लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर
गुरूवार, 25 जुन 20256.निज जेष्ठ शुक्ल एकादशी
निर्जला एकादशी
राहुकाळ – दुपार 1:30 ते 3
आज सकाळी 7 वा पर्यंत चांगला दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास तूला.(विष्टी करण शांती)
25 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध , नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांच्या सोबतच चंद्राचा ही प्रभाव आहे.
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असून कोणत्याही एका विषयात फार काळ रमत नाहीत.प्रवासाची आवड असून परदेशाशी संबध येतात.प्रामाणिक, निष्ठावान आणि विश्वासू आहात. स्वभाव अति चंचल असून काही वेळेस विसंगती दिसून येते.स्मरणशक्ती चांगली असते.
विचार आचारात स्वतंत्र वृत्ती असून कोणाचेही वर्चस्व खपत नाही.भावनांवर ताबा असतो.स्वतःचे गुण दाखवण्याची संधी तुम्हांला मिळावी लागते.भाषण, लेखन यात यश मिळते.
सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस अनुभवास येतात .तुम्ही अहंकार जोपासतात तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असून व्यवहारात चांगला उपयोग करतात. ध्येय, महत्त्वाकांक्षा उच्च असतात. परंतु परंपरागत रुढी याच्याबद्दल तिरस्कार असतो. खेळण्याची व प्रवासाची हौस असते. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगणे आवडते .तुम्हाला आळशीपणा अजिबात खपत नाही काही नाही. काही कारणामुळे परदेशाचे संबंध येतात .सामान्य माणसात मिसळणे तुम्हाला कठीण जाते. आपल्या आवडत्या पुस्तकात सोबत तासंतास घालवणे प्रिय असते .स्वतःचे ज्ञान व अधिकार याची जाणीव असते. स्वतःची खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही .व्यापारी वृत्ती असून धूर्तपणा व जलद पणा अनुभवास येतो .मनाने मोकळे असतात. स्वभावाने आनंदी व उत्साही असतात .तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते .तुमच्या आवडीची नोकरी मिळाली तरच जीवनात चांगला पैसा मिळू शकतो व स्थिरता प्राप्त होते. सर्व सुख सोयी उपलब्ध करण्याकडे ओढा असतो. वयाच्या 34 वर्षानंतर आर्थिक स्थैर्य मिळते. पतीने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी तुमची अपेक्षा असते .रूढी परंपरेला चिकटून राहणे आवडत नाही .आलेल्यांचे आदरा तिथ्य करणे ,जेवायला बोलावणे हे मनापासून आवडते .अतिशय अस्वस्थ असून लहान सहान गोष्टींवरून चिडता .विवाहित जीवनातल्या अडीअडचणींना तुम्ही शांतपणे तोंड देता .जे लोक कला प्रेमी, सौंदर्याचे भोक्ते ,टापटीप आवडणारे आहेत अशांबद्दल तुम्हाला अधिक आकर्षण वाटते.
शुभ दिवस :- सोमवार ,बुधवार गुरुवार
शुभ रंग :- पिवळा ,हिरवा .
शुभ रत्न :- पाचु,मोती,पुष्कराज
आजचे राशिभविष्य
मेष
मैत्रिणींनो आज
आज घर आणि काम यांच्यात संतुलन राखण्याची गरज भासेल. जोडीदार किंवा कुटुंबीयांशी मतभेद असतील तर ते शांतपणे मिटवता येतील. आर्थिक बाबतीत घाई टाळा. महिलांना नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते.
वृषभ
मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. सौंदर्य, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्रातील महिलांना विशेष लाभ मिळू शकतो. जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद आनंददायी ठरेल.
मिथुन
मैत्रिणींनो आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. मुलांशी संबंधित आनंदवार्ता मिळू शकते. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कलात्मक आवडी जोपासण्यासाठी वेळ मिळेल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
कर्क
मैत्रिणींनो आज
घरातील वातावरण सुखद राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मालमत्ता किंवा घरगुती निर्णयांमध्ये सकारात्मक प्रगती होऊ शकते. भावनिक निर्णय घेताना वास्तवाचा विचार करा.
सिंह
मैत्रिणींनो आज
संवादकौशल्यामुळे अनेक कामे सहज मार्गी लागतील. लहान प्रवास किंवा महत्त्वाच्या भेटी यशस्वी ठरतील. बहिण-भावंडांकडून सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कन्या
मैत्रिणींनो आज
आर्थिक नियोजनासाठी दिवस उत्तम आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल. कुटुंबातील महिलांशी सुसंवाद वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य जाणवेल.
तुळ
मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आकर्षण आणि आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक
मैत्रिणींनो आज
मन थोडे संवेदनशील राहू शकते. गुप्त चिंता किंवा जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना मनःशांती देईल. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.
धनु
मैत्रिणींनो आज
मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रातून लाभ मिळेल. एखादे जुने काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. महिलांना नवीन ओळखींचा फायदा होऊ शकतो. भविष्याच्या योजना आखण्यासाठी उत्तम दिवस.
मकर
मैत्रिणींनो आज
कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
कुंभ
मैत्रिणींनो आज
भाग्याची साथ लाभेल. शिक्षण, प्रवास आणि ज्ञानवृद्धीशी संबंधित कामे यशस्वी होतील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचार ठेवा.
मीन
मैत्रिणींनो आज
आज संयमाने वागणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा वाढेल. आध्यात्मिक विषयांकडे ओढ निर्माण होईल.
श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.