लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 15/3/2026 क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति
“यस्यास्ति सर्वत्र गतिः स कस्मात् स्वदेशरागेण हि याति नाशम् । तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणा क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ॥”
जो कोठेही जाऊ शकतो (जाऊन स्वतःचा पराक्रम दाखवू शकतो) तो स्वतःच्या भोवतालच्या परिसराच्या आसक्तीने कशाला स्वतःचा नाश करून घेईल. ही आमच्या वडिलांची विहीर आहे, असे म्हणणारे भित्रे पुरुष (त्याच कूपातील साठलेले) रुचिहीन, खारट पाणी पीत राहातात. माणसांच्या कूपमंडुक वृत्तीवर या शब्दांत टीका केली जाते. घरातून बाहेर पडून स्वकर्तृत्वाने धन व कीर्ती मिळविण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असते तो वाडवडिलांनी मिळविलेल्या धनमानाच्या जुन्या साठ्यावर समाधान मानीत नाही.
संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.