Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025. अश्विन कृष्ण अष्टमी/नवमी

राहू काळ – दुपारी 3 ते 4:30

आज चांगला दिवस आहे,आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क आहे.

14 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला छान असून लोकप्रिय असता. दुसऱ्याला न दुखवता मदत करण्याकडे कल असतो .तुम्ही फारशी बडबड न करता हातचे राखून बोलता .तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण चांगले असते. कोडी सोडवण्याचा छंद असतो. स्त्रियांमध्ये सुखी वैवाहिक जीवन असते .मुले होण्याबाबत ,प्रसुतीबाबत त्रास होतो . स्वतःच्या व्यवसायात यश मिळते .भावनांवर ताबा असतो. श्रीमंत व्यक्तीशी लग्न होते आणि लग्नानंतर भाग्योदय होतो .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असते. तुम्ही स्वतः कलाकार असून कला प्रिय देखील आहात. मनाने तुम्ही उदार आणि विचारी असून इतरांची कदर करतात. तुमच्या सानिध्यात आल्यास इतरांना आनंद होतो. तुमचे वागणे आणि बोलणे मोहक आणि आकर्षक आहे. तुम्ही समजूतदार असून विविध खेळांमध्ये यश मिळते. इतरांचे कच्चे दुवे तुम्ही बरोबर हेरतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगायची तुम्हाला बरीच हौस असते. तुमचे उद्दिष्ट ठाम असते आणि त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, वाहने, घरे, दाग दागिने आणि सुगंध द्रव्य वापरण्याची आवड असते. विविध समारंभांमध्ये भाग घेणे आणि समाजात मिसळणे तुम्हाला आवडते. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आणि संयमी आहे. इतरांना मदत करणे तुम्हाला मनापासून आवडते. धर्म आणि तत्वज्ञान तसेच प्रवास याची तुम्हाला आवड आहे. तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमतात. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असता. आरोग्याने सुदृढ असतात चाकोरी बद्ध आयुष्य तुम्हाला आवडत नाही, तरीही तुम्ही स्वभावाने नम्र असता.पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरात टापटीप व्यवस्थितपणा असतो ,पण ही कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात तुम्ही पटाईत असतात.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, हिरवा.

शुभ रत्न:- पाचू, हिरा, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:- मैत्रिणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे. वाहन सुख लाभेल.नवीन वास्तू घेण्याची इच्छा पूर्ण होईल.बागकाम करताना सावध रहा.

वृषभ:- मैत्रिणींनो आज प्रवासातून लाभ होतील.भावंडकडून शुभ समाचार मिळेल.भेटवस्तू मिळतील.सौख्याचा दिवस.

मिथुन:- मैत्रिणींनो आज उत्तम दिवस आहे.कुटुंबियांच्या खरेदी साठी खर्च कराल.आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्याल.गायन,नाटक वैगरे मनोरंजनाचा आनंद लुटाल.

कर्क:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.उत्साहित करणारा दिवस राहील.स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.दागिने खरेदी होईल.अचानक लाभाची शक्यता. आरोग्य सुदृढ राहील.

सिंह:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चंद्र आहे.अचानक धनलाभाचे योग.आरोग्य जपा.महत्वाचे निर्णय आज नकोत.

कन्या:- मैत्रिणींनो आज सर्वार्थाने उत्तम दिवस.सुखद अनुभव येतील. कामात प्रगती होईल.आर्थिक चिंता दूर होईल.घरगुती वातावरण प्रसन्न राहील.मनासारखी खरेदी होईल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.मैत्र मंडळी कडून लाभ होतील.

तुळ:-मैत्रिणींनो आज कामाच्या ठिकाणी महिला सहकारी मदत करतील.अनपेक्षित आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज प्रवासाचे बेत आखले जातील.भाग्योदय होईल.धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

धनु:-मैत्रिणींनो आज स्त्रीधन वाढेल. लॉटरी लागू शकते.वाहन काळजीपूर्वक चालवा.

मकर:- मैत्रिणींनो आज पतीकडून भेटवस्तू मिळेल.मनासारखी खरेदी होइल.अनोळखी व्यक्ती मार्फत लाभ होऊ शकतो.

कुंभ:- मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने उत्तम दिवस.नवीन नोकरी इच्छुकांना सुसंधी चालून येईल.आरोग्य संभाळा.

मीन:- मैत्रिणींनो आज छान दिवस आहे. प्रेमात यश .विवाह इच्छुकांचा शोध संपेल.शेअर्स मध्ये लाभ होतील.संतती कडून खूष खबर मिळे

RELATED ARTICLES

Most Popular