Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

सोमवार, 2 मार्च 2026. फाल्गुन शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा

राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9

आज होलिका वर्ज्य दिवस .
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क/सकाळी 7:52 नंतर सिंह रास(अतिगंड योग, विष्टि करण शांती)

2 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरू आणि चंद्राचा प्रभाव आहे. तुम्ही अतिशय प्रेमळ आपुलकी दाखवणाऱ्या व निष्ठावान आहात .तुम्ही लहरी आणि प्रतिष्ठा जपणाऱ्या असता. दिमाख व वैभवशाली जीवनाकडे ओढ असते .बाग बगीचा व पाळीव जनावरांची आवड असते .घरात आनंद व शांतता ठेवण्याची तुमची वृत्ती असते .आपल्या पतीला सर्व प्रकारे साथ देण्यात तुम्ही वाकबगार असता. उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या चांगली कल्पनाशक्ती आहे. तुम्ही इतरांचे ऐकून घेतात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे करतात. इतरांच्या भावनांची तुम्ही कदर करतात. चांगले आणि वाईट यात तुम्ही फरक करू शकतात. तुमचे ध्येय काय आहे याची तुम्हाला स्पष्ट कल्पना असते. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. कामात टापटीप असते. दूरच्या प्रवासाची आवड असते. तुम्ही इतरांना सहजपणे आकर्षित करतात. धर्मबद्दल ओढ आहे मात्र कर्मकांडवर विश्वास नाही. निसर्गाबद्दल प्रेम आहे. समुद्र आणि खगोल यांची आवड असते. वयाच्या 29 नंतर उत्कर्ष होतो. इतरांना मदत करणे आवडते. सहानुभूती वाटते. मोठमोठे प्रकल्प हाती घेऊन तुम्ही ते पूर्णत्वास नेतात.

शुभ रंग – पांढरा, बदामी, जांभळा.
शुभ वार-सोमवार, गुरुवार शुक्रवार,
शुभ रत्न- मोती,हिरा
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
सकाळी घरगुती तणाव संभव. नंतर कामात उत्साह वाढेल.
धाडसी निर्णय घेण्याची इच्छा होईल पण घाई टाळा.
खर्चावर नियंत्रण.
रागामुळे वाद होऊ शकतो.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
भावंडांशी किंवा जवळच्या व्यक्तींशी वाद टाळा. दुपारनंतर प्रतिष्ठा वाढेल.
वरिष्ठांशी संयम ठेवा.
आर्थिक स्थिरता लाभेल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
सकाळी आर्थिक विषयांवर तणाव. दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल.
प्रेझेंटेशन यशस्वी.
अहंकार टाळा.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज
सकाळपर्यंत चंद्र आपल्या राशीत — भावना तीव्र राहतील. रागावर नियंत्रण ठेवा. शांतपणे काम केल्यास यश. पोटदुखी/अॅसिडिटीचा त्रास संभव.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
7:52 नंतर चंद्र आपल्या राशीत — आत्मविश्वास वाढेल. पण मंगळ प्रतियुतीमुळे अहंकार टाळा.
करिअरमध्ये नेतृत्वाची संधी.
जोडीदाराशी सौम्यपणे बोला.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
गुप्त चिंता त्रास देऊ शकतात. दुपारनंतर एकांत लाभदायक.
कामात संयम आणि नियोजन आवश्यक.
खर्च वाढू शकतो.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
मित्रपरिवारात मतभेद संभव. दुपारनंतर सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
टीमवर्कमध्ये संयम ठेवा.
पतीशी स्पष्ट संवाद आवश्यक.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
कार्यक्षेत्रात तणाव संभव. वरिष्ठांशी वाद टाळा.
आर्थिक गुंतवणूक पुढे ढकला.
रागावर नियंत्रण ठेवा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
भाग्याची साथ आहे पण उतावळेपणा टाळा. प्रवासात सावधगिरी.
कामात नवीन कल्पना लाभदायक.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
भावनिक चढउतार संभव. आर्थिक व्यवहारात सावधगिरी.
शांतपणे काम करा.
जोडीदाराशी गैरसमज टाळा.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
जोडीदाराशी वाद होऊ शकतो. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.
आर्थिक स्थिरता.
प्रेमात संयम आवश्यक.

♓ मीन

मैत्रीणींनो आज
आरोग्याची काळजी घ्या. कामाचा ताण वाढू शकतो.
आर्थिक मध्यम लाभ.
जोडीदाराला समजून घ्या.

RELATED ARTICLES

Most Popular