लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 5/4/2026 धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजेल आणि तिथून पुढचे दोन तास सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .असा जर प्रतेक ग्रामपंचायत मोबाईल असो अवैध धंदे दारू गुटखा असो अशा पध्दतीने जर गावापासून जर चळवळ उभी केली तर गाव आदर्श होण्यासाठी फार वेळ लागणार नाही.