लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं बुधवार, 24 डिसेंम्बर 2025.
पौष शुक्ल चतुर्थी/पंचमी
राहू काळ:- दुपारी 12 ते 1:30
आज दुपारी 1 नंतर चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर/संध्याकाळी 7:46 नंतर कुंभ
(हर्षण योग, विष्टी करण शांती)
24 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शुक्र आणि गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जन्मताच कलाकार व कलाप्रिय आहात. उदार व विशाल मनाचे असून दुसऱ्याचा आदर सत्कार करणे आवडते. महत्त्वकांक्षी असून आपल्या विषयाची पूर्ण माहिती असावी असे तुम्हाला वाटते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्याने भेटणाऱ्याला आनंद वाटतो. मोहक व आकर्षक बोलण्यामुळे तुमच्याकडे लोक ओढले जातात .निसर्गतः समजूतदारपणा असून आतल्या आवाजाची देणगी असते. स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल विश्वास त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. संभाषण किंवा बोलण्यामध्ये प्रवीण असतात. जीवनात अधिकार व मान मिळतो. उच्च पदाला जाण्याची महत्त्वकांक्षा थोडा गर्विष्ठ पणा असतो. एकांत वास प्रिय असतो. आयुष्य आरामदायक व सुख मिळवण्याकडे कल असतो. उच्च प्रतीचे दाग दागिने, कपडे, सुगंधी द्रव्ये इत्यादीचे तुम्हाला आकर्षण वाटते. स्वतःच्या विचारात आणि कृतीमध्ये स्वतंत्र वृत्ती असते दुसऱ्या कोणाचेही वर्चस्व तुम्हाला खपत नाही .तुम्ही उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी समाजाला तुमची गरज असते. दुसऱ्याच्या दुःखाचा सहानुभूती पूर्ण विचार करता. आर्थिक स्थितीबाबत तुम्ही तसे नशीबवानच असतात. अनपेक्षित पणे पैसा मिळतो. पण बचत करण्याची सवय नसल्यामुळे आर्थिक बाबतीत अडचणी येतात. वैवाहिक जीवनाच्या येणाऱ्या अडचणींवर तुम्ही शांतपणे तोंड देऊ शकता .उत्कृष्ट गृहिणी गृहकृत्यदक्ष असतात .पतीशी जुळवून घेण्याबाबत हुशार असतात. समाजप्रियतेमुळे घरी येणारे जाणारे ची वर्दळ असते. आरोग्य आणि सुदृढ असतात रुढीबद्ध आयुष्य तुम्हाला आवडत नाही तरी तुम्ही स्वभावाने नम्र असतात. निष्ठावान, जबाबदार, प्रेमळ आई पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता .ज्यांच्यामध्ये महत्त्वकांक्षा, अधिकार आहे अशांबाबत तुम्हाला ओढा असतो. धार्मिकता तत्वज्ञान आहे असे आमचे विचार ऐकण्यात तुम्हाला आनंद होतो. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणाऱ्या लोकांकडेच जाणे येणे आवडते..
शुभ दिवस:- सोमवार,मंगळवार गुरुवार,शुक्रवार
शुभ अंक:- 2, 3, 4,6.
शुभ रंग:- निळा,गुलाबी, जांभळा
शुभ रत्ने: हिरा,पाचू,मोती
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज मन थोडं चंचल राहील. घर, काम आणि स्वतः यामध्ये ओढाताण होऊ शकते. पण संध्याकाळनंतर मन प्रसन्न होईल. मैत्रिणीशी बोलल्याने दिलासा मिळेल. प्रेमात बोलताना जरा हळुवार राहा.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आज तुमचं मन खूप भावूक राहील. नात्यांमध्ये जिव्हाळा वाटेल, पण अपेक्षा जास्त ठेवू नका. कला, सजावट, संगीत यामध्ये मन रमेल. खर्च करताना थोडं भान ठेवा.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
आज डोक्यात बरेच विचार येतील. काय करावं, काय नको – असा गोंधळ जाणवेल. संध्याकाळनंतर मात्र स्पष्टता येईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, विश्रांती घ्या.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
नाती आज खूप महत्त्वाची वाटतील. जोडीदार, कुटुंब यांच्याशी संवाद साधताना समजूतदारपणा ठेवा. थोडी भावनिक अस्थिरता जाणवू शकते, पण प्रेमाने सगळं सावराल.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. तुमचं नेतृत्व आणि आत्मविश्वास दिसून येईल. मात्र घराकडे दुर्लक्षित करू नका. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
आज मन शांततेचा शोध घेईल. जुन्या आठवणी, भावना वर येतील. एखादं सर्जनशील काम, वाचन, लिहिणं यामुळे मनाला आधार मिळेल. अति विचार टाळा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या यामध्ये दिवस जाईल. घर सजवणं, स्वच्छता, बदल करावासा वाटेल. प्रेमात थोडी स्वप्नाळू भावना राहील, पण वास्तव लक्षात ठेवा.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज शब्द जपून वापरा. मनातलं लगेच बोलण्याऐवजी थोडा विचार करा. संध्याकाळनंतर मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मन मोकळं होईल.
♐ धनु
मैत्रीणींनो
आज पैशांच्या देवघेव करताना सावध रहा. कुटुंबातील महिलांशी जिव्हाळा वाढेल. प्रेमात थोडी असुरक्षितता जाणवेल, पण संवादाने सगळं ठीक होईल.
♑ मकर
मैत्रीणींनो
आज चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. “मी सगळं करते” अशी भावना येऊ शकते. स्वतःवरही प्रेम करा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज सकाळ जरी कंटाळवाणी असली तरी
संध्याकाळनंतर तुमचा मूड बदलू लागेल. नवीन विचार, वेगळी दृष्टी मिळेल. सामाजिक काम, मैत्री, गप्पा यामुळे आनंद मिळेल. स्वतःला मोकळं ठेवा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
आज मन खूप हळवं राहील. लवकर रडू येऊ शकतं, लवकर भावना दुखावू शकतात. ध्यान, प्रार्थना, संगीत यामुळे मन शांत ठेवा. स्वतःशी प्रेमाने वागा.