लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 27/3/2026उदगीर येथील समगे गार्डन अँड फंक्शन हॉल येथे सौ. कमल व श्री.संग्राम गुरबसप्पा हुडगे यांच्या वैवाहिक जीवनाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास उत्साहात संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा सुवर्ण योग आला.हुडगे दांपत्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार श्री संजय बनसोडे यांनी आपले मनोगत शुभेच्छा च्या माध्यमातून व्यक्त केले.माजी मंत्री बाळासाहेब जाधव सोबत माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे नगरपरिषद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव हुडे अण्णा अध्यक्ष सौ स्वाती सचिन हुडे नगरसेवक सचिन शिवाजी हुडे उपस्थित होते.या सुवर्ण महोत्सवी क्षणी त्यांच्या आयुष्यातील दीर्घ सहजीवनाचा. परस्परांतील प्रेम समजुतदारपणा आणि नात्यातील दृढतेचा गैरव करण्यात आला.या कार्यक्रमास नातेवाईक . मित्र परिवार सामाजिक मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.