लातूर प्रतिनिधी 22/4/2026 मित्रपालनकठिनता
“सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् ॥”
मित्र बनवणे खूप सोपे असते, परंतु त्या मैत्रीचे जतन करणे आणि ती टिकवून ठेवणे अत्यंत कठीण असते. कारण खरी मैत्री टिकवण्यासाठी समजूतदारपणा, संयम, विश्वास आणि सातत्य आवश्यक असते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की नाते निर्माण करणे सोपे असले तरी ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न आणि प्रामाणिकता आवश्यक असते.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏