Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 9/4/2026 निवासयोग्यस्थाननिर्णयः

“धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पञ्चमः। पञ्च यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसे वसेत ॥”

ज्या ठिकाणी धनिक (समृद्ध व्यक्ती), श्रोत्रिय (विद्वान ब्राह्मण), राजा (सत्ताधीश किंवा प्रशासक), नदी आणि वैद्य हे पाचही घटक नसतात, त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये. कारण हे सर्व घटक समाजाच्या स्थैर्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. धनिक आर्थिक सहाय्य देतो, विद्वान मार्गदर्शन करतो, राजा संरक्षण देतो, नदी जीवनासाठी आवश्यक साधन देते आणि वैद्य आरोग्याची काळजी घेतो. त्यामुळे या पाच गोष्टी नसलेल्या ठिकाणी राहणे अयोग्य मानले आहे.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular