लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार
रविवार, 5 एप्रिल 2026. चैत्र कृष्ण चतुर्थी,संकष्टी चतुर्थी
राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज विशाखा वर्ज्य दिवस.संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय
मुंबई 9:47 रात्रौ
नाशिक 9:45 रात्रौ
आज जन्मलेल्या बाळाची रास तुळ /संध्याकाळी 5:28 नंतर वृश्चिक रास असून वज्र्य योग आणि विष्टि करण शांती करवून घेणे.
5 एप्रिल रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यातील कौशल्य बौद्धिक आणि कृतीत पण असते .तुम्हाला खेळण्याची आवड असते. समाजप्रिय असतात .नाविन्य व प्रवास याची आवड ही तुमची वैशिष्ट्ये आहे. पूर्ण प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला यशस्वीपणे तोंड देता .मैत्रमैत्रिणींबद्दल आदर असून वेळाप्रसंगी त्यांच्या बाजूने लढता .दुबळ्या लोकांबद्दल दया व आदर असतो .मुले व प्राणी फार प्रिय असतात. तुम्ही हुशार तल्लख, शास्त्रीय गोष्टींची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे झटपट काम करणारे असतात. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता .तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा खपत नाही. धर्म व तत्वज्ञान या गोष्टीची आवड असते .उद्योगाशी तुमच्या संबंध असल्यामुळे समृद्धीची अपेक्षा करणे चुकीचे ठरत नाही. स्वतःच्या चाणाक्ष व धूर्त स्वभावामुळे आपला नोकरी धंदा व्यवस्थित रित्या सांभाळू शकता. स्वतःच्या कष्टाचा मोबदला उत्तम मिळतो .खर्चिक असून प्रिय व्यक्तीसाठी खर्च करताना मागेपुढे पाहत नाही. पण मंगळाच्या प्रभावामुळे उतावळेपणा असतो आर्थिक स्थिती झटपट सुधारावे असे वाटते. बोलल्यावर संयम ठेवावा त्यामुळे लवकर वसुली होऊ शकते .घरात बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता .टापटीप आवडते .तुम्ही चलाख व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा आहात महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात. विनोदी स्वभाव व संभाषण कौशल्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते .तुमचे घर म्हणजे एक सामाजिक केंद्र असते. घराबद्दल आपलेपणा असतो, पण ओढा नसतो .स्वतंत्र बाणा धैर्य ,उत्साह असतो अशा लोकांकडे तुमचा ओढा असतो.
शुभ दिवस -बुधवार, शुक्रवार शनिवार
शुभ रंग :-हिरवा, पांढरा शुभ रत्न:-
हिरा, पाचु,मोती (रत्न वापरण्यापूर्वी कुंडली तपासून पहावी)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज तुमच्यात उत्साह आणि धाडस वाढेल. कामात पुढाकार घेतल्यास यश मिळेल. नात्यांमध्ये थोडी संवेदनशीलता ठेवा. आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आज मन स्थिर ठेवणे गरजेचे आहे. कामात थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवल्यास मार्ग निघेल. कुटुंबाकडून मदत मिळेल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आज तुमची संवाद कौशल्ये चमकतील. नवीन ओळखी, मैत्री आणि कामाच्या संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
घर आणि करिअर यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. घरातील महिलांशी संवाद वाढवा. मानसिक शांतता महत्त्वाची ठरेल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज आत्मविश्वास वाढेल. नवीन निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक खर्च होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. योग-ध्यान फायदेशीर ठरेल.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
आज चंद्र तुमच्या राशीत आणि नंतर धनस्थानी असल्याने इतरांवर प्रभाव वाढेल. लोक तुमच्याकडे आकृष्ट होतील. पण संध्याकाळनंतर भावनिक बदल होऊ शकतो—शांत रहा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
सकाळी थोडी अस्वस्थता वाटू शकते, पण नंतर ऊर्जा वाढेल. गुप्त योजना यशस्वी होतील. स्वतःवर विश्वास ठेवा.संध्याकाळ मनासारखी.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
मित्र मैत्रिणीआणि नेटवर्किंगमधून फायदा होईल. नवीन संधी मिळतील. आज काही जुने प्रश्न सुटू शकतात.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. मेहनत केल्यास मान-सन्मान मिळेल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आज नशिबाची साथ मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तम दिवस. आध्यात्मिक रुची वाढेल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
भावनिक अनुभव येतील. जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात, पण त्यातून शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत लाभ संभवतो.
✨ उपाय (महिलांसाठी विशेष)
आज संध्याकाळी देवीला लाल फुले अर्पण करा आणि “ॐ दुर्गायै नमः” मंत्र १०८ वेळा जपा. मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.मोबाईल 9561796324.
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.