लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार रविवार,25 जानेवारी 2026. माघ शुक्ल सप्तमी
रथ सप्तमी, भानू सप्तमी
.
राहुकाळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
“आज उत्तम दिवस आहे” *
आज जन्मलेल्या बाळाची रास मीन/दुपारी 1:36 नंतर मेष
आजचे राशिभविष्य आणि
25 जानेवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर नेपच्यून आणि शनि या बरोबरच चंद्र आणि बुध यांचेही ग्रहांचे वर्चस्व आहे. तुमचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी आहे, त्यामुळे कोणत्याच विषयावर प्रभुत्व नसते. प्रवासाची आवड असून परदेशाशी संबंध येतात .तुम्ही प्रामाणिक व निष्ठावान विश्वासू आहात.चंद्र व नेपच्यून या ग्रहांमुळे स्वभाव अति चंचल असतो ,त्यामुळे काही वेळा विसंगत स्वभावाचे दर्शन होते. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे .वक्तृत्व शक्ती चांगली असल्याने उत्तम शिक्षक होऊ शकतात .तुमचे व्यक्तीमत्व मूलतः च स्वतंत्र आहे.दूरच्या प्रवासाची आवड असून काहींना काही निमित्ताने परदेशा शी संबंध येतो.चाकोरीबद्ध आयुष्य पसंत नसते.नेपच्यून ग्रह अध्यात्मिक तत्त्वाचा असल्याने उच्च कोटींचा अहंकार वैयक्तिक रित्या जोपासला जातो. पक्ष्यांकडे प्रमाणे सोयीरवृत्ती आवडते .मोठमोठे भविष्यवाणी अध्यात्मवादी यांच्यावर नेपच्यून ग्रहाचे प्राबल्य असू शकते .तुमची वागणूक बऱ्याच वेळा गुढ असते. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्यांच्या मताची उपेक्षा केली जाते पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे .काही वेळा तुम्ही बेफिकीर व उदास वृत्तीचे असता.तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींची निवड करतात. सर्वसाधारण विचारसरणीच्या किंवा सामान्य माणसात मिसळणे तुम्हाला आवडत नाही. आयुष्यात सतत बदल आवडतो पुस्तक वाचनाची आवड असते .स्वतःचे ज्ञान अधिकार याची जाणीव असते. सल्ला विचारल्यास तुम्ही अधिकाऱ्याने व खंबीरपणाने देता .खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. स्वतंत्र बाणा असतो .तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते .स्वभाव आनंदी व उत्साही असतो. आयुष्यात सतत बदल होत असल्याने पैशाची बचत करणे कठीण होते .आवडीची नोकरी मिळाल्यास जीवनात चांगला पैसा मिळवून स्थिरता प्राप्त होते .आराम ,सुख सोयी उपलब्ध होतात पण आर्थिक स्थैर्य फार उशिरा मिळते .तुम्ही अतिशय हुशार आहात परंतु तुमचे वागणे अनाकलनीय असते. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत राहता. मित्र मैत्रिणींसोबत मेजवानी करणे आवडते. तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते खास करून . स्वभावाने नम्र असून एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल परंतु इतरांवर वाईट परिणाम होऊ देत नाहीत. चांगले पत्नी म्हणून तुमचे कौतुक केले जाते.
शुभ दिवस- सोमवार ,बुधवार गुरुवार
शुभ रंग- हिरवा, पिवळा जांभळा
शुभ रत्न – पुष्कराज पाचू,लसण्या(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासुन घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज सकाळी जरी कंटाळवाण वाटलं तरी
दुपारनंतर चंद्र तुमच्या राशीत येताच तुमचा उत्साह प्रचंड वाढेल. महिलांना पुढाकार घ्यावासा वाटेल.
अधीरता, चिडचिड होइल.
बोलण्यात कठोर पण येईल.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
सकाळी घरगुती वातावरण शांत असेल, पण दुपारनंतर अंतर्गत अस्वस्थता. जुन्या गोष्टी पुन्हा उफाळून येतील.
नात्यात दबलेली नाराजी उफाळून येईल.
सुरक्षिततेची गरज वाटेल.सबुरीने घ्या.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
विचार आणि शब्द दोन्ही धारदार होतील. दुपारनंतर कोणाचं बोलणं मनाला लागेल.
निर्णय पटकन घ्याल य.
जोडीदाराशी वादाची शक्यता.
शब्द जपून वापरा.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
सकाळी भावनिक कोमलता, दुपारनंतर असुरक्षिततेतून राग.
मनात खूप काही सहन केल्याची भावना येईल.
रडावंसं वाटेल.पण शांततेत व्यक्त व्हा.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो. कोणीतरी तुमचं महत्त्व कमी करतंय असं वाटेल.
अधिकाराचा संघर्ष राहील.माझं ऐका” असा हट्ट सोडा.नम्र रहा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
ताण आज साचलेला बाहेर येईल. महिलांना शारीरिक थकवा जाणवेल.
आरोग्य सांभाळा.
सगळं नियंत्रणात ठेवायची धडपड दूर करा. स्वतःवरची अपेक्षा कमी करा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
नातेसंबंधात टोकाची प्रतिक्रिया. आज “समतोल” राखणं कठीण जाईल.
समोरच्याचाही दृष्टिकोन ऐका.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चंद्र–प्लूटो प्रभावामुळे भावनिक स्फोट. पण जाचातून मानसिक मुक्तता.
मनातल्या जुन्या जखमा उघडतील, मौन, ध्यानधारणा उपयोगी ठरेल.पाणी जवळ ठेवा.
♐ धनू
मैत्रीणींनो आज
दुपारनंतर उत्साह आणि धाडस वाढेल. काहीतरी नवीन सुरू करावंसं वाटेल.
पुढाकार घ्याल.
उतावळेपणा टाळा.योजना आखून कृती करा.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
जबाबदाऱ्या आणि अधिकार यांचा संघर्ष. कोणीतरी तुमच्या निर्णयाला विरोध करेल.
दडपण राहील.
तुमचा शब्द अंतिम हवा हा हट्ट सोडा.
शांतता राखून,स्पष्टतेने बोला.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
आज तुमचं मत ठाम राहील, पण इतरांना ते कठोर वाटू शकतं.
सामाजिक वादाची शक्यता
शब्दांमध्ये सौम्यता ठेवा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
सकाळी चंद्र तुमच्या राशीत – मन आनंदी असेल. दुपारनंतर तीच भावना अस्वस्थतेत बदलेल.
कोमलतेतून आक्रमकतेकडे वाटचाल राहील.
स्वतःची सीमा ओळखा
🌼 आजचा विशेष उपाय (महिलांसाठी)
🪔 संध्याकाळी लाल व पांढरा दिवा एकत्र लावा
🙏 “ॐ चंद्राय नमः” ७ वेळा, “ॐ मंगळाय नमः” ७ वेळा
💧 थंड पाणी प्या, चेहऱ्यावर पाणी शिंपडा