Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं गुरूवार, 25 डिसेंम्बर 2025.
पौष शुक्ल पंचमी/षष्ठी.

राहू काळ: दुपारी 1:30 ते 3

आज उत्तम दिवस आहे.ख्रिसमस
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ
(वज्र्य योग)

25 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर नेपच्यून आणि गुरु या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला परदेशाचे आकर्षण असते. परदेशाशी संबंध येतात .तुमच्या प्रामाणिकपणा ,विश्वासूपणा असून तुम्ही निष्ठावान असतात. चंद्र व नेपच्यून या ग्रहामुळे स्वभाव अति चंचल असतो. त्यामुळे काही वेळा विसंगत स्वभावाचे दर्शन होते .तुमची स्मरणशक्ती उत्तम असते. कोणत्याही एका विषयात फार रमणे तुम्हाला जमत नाही. हरहुन्नरी व्यक्तिमत्व असूनही कोणत्याही एका विषयात प्रभुत्व नसते. तुम्ही उत्कृष्ट वक्ता किंवा शिक्षक होऊ शकता .तुमचे ध्येय व महत्त्वकांक्षा उच्च प्रतीच्या असतात. तुम्ही निसर्गतः अस्वस्थ असतात. तुमच्यात उच्च विचार व व्यावहारिक दृष्टिकोन या दोन्हीची मिश्रण असल्यामुळे तुमच्या वागण्यात काही वेळा विसंगती आढळते .सामर्थ्य व कमकुवतपणा या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला अनुभव व्हायला येतात .उच्च कोटीचा अहंकार वैयक्तिकरित्या जोपासला जातो .परदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते .सामान्य व्यक्तींमध्ये तुम्ही मिसळू शकत नाही .पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. आयुष्यात सतत बदल आवडतो. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्या मता दुसऱ्याच्या मताची उपेक्षा केली जाते .आवडत्या पुस्तकांबरोबर तासन्तास घालवणे तुम्हाला जास्त आवडते. स्वतःचे ज्ञान व अधिकार याची तुम्हाला पूर्ण जाणीव असते .मनाने मोकळे असून विचारात व कृतीत मोकळेपणा असतो .स्वभावाने आनंदी व उत्साही असा तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. घराची सजावट खर्चिक पद्धतीने केलेली आवडते. अतिशय अस्वस्थ असून लहान गोष्टींवरून चिडता.

मित्र-मैत्रिणींना बोलवणे, मेजवानी देणे ,आदरातिथ्य करणे तुम्हाला आवडते. नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते.
. तुम्ही हुशार असून चांगल्या गृहिणी म्हणवता .ज्या लोकात आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा व उत्तम शिष्टाचार आहे शिवाय ते अभ्यासू पण आहेत अशा लोकांकडे तुम्हाला जाणे येणे आवडते. जीवनात चांगली आवडीची नोकरी मिळाल्यास उत्तम पैसा मिळतो व स्थिरता प्राप्त होते .जीवनात आराम सर्व सुख सोयी उपलब्ध होतात. वयाच्या 52 वर्षानंतर आर्थिक स्थिती मजबूत होते .कष्टाचे चीज होते. जन्म ठिकाण पासून लांब अंतरावर तुम्ही स्थायिक होता व तेथे पैसा मिळतो.

शुभ दिवस:रविवार,सोमवार, बुधवार, गुरुवार

शुभ रंग:- हिरवा,पिवळा, जांभळा

शुभ रत्ने: पुष्कराज,पाचू,चंद्र खडा(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घेणे)

आजचे राशिभविष्य

मेष:- मैत्रीणींनो आज छानदिवस आहे. लाभस्थानी चन्द्र आहे.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.खूप दिवसापासून ची इच्छा पूर्ण होईल.मानसन्मान मिळेल.

वृषभ:- मैत्रीणींनो आज मौल्यवान खरेदी होईल. कामाची जबाबदारी वाढेल.मनाप्रमाणे जाणारा दिवस.

मिथुन:-मैत्रीणींनो आज वक्तृत्व चमकेल. प्रिय व्यक्ती सोबत आनंद घ्याल.प्रवास घडेल.नात्यात भेटीगाठी होतील.

कर्क:-मैत्रीणींनो आज घरातील व्यक्ती विषयी चिंता वाटेल.विमा किंवा तत्सम मधून लाभ होईल.आरोग्यासाठी खर्च होईल.मन अस्वस्थ राहील.वाहन जपून चालवा.

सिंह:-मैत्रीणींनो आज कार्यक्षमता वाढेल.नेतृत्व उजळून निघेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.

कन्या:- मैत्रीणींनो आज महिला सहकारी कामात साथ देतील.आरोग्य सांभाळा. कामाचे कौतुक होईल.

तुळ:- मैत्रीणींनो आज पंचमात चन्द्र आहे.सौख्य लाभेल. छोटी सहल घडेल.मस्त मेजवानीचा लाभ घ्याल.संतती कडून खुष खबर मिळेल.प्रेमीकाना यश.विवाह जुळण्याची शक्यता. सौदर्य,कलाकारांना यशदायक काळ.

वृश्चिक:- मैत्रीणींनो रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यात यश.वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.घरातल्या सजावटीसाठी खर्च कराल.सरकार कडून लाभ होतील.

धनु:- मैत्रिणींनो आज सौख्य लाभेल. मन आनंदी राहील.शैक्षणिक यश लाभेल.मुलांकडून छान बातमी मिळेल.छोटे प्रवास घडतील.मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल.

मकर:- मैत्रीणींनो आज कौटुंबिक सौख्य लाभेल.कलाकारांना सुसंधी मिळेल.पतीकडून साथ मिळेल.कामात नवीन जबाबदारी यशस्वी कराल.

कुंभ:- मैत्रीणींनो आज संपन्नता अनुभवाल.तुमच्याच राशीत चन्द्र आहे. मानसन्मान मिळेल.स्वतःसाठी वेळ द्याल.आरोग्य सुधारेल.संध्याकाळ मनोरंजनाची.

मीन:- मैत्रीणींनो आज संमिश्र दिवस.आर्थिक लाभ होतील. मनाला आनंद देणारा.पण खर्च ही होईल.

RELATED ARTICLES

Most Popular