Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

गुरुवार, 9 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण सप्तमी

राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3

आज सकाळी 8 नंतर चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास धनु(परिघ योग, विष्टि करण शांती)

9 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे मंगळाच्या गुणांचा व दोषांचा अतिरेक  तुमच्यात असतो. प्रतिकार, धाडसी,तत्परता लढाउ वृत्तीचे असतात. पराभव तुम्हाला तुमच्या गावी पण नसतो .नेहमी आक्रमक असून ध्येय संपूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही पूर्ण प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे तोंड देतात बोलण्यात युक्तिवाद किंवा नाजूकपणा नसतो. परखडपणा किंवा उद्धटपणा दाखवतो दुसऱ्यावर टीका करू नये .तुम्ही तापट असून धाडसी असतात .उद्धट पणा व जोर सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतो खेळाची शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते .लैंगिक भावना तीव्र असतात. शूर असल्याने भांडण्यासारख्या कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. मित्र-मैत्रिणी बद्दल फार प्रेम असून त्यांच्या बाजूने लढण्यास तयार असता. मुले व प्राणी फार प्रिय असतात .दुसऱ्यावर दया करण्यात आनंद मिळतो नैतिक दर्जा असते. मनाची शक्ती प्रचंड असून त्यानुसार तुम्हाला गुढ अनुभव येतात .प्रवास खूप कराल त्यामुळे व सहनशीलता वाढेल. विचारवंत व अभ्यास वृत्तीचे असतात सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढे गेलेले असतात. त्यामुळे इतर लोक तुमचे सल्ला घेतात .मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्याबाबत पैशाच्या बाबतीत मात्र जबाबदारी घेताना सारासार विचार करणे जरुरीचे आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही नशीबवान असता, सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो. उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची योग्यता असल्यामुळे पैशाची साहजिकच आवश्यक असते. उत्साही ,कार्यक्षम, कार्य कुशल असून महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. आपल्या पतीला साथ देता. स्वतःच्या व्यवसाय किंवा नोकरी करून उत्पन्नात भर घालतात .तुम्ही रागीट हट्टी असून सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच  व्हावा याबाबत तुम्ही दक्ष असता.मुलांवर व घरातील नोकरदार माणसांवर तुमचा वचक असतो. दुसऱ्याच्या चुका काढण्यात माहीर असतात. बोलण्यात स्पष्ट पणा व परखडपणा असल्याने इतर जन दुखावले जातात नोकर फारसे टिकत नाहीत.

शुभ दिवस:- सोमवार गुरुवार शुक्रवार

शुभ रंग:- पिवळा तांबडा पांढरा.
शुभ रत्ने:- पुष्कराज मोती माणिक.
आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज तुमच्यासाठी भाग्यवृद्धीचा दिवस आहे. शिक्षण, प्रवास आणि नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा. अचानक खर्च होऊ शकतो. मानसिक स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज जोडीदाराकडून भेट वस्तू मिळू शकते.
नातेसंबंधांसाठी चांगला दिवस. जोडीदाराशी समजूतदारपणे वागल्यास मतभेद दूर होतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. थोडा ताण जाणवेल, पण मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.महिला कामगाराकडून सहकार्य मिळेल.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
प्रेम आणि आनंदाचा दिवस.प्रेमीकाना यश. कला, सर्जनशीलता आणि मुलांशी संबंधित गोष्टींमध्ये समाधान मिळेल.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
घरगुती वातावरणात बदल जाणवतील. कुटुंबासोबत वेळ घालवा. वाहन सौख्याचा.गृह सजावटीसाठी खर्च कराल.मनात थोडी अस्वस्थता राहू शकते.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
संवादातून फायदा होईल. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ. मित्रांकडून मदत मिळेल.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. पण कौटुंबिक खर्चही वाढू शकतो. स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा.गायक वक्तृत्व कलेत उत्तम यश.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. निर्णय घेण्यासाठी उत्तम वेळ. स्वतःवर लक्ष केंद्रित करा.स्वतःसाठी खर्च कराल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज आर्थिक दृष्टीने चांगला.
मन थोडं चिंताग्रस्त राहू शकतं. भूतकाळातील गोष्टींवर विचार होईल. ध्यान-धारणा उपयुक्त ठरेल

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
मित्र आणि सामाजिक जीवनात आनंद मिळेल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते. नवीन संधी आणि सोशल नेटवर्किंगसाठी चांगला दिवस.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची चिन्हं आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदारी वाढेल पण यशही मिळेल.निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर. मोबाईल 9561796324 .
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular