Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

शनिवार, *28 मार्च 2026*. चैत्र शुक्ल दशमी

राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30

आज चांगला दिवस . आज जन्मलेल्या बाळाची राशी कर्क आहे

*28* मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि गुरू ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुम्ही विशाल वृत्तीचे असून शाळा शैक्षणिक संस्था दवाखाने इत्यादी लोककल्याणकारी संस्थांना मदत करतात .एक, दहा एकोणीस या तारखेला जन्मलेल्या लोकांनी इतके तुम्ही नशीबवान नसता. अनेक अडचणींना आयुष्यात तोंड द्यावे लागते .भविष्यात पैशाची जपणूक सावधपणे करावी नाहीतर विश्वासघात होण्याच्या संभव असतो. नोकरीत सतत बदल करणे तुम्हाला आवडते. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येत नाही .अनपेक्षित बदल तुमच्या कौटुंबिक जीवनात घडतात तुम्ही संवेदनाशील असून छोटया छोट्या गोष्टी नी दुखावले जातात. मानमान्यता ,प्रतिष्ठान या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. महत्त्वकांक्षी असून अनेक गोष्टीत रस असतो. संभाषण कौशल्यामुळे दुसऱ्यावर सहजपणे छाप पडतात .तुम्ही स्वतंत्र विचारांचे वृत्तीचे असतात .कलेबद्दल आकर्षण असून उत्साहाने त्यात भाग घेतात उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते. त्रस्त भूमिकेतून इतरांना उत्तम सल्ला देता. एकाच विषयात फार काळ रमत नाही .मैत्रीमध्ये आणि व्यवसायामध्ये अनेक बदल होतात .मानवी स्वभाव ओळखण्याचे उपजत ज्ञान तुमच्याकडे असते .इच्छाशक्ती दांडी असून कोणताही विषय चांगल्या तऱ्हेने समजून घेता. मैत्रिणी ,नातेवाईकांशी प्रामाणिक राहता .जीवनात शिस्त कडकपणे पाळता. उदार मनाचे असले तरी भविष्यकाळातील गुंतवणूक नियोजन पूर्ण करतात. कोणत्याही प्रकारच्या समाजाचा सहजतेने मिसळतात .तुम्हाला समाजाविषयी कळकळ असून हुशार बुद्धिमान शेजाऱ्यांशी तुमचे जमून शकते. तुमचे जीवन समाधानी व सुखी असेल .इतरांच्या मानाने तुमचे राहणीमान वरच्या दर्जाचे असते. खर्चिकपणा असून घरामध्ये सर्व सुख सोयींनी नाविन्यपूर्ण वस्तू असतात पुस्तकांची ही आवड असते. तुम्हाला आरामशीर जीवनाची आवड असून घराची सजावट खर्चिक पद्धतीने केलेली असते. तुम्ही हुशार व दिसायला चांगले असतात .नृत्य व संगीताची आवड असते पण तिला उत्तम साथ देता .मात्र वैवाहिक साथीदाराची निवड योग्य रीतीने करावी .आपल्या साथीदार आपल्यासारखाच उत्साही ,सौंदर्यप्रेमी ,उत्तम कपड्यांची आवड असलेला, घरात व समाजात मिसळणारा असावा हे पहावे.

शुभरंग – पिवळा, जांभळा
शुभ वार-सोमवार, गुरुवार शुक्रवार,
शुभ रत्न- माणिक आणि पाचू पुष्कराज

*आजचे राशिभविष्य*

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून समाधान मिळेल. आई किंवा वडिलांशी संवाद साधल्याने मन हलके होईल. कामात थोडा ताण जाणवेल, पण संध्याकाळी आराम मिळेल.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
संवाद कौशल्यामुळे तुमची कामे सहज पूर्ण होतील. मैत्रिणी किंवा बहिणींसोबत वेळ घालवण्याचा योग आहे. छोट्या प्रवासाची शक्यता आहे.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत स्थिरता येईल. नवीन खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. कुटुंबासाठी काही खास करण्याची इच्छा होईल.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज तुमचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता मजबूत राहील. स्वतःसाठी वेळ काढा—मन प्रसन्न राहील.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
आज थोडे एकांतात राहण्याची गरज वाटेल. जुन्या गोष्टी आठवून भावनिक होऊ शकता. ध्यान किंवा प्रार्थना केल्याने मन शांत राहील.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींचा चांगला सहवास लाभेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. नवीन ओळखी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून समर्थन मिळेल. घर आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
भाग्य तुमच्या बाजूने आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल. प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. विवाहयोग्य महिलांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. सहकार्यामुळे कामे पूर्ण होतील.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
आरोग्याची काळजी घ्या. कामाचा ताण वाढू शकतो, पण नियोजन केल्यास सर्व सुरळीत होईल. आहार आणि दिनचर्या संतुलित ठेवा.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
आजचा दिवस आनंददायी आहे. प्रेमात यश. कला, संगीत किंवा आवडत्या छंदात यामध्ये मन रमवू शकता.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर8180828176
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
*सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular