लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारमहिलांसाठी ज्योतिष वार
शनिवार, 14 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण दशमी
राहू काळ – सकाळी 9 ते 10:30
आज सकाळी 8 नंतर चांगला दिवस आहे.
सूर्याचा मीन राशीत प्रवेश.
आज जन्मलेल्या बाळाची राशी धनु/सकाळी 9:33 नंतर मकर राशी(वरीया योग, विष्टि करण)
14 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला सुंदर असून लोकप्रिय असतात .दुसऱ्याला न दुखवण्याचा, मदत करण्याचा स्वभाव असतो .फारशी बडबड न करता हातसे राखून बोलता. तुम्ही चाणाक्ष असून निरीक्षण शक्ती उत्तम असते. शब्दात वकृति ठाम असतात .कोडी सोडवण्याचा छंद असतो. सुखी वैवाहिक जीवन असे परंतु मुले होण्याबाबत किंवा प्रसुतीबाबत त्रास होतो. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते .बऱ्याच वेळा घरातील लोकांकडून त्रास होण्याचा स्वभाव असतो.
तुमच्या धूर्तपणा झटपट व व्यापारी वृत्ती आहे. आपल्या आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात उत्तम उपयोग करता. स्वतःचे विचार दुसऱ्याला सांगण्याची हौस असते. तुमचे ध्येय कार्य आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न सतत करीत असता. तुम्हाला खेळण्याची व प्रवासाची आवड आहे .तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा आवडत नाही .तुम्हाला समाजात मिसळणे निरनिराळ्या समारंभात भाग घेणे आवडते. कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे याचा मार्गदर्शन आपोआप मिळते. सहकारी वृत्ती असून दुसऱ्याला मदत करायला आवडते धर्म व तत्वज्ञान गोष्टीच्या आवड असते. हातातील कामात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता .तुमच्या महत्त्वकांक्षा हा आर्थिक आणि वैचारिक स्वरूपाचे असतात भविष्यात चढ-उत्तर अपेक्षित असतात. पैशाच्या बाबतीत निष्कळजी असल्यामुळे काहीच पैशाची साठवण कमीच असते. चाणाक्ष दृष्टिकोनामुळे यश मिळते, कष्टाची चीज होते. पतीला योग्य ती साथ तुम्ही देता ,त्याच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करतात. आरामशीर आयुष्याची आवड असून बराच वेळ आपल्या रिकामपणात घालवता. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता .घरात टापटीप , व्यवस्थित पणा ठेवता पण ही कामे दुसऱ्यांकडून घेण्यात तुम्ही हुशार असता.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रंग – पांढरा, पिवळा ,हिरवा
शुभ रत्ने:-हिरा, पाचू किंवा नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज दशमस्थानी जाणारा चंद्र
आज कामात वेग येईल. एखाद्या नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. बोलताना थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज नवमस्थानी जाणारा चंद्र
भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभदायक ठरेल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज अष्टमस्थानी जाणारा चंद्र
आज आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. शांतपणे विचार केल्यास योग्य निर्णय घेता येईल.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज सप्तमस्थानी जाणारा चंद्र
नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदार किंवा सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतल्यास फायदा होईल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज षष्ठस्थानी जाणारा चंद्र
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज पंचमस्थानी जाणारा चंद्र
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांकडून किंवा कुटुंबातून आनंदाची बातमी मिळू शकते. कला, शिक्षण किंवा आवडीच्या गोष्टींसाठी दिवस चांगला आहे.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी जाणारा चंद्र
घरगुती कामात व्यस्त रहाल. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. शांतपणे निर्णय घेणे आवश्यक आहे.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज तृतीयस्थानी जाणारा चंद्र
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
♐ धनु
मैत्रीणींनो आज धनस्थानी जाणारा चंद्र
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल. बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे.कटू बोलणे टाळा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
सकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येणार असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना किंवा काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.अनपेक्षित लाभ होतील.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज व्ययस्थानी जाणारा चंद्र
मन थोडे अंतर्मुख राहू शकते. शांतपणे विचार करण्यासाठी वेळ मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढू शकतो.
♓ मीन
मैत्रीणींनो आज लाभस्थानी जाणारा चंद्र
मित्रमैत्रिणी किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. सामाजिक संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात.मन आनंदी राहील.
ज्योतिष शास्त्रानुसार.गुन मिलन. सर्व बाबतीत अचुक सल्ला.श्री निलेश अंबादास वसंतराव. बेंगलोर.मोबाईल .9561796324.