लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं सोमवार, 24 नोव्हेंबर 2025. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
आज सकाळी 8 पर्यन्त चांगला दिवस.विनायकी चतुर्थी
आज जन्मलेल्या बाळाची रास धनू
(विष्टि करण, शूल योग )
24 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महि लांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
उच्च पदस्थ लोकांकडून मदत मिळण्याबाबत तुम्ही नशिबवान असतात. विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो .विवाह नंतर भाग्योदय होतो. विरुद्ध लिंगी व्यक्ती पासून फायदा होतो .दुसऱ्या वर हुकूमत गाजवणे आवडते .स्मरणशक्ती उत्तम असते. काही वेळा अहंकारी वृत्ती असून स्वतःची मते दुसऱ्या लादली जातात .प्रेम सहानुभूती आदर याचे प्रतीक म्हणजे शुक्रदेवता तुम्ही जन्मतः कलाकार आणि कला प्रिय आहात तुमचा सहवास उत्साहवर्धक असतो. उद्योगाचे किंवा व्यवसायाचे संघट संघटन करण्याची क्षमता तुमच्यात आहे .स्वतंत्रपणे काम करण्याची आवड असून कोणाची लुडबुड सहन होत नाही. डोके शांत ठेवल्यास अतिउच्च जागा भूषवणे शक्य होते ,परंतु हट्टीपणामुळे शत्रुत्व निर्माण होऊन आयुष्यात अडचणी येतात .बोलण्यात आकर्षण व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमचा प्रभाव पडतो. सामाजिक रूढी बंधनांना तुम्ही फाटा देता .तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते तुमच्या सहा भाग्यांक हा सौंदर्य ,आरोग्य ,सामर्थ्य, प्रेम आपुलकी ,आकर्षण याचा निदर्शक आहे .पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळू शकतो परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्च करण्याची वृत्ती असते .उच्च प्रतीचे कपडे ,दाग दागिने सुगंधी द्रव्य ,जडजवाहीर, विविध सुंदर वस्तूचे तुम्हाला आकर्षण वाटते. स्वतःच्या प्रेमसंबंधावर दुसऱ्याकडून होकाराची शक्यता असेल तरच पुढे पाऊल टाकता. तुम्ही कामात पद्धतशीर व अभ्यासू , उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी समाजाला तुमची जरुरी असते. पैसा मिळवणे व संचय करणे हे तुमचे ध्येय नाही .तुम्ही खर्चिक असूनही सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा मिळतो .स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी पैसा खर्च होतो. कले कलेसाठी खर्च केलेल्या पैशाबद्दल कधीच पश्चाताप होत नाही. उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असता. तुम्ही हुशार हरहुन्नरी कर्तुत्ववान व पतीशी जुळवून घेणाऱ्या असता.समाजप्रिय असता, त्यामुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते स्वभावाने नम्र असतात. एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल पण इतरांवर त्याचा वाईट परिणाम होऊ देणार नाही. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकतात त्याच्या व्यवसायात मदत करता.ज्यांच्या धैर्य आक्रमकता पुढारीपणा वक्तृत्व आहे अशाबद्दल तुम्हाला जवळीक वाटते.
शुभ दिवस:- बुधवार ,शुक्रवार आणि सोमवार ,मंगळवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी
शुभ रत्न:- हिरा ,मोती आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
♈ मेष महिला
मैत्रीणींनो आज
कामात निर्णयक्षमता वाढेल. वरिष्ठांकडून पाठबळ. नात्यांमध्ये संवाद सुधारेल. आरोग्य चांगले.
♉ वृषभ महिला
मैत्रीणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडतील. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. प्रेमसंबंधात समजूतदारपणा.
♊ मिथुन महिला
मैत्रीणींनो आज
पार्टनरशी संवाद मोकळा. अडकलेले काम पुढे सरकेल. आज शब्दांना ताकद, त्यामुळे बोलताना जपून.
♋ कर्क महिला
मैत्रीणींनो आज
स्त्रियांसाठी कामातील प्रगती. आरोग्यात सुधारणा. घरातील शांतता टिकेल. भावनिक स्थिरता वाढेल.
♌ सिंह महिला
मैत्रीणींनो आज
क्रिएटिव्ह कामात चमक. मुलांबाबत छान बातमी मिळेल . प्रेमात सौम्यता व आकर्षण वाढेल.
♍ कन्या महिला
मैत्रीणींनो आज
घरात सजावट, नूतनीकरण, किंवा स्त्रीसौंदर्याशी संबंधित गोष्टींना शुभ दिवस. मातृभाव वाढेल.
♎ तुळ महिला
मैत्रीणींनो आज
बुध लाभ असल्याने कम्युनिकेशनमध्ये तुम्ही सर्वांना प्रभावित कराल. सोशल सर्कलमधून लाभ. प्रवासाची शक्यता.
♏ वृश्चिक महिला
मैत्रीणींनो आज
चंद्र–शुक्र लाभामुळे आर्थिक फायदा किंवा वस्तू/गिफ्ट मिळण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
♐ धनू महिला
मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत — व्यक्तिमत्त्व तेजस्वी. आज सौंदर्य, स्टाइल, निर्णयक्षमता अतिशय उत्तम. मात्र भावनिक अतिरेक टाळा.
♑ मकर महिला
मैत्रीणींनो आज
थोडा अंतर्मुख दिवस पण शांत. आध्यात्मिक विचार वाढतील. रात्री मानसिक शांतता मिळेल.
♒ कुंभ महिला
मैत्रीणींनो आज
मैत्रिणी, सहकारी यांच्याकडून मदत. टीमवर्कमध्ये तुम्हीच प्रमुख. नवीन योजना तयार होतील.
♓ मीन महिला
मैत्रीणींनो आज
कामात यश. वरिष्ठांकडून कौतुक. आज स्त्रियांना विशेष मान-सन्मान मिळू शकते.