Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.महिलांसाठी ज्योतिष

*बुधवार *17 जून 2025*.निज जेष्ठ शुक्ल तृतीया

राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30

आज शुभ दिवस .
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथून/सकाळी 8:13 नंतर कर्क.
रंभा व्रत

17 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर बुध, शुक्र आणि शनी या ग्रहांचा संमिश्र प्रभाव आहे.
तुमचे ध्येय व महत्त्वकांक्षा मोठ्या असतात. धर्माबद्दल आणि रुढी बद्दल चमत्कारिक कल्पना असतात, ठराविक चाकोरीबद्ध आयुष्य जगणे तुम्हाला पसंत नसते .तुमचे विचार क्रियाशील व विधायक असतात .तुम्ही उत्कृष्ट संघटक असतात .शांतता प्रिय असून लोक कल्याणासाठी काम करतात .गुढ विद्या व हिप्नॉटिझम अशा प्रकारच्या विद्या बद्दल तुम्हाला आकर्षण असते .व्यक्तिमत्व प्रभावी असून धाडसी व स्वाभिमानी असतात. भावनांच्या बाबतीत काहीसे थंड प्रकृतीचे असतात. संशोधन ,ज्ञान याकडे ओढा असतो. तुमच्यात नेतृत्व गाजवण्याची हौस असते .जोरदार प्रयत्न केल्यास सर्व गोष्टी शक्य होतात. स्वतःच्या कल्पनेतून आणि विचारातूनच तुम्हाला यश मिळते .जीवनात बऱ्याच वेळा कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही .शिस्त, गांभीर्य ,दृढ पण ,कर्तव्याची जाणीव ही शनीची वैशिष्ट्ये तुमच्यात आहे. तुम्ही विचारी व स्थीर वृत्तीचे आहात .कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांच्या मनात बरेच गैरसमज असतात .महत्त्वकांशी असून सतत कामात मग्न राहणे प्रिय असते .इतर लोकांच्या मानाने तुम्ही अधिक धोरणी व हुशार असतात. निसर्ग ,सौंदर्य ,,फुले ,संगीत याची आवड असते. कार्यक्षम असून इतरांवर अधिकार गाजवणारे असतात .गरीब व दुबळ्या लोकांबद्दल आदर असतो. व्यक्तिमत्व प्रसन्न असल्याने तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. जन्मतः उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून काम करून घेणे जमते .वेगवेगळ्या क्षेत्रात योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा अधिकार वचक ,जोम तुमच्याकडे भरपूर आहे. पैशाच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक नियोजन करतात. जेव्हा इतर लोकांना तुमच्या मदतीची गरज भासते तेव्हा ते तुमच्याजवळ येतात. तुमच्या दीर्घोळ उद्योगाने तुम्ही इतरांना उदाहरण घालून देता .आयुष्यात प्रत्येक बाबतीत विलंब होतो. त्यामुळे पैसे मिळण्याचे अडचणी येतात .कष्टाच्या मनाने यश फार उशिरा मिळते .तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर आहात . घरातील लोकांना सांभाळून घेण्याचा सतत प्रयत्न करीत असता. घर कामाचा कंटाळा असतो. दुसऱ्याकडून कामे करून घेण्यात कुशल असतात .ऐशारामी जीवनाकडे ओढा असतो. टापटीप, व्यवस्थितपणे याकडे लक्ष पुरवता. अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी उद्भवतात.

शुभ दिवस- बुधवार ,गुरुवार, शुक्रवार

शुभ रंग:- निळा ,जांभळा ,हिरवा राखाडी

शुभ रत्ने:- नीलम, पाचू ,लसण्या(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घेणे)

आजचे राशिभविष्य

मेष

मैत्रिणींनो आज
आज घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. महिलांच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाबतीत एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ

मैत्रिणींनो आज
तुमच्या संवादकौशल्याचा आज मोठा फायदा होईल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. नोकरी किंवा
व्यवसायात नवीन कल्पना यशस्वी ठरू शकतात. प्रवासातून लाभ मिळू शकतो.

मिथुन

मैत्रिणींनो आज
सकाळचा काळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे. आत्मविश्वास वाढेल आणि अनेक कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत शुभ संकेत मिळतील. महिलांना मान-सन्मान मिळू शकतो.

कर्क

मैत्रिणींनो आज
चंद्र राशीप्रवेशामुळे तुमची आकर्षकता आणि सकारात्मकता वाढेल. नवीन संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. आरोग्यही चांगले राहील.

सिंह

मैत्रिणींनो आज
मनातील चिंतेपेक्षा आशावाद अधिक राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कन्या

मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र गुरु युती आहे . मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल. महिलांना सामाजिक क्षेत्रात कौतुक मिळेल मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

तुळ

मैत्रिणींनो आज
करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. घर आणि कामाचा समतोल राखण्यात यश मिळेल. आर्थिक स्थैर्य वाढेल.

वृश्चिक

मैत्रिणींनो आज
भाग्याची उत्तम साथ मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते. महिलांना नवीन संधी प्राप्त होतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

धनु

मैत्रिणींनो आज
आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मानसिक शांतता अनुभवता येईल.

मकर

मैत्रिणींनो आज
वैवाहिक आणि भागीदारीच्या संबंधांसाठी दिवस अनुकूल आहे. गैरसमज दूर होतील. व्यवसायात नवीन करार किंवा संधी मिळू शकते. महिलांच्या निर्णयक्षमतेचा लाभ होईल.

कुंभ

मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. दैनंदिन कामांमध्ये शिस्त ठेवल्यास अपेक्षित परिणाम मिळतील.

मीन

मैत्रिणींनो आज
आजचा दिवस आनंद, प्रेम आणि सर्जनशीलतेने भरलेला राहील. कलाक्षेत्र, लेखन, संगीत किंवा सौंदर्यविषयक कामात यश मिळेल. मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular