Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.9561796324वार बुधवार, *24 जुन 2026*. निज जेष्ठ शुक्ल दशमीराहुकाळ – दुपारी 12 ते 1:30 आज उत्तम दिवस आहे .आज जन्मलेल्या बाळाची राशी तुला आहे.*24* जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐 तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.समाजात मोठ्या ओळखी असून जाणे येणे असते.विरुद्ध लिंगी व्यक्ती कडून फायदा होतो.खोटा अभिमान व मानी पणा तुमच्यात असतो.वेळप्रसंगी मित्रमैत्रिणी च्या बाजूने लढायला तयार असता.लग्नानंतर भाग्योदय होतो व श्रीमंत व्यक्ती शी लग्न होते.पाण्याजवळ भाग्योदय होतो.कायदा पाळता. कर्तृत्व असून ही विलक्षण घटना घडतात.वयाच्या 33 व्या वर्षांपासून उत्कर्ष होतो.”स्वतंत्र विचार व आत्मविश्वास या मूळे प्रत्येक गोष्ट आपल्या हातात ठेवण्याची वृत्ती असते.हुशार व बुद्धी मान वर्तुळात च वावरणं आवडते.तुम्ही जन्मतः कलाकार व कलाप्रिय आहात .तुमच्या कलेचा तुम्ही धूर्तपणे व्यावसायिक उपयोग करतात. तुमच्या सहवास इतरांना सुखावह होतो. तुमच्या अनितीच्या कल्पना निराळे असल्याने तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. सामाजिक रूढी परंपराना तुम्ही फाटा देतात .स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल विश्वास असून स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे कल असतो. तुम्ही संभाषण कलेत प्रवीण असता. जीवनात अधिकार व मान मिळतो .आयुष्य आरामदायक सुख-लोलूप देण्याकडे कल असतो .सुगंधी द्रव्य व आकर् कपडे यांचे तुम्ही शौकीन असता. अनपेक्षित पैसा मिळतो परंतु पैसा साठवण्याची फारशी आवड नसल्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती असते .तुमच्या जवळील कले पासून फारसा आर्थिक फायदा होत नाही हे माहीत असून सुद्धा त्यावर खर्च करता आणि त्याबाबत तुम्हाला पश्चाताप होत नाही. केलेल्या कष्टाचे चीज होते .आरोग्याने सुदृढ असतात. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते पण तिला योग्य ती साथ तुम्ही देता .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी रमता. घरात टापटीप व व्यवस्थितपणे ठेवण्याकडे कल असतो. एक निष्ठावान जबाबदार आई व पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता. बुद्धिमान ,आकर्षक ,कलाप्रिय असलेल्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होता.शुभ दिवस :- सोमवार ,मंगळवार गुरुवार, शुक्रवारशुभ रंग :- निळा, गुलाबीशुभ रत्न :- पाचु,मोती ,हिरा ( रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली आवश्यक तपासून पहा) *आजचे राशिभविष्य*मेषमैत्रिणींनो आजआज सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांना महत्त्व द्याल. जोडीदाराशी संवादातून गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.वृषभमैत्रिणींनो आजकामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. घरातील जबाबदाऱ्या आणि करिअर यामध्ये योग्य समतोल साधता येईलमिथुनमैत्रिणींनो आजसर्जनशील कामे, कला, लेखन किंवा शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी दिवस अनुकूल आहे. मुलांच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.कर्कमैत्रिणींनो आजघर, मालमत्ता आणि कुटुंबाशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. मनातील चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढेल.सिंहमैत्रिणींनो आजआज तुमच्या संवादकौशल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मित्र-मैत्रिणींची मदत मिळेल. छोट्या प्रवासाचा योग संभवतो. नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल.कन्यामैत्रिणींनो आजआर्थिक व्यवहारांमध्ये सावधपणे निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यासाठी बचत करता येईल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल.तुलामैत्रिणींनो आजचंद्र तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्त्व आकर्षक राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. स्वतःच्या गरजांकडेही लक्ष द्या. नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील.वृश्चिकमैत्रिणींनो आजमन थोडे संवेदनशील राहू शकते. जुन्या आठवणी किंवा एखादी अपूर्ण गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना मनःशांती देईल.धनुमैत्रिणींनो आजमैत्र, सहकारी आणि सामाजिक वर्तुळातून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात.मकरमैत्रिणींनो आजकरिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे.कुंभमैत्रिणींनो आजभाग्याची साथ लाभेल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्यासंबंधी चांगल्या संधी मिळू शकतात. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल.मीनमैत्रिणींनो आजगुप्त किंवा रखडलेले विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत वाटेल आणि महत्त्वाचे निर्णय घेता येतील.श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.9561796324.लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular