लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार शनिवार, 31 जानेवारी 2026. माघ शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी
राहुकाळ – सकाळी 9 ते 10:30
आज क्षय तिथी आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन/रात्री 8:01 नंतर कर्क(विषकंभ योग)
31 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर हर्षल आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुमच्याकडे महत्त्वाकांक्षा अभिमान व तपस्या असते. धर्मादाय संस्था, मूकबधिर अपंगांकरता असलेल्या संस्था यामध्ये काम करण्याची आवड असते, त्यापासून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. वयाच्या 40 वर्षानंतर भाग्योदय होतो. परंतु यश व कीर्ती लवकर व झटपट मिळावी अशी अपेक्षा असते. पैशाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. व्यावहारिक दृष्टिकोन असून इच्छाशक्ती जबर असते .तुम्हाला प्रवासाची खूप आवड असते. स्वतःच्या मताप्रमाणे व निर्णयाप्रमाणे तुम्ही कृती करता. स्वतःच्या कल्पना दुसऱ्यांच्या मदतीने राबवण्याची कला तुमच्या अंगी आहे.
तुम्ही तल्लख व आकर्षक आहात .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन आहात. तुमचा स्वभाव हरहुन्नरी असून कोणत्याही गोष्टीचा खोल अभ्यास करीत नाही .घरातील इंटेरियर उत्तम असावे असे तुम्हाला वाटते पण ते काम तुम्ही दुसऱ्यांकडून उत्तम प्रकारे करून घेतात. बऱ्याच वेळा स्वतःचा वर चढपण दाखवण्याची लहर येते. काही वेळा चमत्कारिक स्वभावामुळे सबंध दिवस खराब जातो. तुम्हाला घराबद्दल आपलेपण आहे पण ओढ नाही.हे बऱ्याच वेळा अस्वस्थ असतात .तुम्ही तामसिक असून कठोरपणा दिसून येतो .घरातील सर्व लोकांनी तुमच्या तालावर नाचावे अशी तुमची वागणूक असते. स्त्री सुलभ प्रेम किंवा मृदूपणा याचा अभाव हा तुमचा मुख्य दोष आहे.
तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. तुमच्यात जोम आणि उत्साह असतो. मानवाच्या कल्याणासाठी तुम्ही झटतात. संधी मिळाल्यास तुम्ही उत्तम प्रगती करतात. चिकित्सा, तार्किक विचारशक्ती, वागण्यातील कुशलता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या अडचणींवर तुम्ही लीलया मात करू शकतात. तुम्ही काहीसे हट्टी, दुराग्रही असू शकतात. सतत वादविवाद टाळले पाहिजेत अन्यथा तुम्हाला गुप्तशत्रू तयार होतात. तुम्ही अन्यायाचा तीव्र प्रतिकार करतात.
शुभ दिवस – सोमवार, शुक्रवार, शनिवार.
शुभरंग – निळा
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज सकारात्मक मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठ महिला किंवा गुरूसमान व्यक्तीकडून मदत मिळू शकते. संध्याकाळनंतर घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
चंद्र–गुरू योगामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. शुक्र–गुरू षडाष्टकामुळे नात्यांत अपेक्षा जास्त ठेवू नका.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
दिवसभर चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन सक्रिय राहील. संवाद, लेखन, शिकवणी यशस्वी. रात्रीनंतर भावनांवर थोडा ताबा ठेवा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज चन्द्र व्यय स्थानी आहे.दगदग ,धावपळ होईल.
रात्री ८:०१ नंतर चंद्र तुमच्या राशीत – भावनिक समाधान, सुरक्षिततेची भावना वाढेल. स्त्रियांसाठी आजचा शेवटचा भाग खूप दिलासादायक.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
कामात स्थैर्य येईल. चन्द्र शनी त्रिकोणामुळे मेहनतीचे फळ मिळेल. मात्र नात्यांत अहंकार टाळा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज चंद्र
नेपच्यून त्रिकोणामुळे अंतःप्रेरणा मजबूत राहील. संशोधन, आरोग्य, सेवा क्षेत्रात लाभ. भावनिक निर्णय टाळा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
प्रेम व मैत्रीत गोडवा राहील, पण अपेक्षा कमी ठेवा. संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टळतील.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चन्द्र हर्षल लाभ योगामुळे अचानक संधी मिळू शकते. जुने बंधन तुटण्याचा दिवस. भावना नियंत्रणात ठेवा.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
चंद्र–गुरू योग तुमच्यासाठी शुभ. शिक्षण, मार्गदर्शन, आध्यात्मिक गोष्टीत प्रगती.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
शनी त्रिकोणामुळे संयम आणि शिस्त वाढेल. घर-कार्यालय समतोल साधता येईल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
नवीन कल्पना सुचतील. अचानक बदल संभवतात, पण फायदेशीर ठरू शकतात. रात्रीनंतर मन शांत होईल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
चंद्र–नेपच्यून त्रिकोणामुळे करुणा, प्रेम, सर्जनशीलता वाढेल. स्त्रियांसाठी भावनिक समाधान देणारा दिवस.संतती कडून शुभ समाचार मिळे