लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.वार महिलांसाठी ज्योतिष:
मंगळवार, 16 जुन 2025. निज जेष्ठ शुक्ल द्वितीया
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज चांगला दिवस आहे .
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन
16 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध , नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
विनोदी स्वभाव असून मनाने उदार असतात .प्रकृतीची कुरबुर सतत चालू राहते .वैवाहिक जीवनात काहीतरी न्यूनता जाणवत असते .वरून शांत दिसला आहे तरी मनाने अस्वस्थ असतात ,त्यामुळे राग वाढतो .इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही तुमच्या अधिकाराचा बडे जाव करत नाहीत .वागण्यात सावधगिरी बाळगतात .वरचेवर निराशा अनुभवास येते त्यामुळे अस्वस्थता वाढते. तुम्हाला आरामाची सतत गरज भासते. कामाबाबत अभ्यासू वृत्ती व पद्धतशीरपणा असते. बुद्धिजीवी आयुष्याची आवड असून कष्टाची कामे झेपत नाही. रहस्य कथा, विनोदी चित्रपट याकडे ओढा असतो दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात . इंट्युशन ची देणगी असून बारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात येते. चांगली व यशस्वी मुले होण्याबाबत कमी नशीबवान असतात. तुमच्यात कायम अस्वस्थता असते .सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस अनुभवास येतात .तुम्ही अहंकार जोपासतात तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असून व्यवहारात चांगला उपयोग करतात. ध्येय, महत्त्वाकांक्षा उच्च असतात. परंतु परंपरागत रुढी याच्याबद्दल तिरस्कार असतो. खेळण्याची व प्रवासाची हौस असते. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगणे आवडते .तुम्हाला आळशीपणा अजिबात खपत नाही काही नाही. काही कारणामुळे परदेशाचे संबंध येतात .सामान्य माणसात मिसळणे तुम्हाला कठीण जाते. आपल्या आवडत्या पुस्तकात सोबत तासंतास घालवणे प्रिय असते .स्वतःचे ज्ञान व अधिकार याची जाणीव असते. स्वतःची खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही .व्यापारी वृत्ती असून नृत्यपणा व जलद पणा अनुभवास येतो .मनाने मोकळे असतात. स्वभावाने आनंदी व उत्साही असतात .तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते .तुमच्या आवडीची नोकरी मिळाली तरच जीवनात चांगला पैसा मिळू शकतो व स्थिरता प्राप्त होते. सर्व सुख सोयी उपलब्ध करण्याकडे ओढा असतो. वयाच्या 34 वर्षानंतर आर्थिक स्थैर्य मिळते. पतीने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी तुमची अपेक्षा असते .रूढी परंपरेला चिकटून राहणे आवडत नाही .आलेल्यांचे आदरा तिथ्य करणे ,जेवायला बोलावणे हे मनापासून आवडते .अतिशय अस्वस्थ असून लहान सहान गोष्टींवरून चिडता .विवाहित जीवनातल्या अडीअडचणींना तुम्ही शांतपणे तोंड देता .जे लोक कला प्रेमी, सौंदर्याचे भोक्ते ,टापटीप आवडणारे आहेत अशांबद्दल तुम्हाला अधिक आकर्षण वाटते.
शुभ दिवस :- सोमवार ,बुधवार गुरुवार
शुभ रंग :- पिवळा ,हिरवा .
शुभ रत्न :- पाचु,मोती,पुष्कराज
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रिणींनो आज
आज तुमची बोलण्याची शैली प्रभावी राहील. कुटुंबातील एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल.येणी वसूल होतील. विद्यार्थिनींना अभ्यासात प्रगती दिसेल. प्रवासात काळजी घ्या.
वृषभ
मैत्रिणींनो आज
आर्थिक बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरातील महिलांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात समाधान मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.मोजके बोला.
मिथुन
मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंददायी वातावरण राहील.लक्ष्मी प्राप्ती चे योग.
कर्क
मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. आध्यात्मिक कार्यात मन रमल्याने मानसिक शांतता मिळेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.
सिंह
मैत्रिणींनो आज
मैत्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. महिलांनी स्वतःच्या कौशल्याचा योग्य उपयोग केल्यास लाभ मिळेल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकते.
कन्या
मैत्रिणींनो आज
करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. घर आणि काम यांचा समतोल साधण्यात यश मिळेल. आरोग्याची नियमित काळजी घ्या.
तुळ
मैत्रिणींनो आज
भाग्याची साथ मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा परदेशाशी संबंधित विषयात सकारात्मक घडामोडी होतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
वृश्चिक
मैत्रिणींनो आज
आज संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या.वाहन दुरुस्ती संभवते. नातेसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
धनु
मैत्रिणींनो आज
भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. महिलांना सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.
मकर
मैत्रिणींनो आज
कामाचा ताण वाढू शकतो, पण शिस्त आणि मेहनतीमुळे यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत नियमितता ठेवा. सहकाऱ्यांशी सौम्य वागल्यास कामे सहज पूर्ण होतील.
कुंभ
मैत्रीणींनो आज
सर्जनशील कार्यासाठी दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वातावरणात आनंद राहील. महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल.मैत्र मंडळींच्या गाठीभेटी होतील.दिवस आनंदात पार पडेल.
मीन
मैत्रिणींनो आज
घरगुती कामे आणि कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.वाहनसौख्याचा. मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास लाभ होईल.
श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.