Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार महिलांसाठी ज्योतिष:-

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाइल 9561796324

सोमवार, 18 मे 2026. अधिक जेष्ठ शुक्ल द्वितीया

राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9

आज शुभ दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ/रात्री 10:05 नंतर मिथून

18 मे रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठ्या मनाचे आहात. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडता. प्रकृती सुदृढ असते.उत्तम वक्तृत्व,स्वतंत्र पणा, हरहुन्नरी पणा ही वैशिष्ट्य आहेत.मोठेपणा, प्रतिष्ठा, मान सन्मान याला जास्त महत्व देता. शिकवणे आणि अभ्यास करणे यात आनंद मिळतो.वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होतो.स्मरणशक्ती उत्तम असते.तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात. कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात. महत्त्वाकांशी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होऊ शकता. आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करता. स्वतःचाही व्यवसाय /नोकरी करून उत्पन्नात भर घालता. विनोदी स्वभाव, संभाषण कौशल्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते .अभ्यासू वृत्ती, तत्त्वज्ञानाची आवड ,विचारवंत असे लोक तुम्हाला प्रिय असतात.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- तांबडा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

आजचे राशिभविष्य

मेष

मैत्रिणींनो आज
आज कामाचा ताण असला तरी तुमच्या मेहनतीला योग्य प्रतिसाद मिळेल. आर्थिक बाबतीत एखादा चांगला निर्णय घेता येईल. घरातील महिलांशी संवाद सौम्य ठेवा. रात्रीनंतर मित्रमैत्रिणींशी आनंददायी चर्चा होईल.

वृषभ

मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. सौंदर्य, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्रातील महिलांना विशेष लाभ मिळू शकतो. मनात नवीन योजना तयार होतील. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

मिथुन

मैत्रिणींनो आज
रात्रीनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. दिवसभर थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, पण रात्रीपासून परिस्थिती सुधारेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.

कर्क

मैत्रिणींनो आज
मैत्री आणि सामाजिक संबंधांमधून लाभ मिळू शकतो. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील महिलांसोबत वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील.

सिंह

मैत्रिणींनो आज
करिअरमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. घर आणि काम यामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. रात्री आनंदाची बातमी मिळू शकते.

कन्या

मैत्रिणींनो आज
आज प्रवास, शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे मन आकर्षित होईल. महिलांनी आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास यश मिळेल.

तुळ

मैत्रिणींनो आज
आर्थिक व्यवहार जपून करा. अनावश्यक खर्च टाळा. भावनिक विषयांमध्ये संयम आवश्यक राहील. जोडीदारासोबत गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा.

वृश्चिक

मैत्रिणींनो आज
नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. विवाहित महिलांसाठी दिवस अनुकूल राहील. भागीदारीतून लाभ मिळू शकतो. रात्रीनंतर मन हलके आणि आनंदी वाटेल.

धनु

मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः थकवा आणि झोपेची समस्या टाळा. नियमित दिनचर्या फायदेशीर ठरेल.

मकर

मैत्रिणींनो आज
प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात प्रगती होईल.

कुंभ

मैत्रिणींनो आज
घरगुती कामांमध्ये व्यस्तता वाढेल. मालमत्ता किंवा घराशी संबंधित विषयांवर चर्चा होऊ शकते. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. रात्रीनंतर मन प्रसन्न राहील.

मीन

मैत्रिणींनो आज
संवादकौशल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. छोटा प्रवास किंवा नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकता. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
विवाह ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular