लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 28/3/2026 गुणी गुणं वेत्ति
“गुणी गुणं वेत्ति न वेत्रि निर्गुणो बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बलः । पिको वसन्तस्य गुणं न वायसः करी च सिंहस्य बलं न मूषकः ।।”
गुणी माणूसच दुसऱ्याचे गुण ओळखतो; निर्गुण व्यक्तीला गुणांची किंमत कळत नाही. बलवान माणूस दुसऱ्याचे सामर्थ्य ओळखतो; दुर्बल व्यक्तीला बलाची जाणीवही होत नाही. जसे कोकिळा वसंत ऋतूचे सौंदर्य ओळखते, पण कावळा नाही; तसेच हत्ती सिंहाचे बल जाणतो, पण उंदीर नाही. या श्लोकात गुण आणि बल यांचे खरे मूल्य फक्त त्याच गटातील किंवा ते समजून घेण्याच्या क्षमतेच्या लोकांनाच कळते, हे स्पष्ट केले आहे. गुणी व्यक्तीच दुसऱ्याच्या गुणांचे महत्त्व जाणते, तर निर्गुण माणसाला त्याचे आकलन होत नाही. त्याचप्रमाणे, बलशाली व्यक्ती दुसऱ्याच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज लावू शकते, पण दुर्बल व्यक्तीला ते समजत नाही. जसे कोकिळा वसंताचे सौंदर्य ओळखते, पण कावळ्याला त्याची जाणीव नसते; तसेच हत्ती सिंहाचे सामर्थ्य ओळखतो, पण उंदीर नाही.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏