Homeईपेपरभांडवलशाही म्हणजे विष वृक्ष.आणि त्याचे फळ म्हणजे युद्ध होय.

भांडवलशाही म्हणजे विष वृक्ष.आणि त्याचे फळ म्हणजे युद्ध होय.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 9/4/2026 भांडवलशाही म्हणजे विष वृक्ष, आणि त्याचे फळ म्हणजे युद्ध होय.

” स्वार्थ ” ही एक मानवी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, स्वार्थाला आवर नाही घातले तर त्यातून मोह निर्माण होतो, आणि मोह हा माणुसकी विसरतो, नातेसंबंध विसरतो, आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक या माणसाच्या प्रत्येक क्षेत्रात मोह हा माणसाचीच पिळवणूक करायला लागतो, शोषण करायला लागतो, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार, नफेबाजी काळाबाजार साठेबाजी नशाबाजी जुगार इत्यादी वाईट गोष्टी करायला लावतो, मोह हा स्वतः माणसाला तर बिघडवितोच पण इतर माणसांना पण तो बिगडवीत असतो, थोडक्यात सांगायचे तर तो अधर्म करत असतो, माणसाने माणसाचेच शोषण करणे, पिळवणूक करणे, अन्याय अत्याचार करणे, चोरी करणे, भ्रष्टाचार करणे, म्हणजेच अधर्म होय. अधर्मावर मात करण्यासाठी माणसाने देव आणि धर्माची कल्पना केली असावी, माणसाने स्वतःला दुबळे समजले, आपले प्रश्न आपल्या समस्या आपणच सोडू शकतो, याबद्दलचा आत्मविश्वास माणसाला नसल्यामुळे तो भित्रा बनला, यासाठी तो परावलंबी पण बनला, म्हणून त्याने आपल्यापेक्षा कोणीतरी एक शक्तिमान आहे, तो म्हणजे ईश्वर, त्याकडेच त्याने विनंती आराधना स्तुती करायला शिकली आणि देवाचा धावा करायला लागला की,”देवा, या पृथ्वीवर अन्याय अत्याचार सोशल कळवणूक याचा अतिरेक झाल्यामुळे आता मानवी जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, जगाचा मालक आहेस, तू शक्तिमान आहेस, तेव्हा तूच यातून आम्हाला वाचव.”अशाप्रकारे आत्मविश्वास गमावून बसलेला, भित्रा, परावलंबी माणूस देवाकडे धावा करायला लागला, तेव्हा देवाने अवतार धारण करून या पृथ्वीवरील अधर्म म्हणजेच शोषण पिळवणूक अन्याय अत्याचार भ्रष्टाचार नष्ट करण्याचे काम केले, अशा प्रकारची शिकवण धार्मिक तत्त्वज्ञानातून किंवा गोष्टीतून मिळते. परंतु हे धार्मिक तत्त्वज्ञान किंवा ही धार्मिक शिकवण कशी चुकीची आहे हे या जगात यापूर्वी दोन महायुद्ध झाले, तसेच इराण इराक, भारत पाकिस्तान, अमेरिका इराण, इत्यादी काही दोन देशातील युद्धे पण झाली, यासाठी ईश्वर धावून आला नाही, या युद्धात हजारो माणसे मेली, करोडो रुपयाची मालमत्ता उद्ध्वस्त झाली, तरी त्यास दयामाया आली नाही, त्याने आपली शक्ती दाखवली नाही, यावरून “यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत “हे धार्मिक तत्वज्ञान फेल आहे, हे सिद्ध झाले. धर्म आणि सांप्रदायिक धर्म हे अनेक धर्म केवळ अन्याय अत्याचाराविरोधात निर्माण झाले, तांत्रिक दृष्ट्या हे खरे असले तरी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार काळाबाजार नफेखोरी सोशल मिरवणूक हिंसा इत्यादी मानवी जीवन नष्ट करणाऱ्या गोष्टी बंद झाल्या नाहीत, त्या चालूच आहेत, उलट या कमी होण्याऐवजी याचे प्रमाण अधिकाधिक वाढतच आहे, ही वस्तुस्थिती आपणास मान्यच करावे लागते, म्हणून ईश्वर हा तारणहार आहे, आणि धार्मिक तत्त्वज्ञान किंवा उपदेश या अधर्मावर उपाय होऊ शकत नाही, हे समजायला अजून किती हजार वर्षे लागणार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, माणसाच्या मनाची आणि बुद्धीची दुर्बलताच होय. एकाच कुटुंबातील भाऊ भाऊ किंवा नातेवाईक एकमेकास भांडतात, तसेच शेजाऱ्यांची पण भांडणे होतात, गावकऱ्यांची पण भांडणे होतात, दोन गावांची पण भांडणे होतात, दोन राष्ट्रांची पण भांडणे असतात, रस्त्यावरची भांडणे, बस मधील भांडणे, रेल्वेतील भांडणे, ही भांडणे का आणि कशासाठी? यावर विचार केला तर असे दिसते की, माणूस हा मूळतःच ‘ स्वार्थी ‘ आहे. स्वार्थाची पुढची पायरी म्हणजे मोह होय, स्वार्थाला लगाम नाही लावला की, तो घोडा होऊन, भरधाव धावतो, त्याच्या धावण्यात, किती माणसे मरतात याची त्याला पर्वा नसते, आणि दोन घोड्यामध्ये जेव्हा स्पर्धा लागते, तेव्हा तर मग काही विचारू नका, या स्पर्धेतून शेवटी युद्ध सुरू होते, आणि या युद्धातून कित्येक माणसे मरतात, कितीतरी मालमत्तेची नुकसान होते.”मोडेन पण वाकणार नाही,” शेवटी ही ईर्षा निर्माण होऊन त्यात स्वतःचा जीव जरी गेला तरी त्यास परवा नसते. याचा अर्थ मोह माणसाला कुठे नेऊन ठेवतो ? याची कल्पना असणे जरुरीचे आहे.’ मोह ‘ असला की, त्यातून गर्व अहंकार निर्माण होतो, तो आगी सारखा असतो, जंगलाला लागलेली आग एकदा का भडकली मग सारे जंगलच जळून जाते, त्यात केवळ हरीण ससे पक्षी च जळून खाक होतात असे नाही तर सिंह वाघ लांडगे यासारखे हिंस्र प्राणी पण जळून खाक होतात, झाडेझुडपे पण जळून जातात, निष्कर्ष काय ? तर शेवटी ‘ सारे जंगलच जळून खाक झाले, कोणीही शिल्लक राहिले नाही.’ मग या टप्प्यावर विचार करण्याची गरज आहे की, जीवसृष्टीच जर या मोहामुळे, या स्वार्थामुळे नष्ट होणारा असेल, तर मग तो का करायचा ? तो का बाळगायचा ? त्याची जोपासना का करायची ? स्वार्थातून मोह निर्माण होतो, मोहातून गर्व आणि अहंकार निर्माण होतो, त्यातून सत्ता संपत्ती प्रतिष्ठा निर्माण होतात, आणि त्यांची जोपासना करणे सुरू होते, त्यांचे संरक्षण करणे गरजेचे होते, अशावेळी दोन माणसात, किंवा कुटुंबांतर्गत, गावांतर्गत, देशांतर्गत, किंवा दोन देशांमध्ये, किंवा जगातील अनेक देशांचे दोन किंवा तीन गट निर्माण होऊन मग जागतिक महायुद्ध पेटते, असे जागतिक महायुद्धे जगात दोन वेळा झालेली आहेत, आज यावेळी वर्तमान काळात इजराइल अमेरिका आणि इराण यांच्यात जे युद्ध सुरू झाले आहे, ते थांबायला तयारच नाही, कारण दोन्ही देशांचा अहंकार जागा झाला आहे, या दोन देशांमध्ये जी लढाई सुरू आहे त्यामध्ये आता इतर देश पण सामील होणार आहेत, काय देश अमेरिकेची बाजू घेतील, तर काही देश हिरांची बाजू घेतील, अर्थात कोणता देश कोण्या देशाशी हजारो कोटीचा व्यापार करार केलेला आहे, यावरून कुणी कुणाला मदत करायची ते ठरत आहे ठरविण्यात येत आहे, याचा अर्थ सारे जण सारे देश आपापला स्वार्थ जोपासण्यासाठी सिद्ध झाले आहेत, आपले आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून, काही देश हे युद्ध थांबविण्याचा पण प्रयत्न करीत आहेत. तरीपण या युद्धाचा निष्कर्ष हाच काढावा लागेल की, जगात साऱ्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, या व्यवस्थेची धोरण हे साम्राज्यवादी धोरण आहे. याचा अर्थ छोटे भांडवलदार मोठे होण्यासाठी आणि मोठे भांडवलदार जागतिक भांडवलदार होण्यासाठी प्रयत्न करीत असतात, याचा अर्थ माणूस आणि त्याचा स्वार्थ जेवढा छोटा तेवढा तो छोटा, आणि त्याचा स्वाद जेवढा मोठा तेवढा तो मोठा, स्वार्थ काय करतो ? मोहात गुंततो. मोह काय करतो? माणुसकी सोडायला सांगतो, नाते तोडायला सांगतो, इतरांचे शोषण आणि पिळवणूक करायला सांगतो, इतरांवर अन्याय अत्याचार करायला सांगतो, हे करण्यासाठी त्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यासाठीच तो करीत असला तरी, हे मिळाल्यानंतर परत याचाच उपयोग परत शोषण अन्याय अत्याचारासाठीच करीत असतो. माणुसकी तो विसरतो. भांडवलदार जमीनदार बनून तो राक्षस बनतो. साऱ्यांच्या मुंड्या मोडण्याचे कार्य करायला लागतो. आत्मविश्वास गमावलेली माणसे, परावलंबी माणसे, लाचार माणसे, समस्याग्रस्त समस्याग्रस्त माणसे, हाताला काम नसलेली माणसे, देवाधर्मावर विश्वास असणारी अज्ञानी अडाणी आणि देव भोळी माणसे, यांचा हे स्वार्थी हाव असणारी माणसे, स्वस्त मजुराची पिळवणूक करतात, त्याचे कडून त्याचा जास्त वेळ घेऊन जास्तीत जास्त काम करायला लावून आणि कमीत कमी त्यास पैसे किंवा मोबदला देऊन आपले भांडवल वाढवीत असतात, म्हणजेच इथेच श्रमाची चोरी करून भांडवलशाहीला सुरुवात होते, अति नफा कमवून त्यातून भांडवल जमा करून त्याच भांडवलावर शेती उद्योग व्यापार कारखाने काढून परत त्यातून अफाट नफा कमवतात आणि श्रीमंत होतात, श्रीमंतीतून देशी भांडवलदार, देशी भांडवलदाराकडून विदेशी भांडवलदाराकडे म्हणजेच साम्राज्यवादी भांडवलदाराकडे वाटचाल सुरू होते, जगातील हे सर्व साम्राज्यवादी भांडवलदार एक होतात. याचा अर्थ भांडवलदारी अनेक देश, त्यांचे करोडो रुपयाचे आर्थिक करार, त्यातून त्यांची दोस्ती, त्यातून गटनिर्मिती, आणि जगातील दोन गटांचे भांडण, मारामाऱ्या, युद्ध , म्हणजेच हे जागतिक युद्ध होय. अर्थात अशा या लोभी आणि स्वार्थी भांडवली देशांचे लक्ष हे ज्या देशात जास्तीत जास्त नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे आहेत, उदा.अन्नधान्य,मुबलक पाणी,फळफळावळ,इमारतीचे लाकूड,औषधी वनस्पती,तसेच भूगर्भातील खनिजे ( सोने,लोखंड, जस्त,तांबे, कॅल्शियम,कोळसा,रॉकेल, पेट्रोल, डिझेल इत्यादीच्या खाणी आणि विहिरी ) अशा देशावर हे भांडवली देश कावळ्यासारखा डोळा ठेऊन असतात,यासाठीच तो देश जिंकण्याचा किंवा त्यास आपल्या ताटेखालचे मांजर बनून राहण्यासाठी म्हणून युद्धे करतात आणि युद्ध करून एक तर त्यांना जिंकून घेतात, किंवा युद्धामध्ये हरण्याची वेळ येईल अशी जेव्हा वाटते तेव्हा ते त्यांच्याशी तह पण करतात. आणि युद्धविराम होते. युद्ध विराम होते याचा अर्थ थांबते, थांबणे म्हणजे यापुढे युद्ध कधीच होणार नाही असे नव्हे, प्रत्येक देश हे शिस्त शास्त्र आणि अनुभव निर्मितीच्या कामात मग्नच असतात. कारण त्यांना एकमेकांची जीव घ्यायच्या असतात. हे भांडवलदार अशा युद्धात समोर नसतात, ते कुठेतरी लपून बसतात, सुरक्षित ठिकाणी असतात, सुरक्षा कवच घेऊन बसतात, आणि लढाईत मात्र सैनिक मारतात, त्यांच्या पत्नी विधवा होता, त्यांची मुले अनाथ होतात, हजारो लाखो निष्पाप नागरिक मुले स्त्रिया म्हातारी माणसे मरण पावतात, याचे या भांडवलदारांना काहीच देणे घेणे नसते, यांना हे दिसत नाहीत, यांना दिसते फक्त नफा आणि भांडवल, पैसा, सोने, पेट्रोल, डिझेल , अशा वस्तू की, ज्याला घेतल्यानंतर जास्तीत जास्त पैसे मिळतील आणि त्यातून आपण अधिकाधिक श्रीमंत होऊ. माणसाचा स्वार्थ आणि मग जेव्हा वाढत वाढत वाढत एक अतिउच्च टोक गाठते तेव्हा माणूस हा राक्षस बनून, दानव म्हणून अनेकांचे जीव घेत निघतो, अनेकांचे रक्त प्राशन करतो. कारण ज्याला मोहर जडला आहे, तो माणुसकी विसरतो, म्हणजेच तो माणूस राहत नाही. माणूस जन्माला येऊन, माणसाने माणसासोबत माणसासारखे वागले पाहिजे, याचा त्यास विसर पडतो. केवळ नफा कमवण्यासाठी आणि धन कमवण्यासाठी माणूस मारणाऱ्या एखाद्या वाघाला जसे माणसाचे रक्त त्याच्या तोंडाला लागल्यानंतर तो माणसेच खात सुटतो, तसे याला नफ्याची आणि चोरीची आणि धोका देण्याची चटक लागते तेव्हा तो माणुसकी विसरतो, असा माणूस आपले पाप लपवण्यासाठी देवाचा आणि धर्माचा आडोसा घेतो, देवाच्या आणि धर्माचे नावाने अधिकच अधिक पाप करायला सुरुवात करतो. अशा प्रकारे यातून भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण होते, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच स्वार्थी दुनिया, अ माणूस दुनिया. हिंस्र माणसाची दुनिया. अशा ह्या स्वार्थी भांडवलशाही व्यवस्थेत मुले आपल्या आई-वडिलांना मारून टाकण्याला पण मागे पुढे पाहत नाहीत, केवळ धनसंपत्तीसाठी. केवळ धनसंपत्तीसाठी माणूस माणसाच्या जीवावर उठला असेल तर, आणि मानवी जातच या पृथ्वीतलावरून नष्ट होणारा असेल तर, ही भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट केली पाहिजे, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच विषमतावादी सामाजिक व्यवस्था होय, जातीव्यवस्था सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळेच टिकून आहे. जातीव्यवस्थेचे सुद्धा अनेक दुष्परिणाम आपणास बघायला मिळतात. अशी ही विषमतावादी भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आज माणसाच्या जीवावर उठली आहे, याचे स्पष्ट आपल्या डोळ्यापुढील उदाहरण म्हणजे हे दोन देशाचे युद्ध आणि त्याचे परिणाम, आपण बघतो आहोत आणि भोगतो पण आहोत. स्वार्थ आणि मोह हे बीज, विष बीज आहेत, या विष बिजाला भांडवलचे अर्थव्यवस्था पूरक आहे. या व्यवस्थेने या विष बियाला उपयुक्त अशी जमीन पाणी वातावरण खत पुरविण्याचे काम करीत असते. ह्या विष बीजाला अशा प्रकारचे वातावरण मिळू नये आणि या विष विजयाचा ” विष वृक्ष ” बनू नये, यासाठी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट केली पाहिजे, त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन केली पाहिजे. हा विचार जास्तीत जास्त लोकांना जर पटला तर अशी व्यवस्था म्हणजे समतावादी सामाजिक व्यवस्था स्थापन व्हायला जास्त काळ लागणार नाही, दोन-तीन पिढ्यां नंतर हे शक्य आहे. अर्थात विषमतावादी अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलचे अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजेच समतावादी व्यवस्था या दोन व्यवस्थांमध्ये म्हणजेच या दोन विचारांमध्ये संपूर्ण जगात कायमच संघर्ष चालू आहे, आणि तो कायमच राहणार आहे, जोपर्यंत कुणीतरी कुणाला तरी जिंकणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार आहे, अर्थात या संघर्षात विषमतावादी राष्ट्रांची ताकद जास्त झाली तर, समतावादी राष्ट्र राहणारच, आणि जर समतावादी राष्ट्रांची संख्या जास्त झाली तर, विषमतावादी राष्ट्र करणारच. हे सूत्र समजायला आपण आधी माणूस बनले पाहिजे. लेखक: दत्ता तुमवाड, सत्यशोधक समाज नांदेड, दिनांक: 9 एप्रिल 2026, फोन: 94 20 91 22 झिरो नऊ.

RELATED ARTICLES

Most Popular