लातूर प्रतिनिधी वार
शुक्रवार, 5 जुन 2026. अधिक जेष्ठ कृष्ण पंचमी/षष्ठी
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
आज उत्तम दिवस आहे .आज जन्मलेल्या बाळाची रास मकर.
5 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
. तुमच्या धूर्तपणा, झटपट पणा व व्यापारी वृत्ती आहे .आतल्या आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात उत्तम उपयोग करतात. उदार व विशाल मनाचे असून दुसऱ्याचा आदर आणि कदर करणाऱ्या असतात. तुम्ही कलाकार कलाप्रिय आहात. व्यक्तिमत्व प्रसन्न असल्याने तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुमच्या मोहक आकर्षक बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे ओढले जातात .समजूतदारपणा असून स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची हौस असते. उच्च प्रतीचे दाग दागिने कपडे सुगंधी द्रव्य याचे आकर्षण असते. समाजात मिसळणे व निरनिराळ्या समारंभात भाग घेणे आवडते. जीवनाकडे तुम्ही संयमाने पाहता मदत करण्याची वृत्ती असते. प्रवासाची खूप आवड असते .पैशाच्या बाबतीत जास्त महत्त्व दिले जाते .आर्थिक स्थैर्य मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असतील .बोलण्यात गोडवा असल्याने पैशाची कधीच कमतरता भासत नाही. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान ठरतात .आरामशीर आयुष्याची आवड असते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता .पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असतात .उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असता.दुसऱ्यांकडून कामे करून घेण्यात वाकबगार असतात.
शुभ दिवस :- बुधवार, शुक्रवार शनिवार
शुभ रंग :- पांढरा, हिरवा .
शुभ रत्न :- पाचु,हिरा(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली तपासून पहा)
आजचे राशिभविष्य
मेष –
मैत्रिणींनो आज
करिअरच्या दृष्टीने सकारात्मक दिवस. वरिष्ठांशी चर्चा लाभदायक ठरेल. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
वृषभ –
मैत्रिणींनो आज
भाग्याची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी मिळू शकतात. मन प्रसन्न राहील.
मिथुन –
मैत्रिणींनो आज
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीसंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
कर्क –
मैत्रिणींनो आज
वैवाहिक जीवनात समंजसपणा आवश्यक राहील. जोडीदारासोबत संवाद वाढवा. सहकार्याने अडचणी दूर होतील.
सिंह –
मैत्रिणींनो आज
कामाचा वेग वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. आरोग्य आणि दिनचर्येवर लक्ष केंद्रित करा.
कन्या –
मैत्रिणींनो आज
सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीचा उत्तम वापर करता येईल. प्रेमसंबंध आणि मुलांशी संबंधित आनंददायक घटना घडू शकतात.
तुळ –
मैत्रिणींनो आज
घरगुती कामे आणि कुटुंबीयांची जबाबदारी वाढेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते.
वृश्चिक –
मैत्रिणींनो आज
संवाद आणि नियोजनामुळे यश मिळेल. भावंडे किंवा जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभदायक ठरेल.
धनु –
मैत्रिणींनो आज
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखल्यास फायदा होईल.
मकर –
मैत्रिणींनो आज
चंद्र राशीत असल्याने इतरांवर प्रभाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
कुंभ –
मैत्रिणींनो आज
मनात काही जुन्या आठवणी किंवा चिंता येऊ शकतात. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यान लाभदायक ठरेल.थकवा जाणवेल.
मीन –
मैत्रिणींनो आज
सवंगड्यांकडून आणि सामाजिक क्षेत्रातून लाभ मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी चांगली संधी मिळू शकते . श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.