Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

रविवार, 12 ऑक्टोबर 2025. अश्विन कृष्ण षष्ठी

राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6

आज दुपारी 2 पर्यंत चांगला दिवस आहे .
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन असून विष्टी करण शांती करणे.

12 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा ओढा सुखासीन जीवनाकडे असतो. तुम्हाला आयुष्यात सहजपणे मान- सन्मान मिळतात. इतरांकरिता तुम्ही स्वार्थत्याग करतात मात्र त्यातून तुम्हाला अपेक्षाभंग मिळतो. तुमच्याशब्दात आणि कृतीत ठामपणा असतो. वायफळ बडबड तुम्हाला आवडत नाही. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला प्रिय आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. धर्माचा तुम्ही डोळसपणे अभ्यास करतात. तुम्ही न्यायप्रेमी आणि इतरांच्या साठी कष्ट घेणारे आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुमच्यात रुबाबदारपणा, काटेकोरपणे आणि व्यवस्थितपणा आहे. दुर्बल लोकांना तुम्ही नेहमीच मदत करतात. तुमच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. क्रीडा प्रकारांची तुम्हाला आवड आहे. हाती घेतलेल्या कार्यासाठी तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे आणि जीवनाकडे तुम्ही आशादायकपणे बघतात. स्वतःच्या प्रेमसंबंधांंबाबत तुम्ही आशादायी आणि संयमी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पाऊल टाकतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार असून आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकतात. वयाच्या 39 वर्षा नन्तर आयुष्यात स्थैर्य येते. आपले जिवन आरामदायी जाईल या कडे तुमचे लक्ष असते.पैशाच्या बाबतीत सुखी व समाधानी असता.पैशांची उपभोगता येणारी सर्व सुखाचा आनंद लुटू शकता.अनाठायी काळजी करण्याचा स्वभाव असतो. त्यामुळे मन दुःखी कष्टी असते.तुम्ही चलाख  व आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आहात. तुम्हाला तुमच्या घराबद्दल आत्मीयता असते पण ओढा नसतो.इच्छा शक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते. स्वभाव हरहुन्नरी असतो पण कोणत्याही ऐका विषयात पारंगत नसता. स्वभाव लहरी आणि हळवा आहे.पतीला योग्य ती सर्व साथ देण्यात अभिमान वाटतो.प्रेमळ,निष्ठावंत असून चांगली सहधर्म चारिणी म्हणून लौकिक मिळवता.

शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, अमेठीस्ट, लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज सोशल मीडियावर टिप्पणी प्रसिद्धी देईल.कौटुंबिक जबाबदारी वाढेल.प्रवासाचे योग आहेत.नवीन कल्पना सुचतील, त्याचा योग्य उपयोग कराल.भावंडांसाठी खर्च करावा लागेल.
त्वचेची काळजी घ्या.सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल.

वृषभ:- मैत्रिणींनो आज खरेदी होईल.घरातल्या स्त्रियांकडून सहकार्य मिळेल.एखादी प्रिय मैत्रीण चा सल्ला उपयुक्त ठरेल.
सौदर्य नीट ठेवण्यासाठी एखादा वेगळा प्रयोग करून बघा.

मिथुन:- मैत्रीणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.घरातल्या स्त्रियांशी हितगूज कराल.मानसिक थकवा जाणवेल.मोजके बोला.प्रवासाचे योग आहेत.नवीन ओळखी होतील.संवादकौशल्याने मन जिंकुन घ्याल.संध्याकाळ आनंदाची.
केसांची निगा राखा.

कर्क:-मैत्रिणींनो आज रुटीन चालू ठेवा.महिलांच्या मध्ये तुमचं मत महत्वाचे ठरेल.घरातल्या सजावटी वर नवीन विचार मनात येतील.धार्मिक गोष्टी साठी वेळ द्याल.एखादी आनंदाची बातमी मिळु शकते.

सिंह:- मैत्रिणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे.कामाचे कौतुक होईल.आत्मविश्वास वाढेल.प्रतिष्ठा वाढेल.सहकाऱ्यांशी उत्तम जुळवून घ्याल.घरातल्या छोट्या गोष्टी आनंद देतील. संतती च्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज मस्त खरेदी होईल.नवीन वस्त्र लाभ होईल.प्रिय व्यक्ती कडून अनपेक्षित भेटवस्तू मिळेल.आरोग्य चांगले राहील.पाणी पुरेसे प्या.

तुळ:-मैत्रिणींनो आज सौंदर्य, कला,संगीत यात मन रमेल.मैत्रिणी भेटतील,मनसोक्त गप्पा रंगतील.जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज घरगूती कुरबुरी होऊ शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होतील.आशा वेळेला सबुरीने घ्या.स्पष्ट बोलुन संवाद साधा.
कठोर निर्णय घ्याल,त्याचा पुढे लाभ होईल.

धनु:-मैत्रिणींनो आज उत्साह वाढेल.मैत्रिणींशी भेटीगाठी होतील.मजेशीर अनुभव येतील.प्रवास घडेल.चीजवस्तू जपा.

मकर:- मैत्रिणींनो आज कामात नवीन जबाबदारी वाढेल.पण यशस्वी व्हाल
घरात तुमचा सल्ला उपयोगी ठरेल.जुने दागिने,कपडे परत वापरण्याचा मोह होईल.आरोग्य सुधारेल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज नवीन काही शिकण्याची आवड निर्माण होईल.ऑनलाईन कोर्स, शिवण, भरतकामाची सुरुवात कराल.मनात विचार अनेक असतील.थोडी विश्रांती घ्या.सामजिक समारंभात सहभाग घ्याल.डोके दुखीचा त्रास होऊ शकतो.

मीन:- मैत्रिणींनो आज नवीन कल्पना सुचतील. इतरांवर प्रभाव राहील.प्रवास घडतील.जवळच्या मैत्रिणीकडून प्रेरणा मिळेल.अत्तर,सुगंधी फुलें यांची आवड निर्माण होई

RELATED ARTICLES

Most Popular