वाची चर्चा होऊ शकते.

♋ कर्क

मैत्रिणींनो आज
भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. संध्याकाळनंतर मन प्रसन्न होईल.

♌ सिंह

मैत्रिणींनो आज
नातेसंबंधात सुधारणा होईल. जोडीदारासोबत संवाद महत्त्वाचा ठरेल. कामात स्थिरता राहील.

♍ कन्या

मैत्रिणींनो आज
आरोग्य आणि दिनचर्येकडे लक्ष द्या. कामाचा भार वाढू शकतो पण तुम्ही यशस्वी व्हाल.

♎ तुला

मैत्रिणींनो आज
प्रेमात यशस्वी दिवस. सर्जनशील कामात यश मिळेल. मन आनंदी राहील.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. संयम ठेवा.

♐ धनु

मैत्रिणींनो आज
नवीन माहिती मिळेल. लहान प्रवास संभवतो. संवादातून फायदा होईल.

♑ मकर

मैत्रिणींनो आज
आर्थिक स्थैर्याचा दिवस. आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

♒ कुंभ

मैत्रिणींनो आज सकाळचे सत्र आळस भरलेले राहील मात्र
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत—नवीन सुरुवातीसाठी उत्तम वेळ. आत्मविश्वास वाढेल.

♓ मीन

मैत्रिणींनो आज
मानसिक शांतता गरजेची आहे. ध्यान किंवा विश्रांती लाभदायक ठरेल. निर्णय घाईत घेऊ नका. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular