Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक वार गुरूवार, 20नोव्हेंबर 2025*. कार्तिक अमावस्या

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज वर्ज्य दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास वृश्चिक.(नाग करण, किंस्तुघन योग शांती)

20 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर चन्द्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय हा समुद्र, नदी अशा पाण्याच्या ठिकाणी होतो.विवाहानंतर भाग्योदय होतो.मैत्र परिवार फार मोठा असतो.लेखनाची आवड असते.स्वतःच्या विचाराबद्दल दुराग्रही असता.मान अपमानाच्या विलक्षण कल्पना असून थोडक्या बाबींवरून अस्वस्थ होता.कायदे पाळता. भोवती ढोंगी मैत्रिणींचे जाळे असते.पुढे स्वतःच्या आर्थिक स्थिती कशी असेल याची विनाकारण काळजी करता.
मान व प्रतिष्ठा यांची आवड असते.दुसऱ्यांचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तृत्व तुमच्याकडे असते.चांगल्या वाईट मधला फरक तुम्ही जाणता. ध्येय पूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही.विचार न करता उतावीळ पणे नवीन कामात घुसण्याची वृत्ती असते.तुमची चुक तुमच्या लक्ष्यात आली तरी ती मान्य करायला तयार होत नाही.खोटा अभिमान व मानी पणा तुमच्यात असतो.दीन दुबळ्या बद्दल दया व आदर असतो.तुमचे विचार धैर्याने व ठाम पणे मांडता.कायद्याचे पालन करायला आवडते. दूरच्या प्रवासाची आवड असते.कल्पना ,उत्साह असल्याने मोठमोठ्या योजना पार पाडण्यात आनंद वाटतो.उत्कर्ष 29 वयानंतर होतो.कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. तुम्हाला स्वतःच्या दिसण्याच्या व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो .तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असतात . घराची सजावट उत्तम असावी असे वाटते. दिमाख व वैभवशाली जीवनाकडे ओढ असते. बागबगीच्या व जनावरांची आवड असते. तुमच्याकडे लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपता. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते.आर्थिक बाबतीत चढउतार होत राहतो.वयाच्या 38 नंतर समाधानकारक बदल होतो.बचतीकडे लक्ष द्यावे.आवडत्या व्यक्ती साठी खर्च करता.

शुभ रंग:- किरमिजी,पांढरा, निळा

शुभ दिवस:- शुक्रवार, सोमवार मंगळवार

शुभ रत्ने:- मोती आणि पोवळे, हिरा.(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रीणींनो आज
भावनिक तीव्रता वाढेल, पण तुमचा निर्णय अचूक ठरेल. आर्थिक बाबतीत अचानक लाभाची शक्यता. जोडीदाराशी संवाद होईल.

♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
जोडीदाराशी संवाद महत्त्वाचा. चंद्र वृश्चिकेत असल्याने संवेदनशीलता वाढेल. नातेसंबंधात नवी दिशा. आरोग्य साधारण चांगले. कामात स्थिर प्रगती.

♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
रवि-बुध युती — कामात झपाट्याने गती. कागदपत्रे, चर्चा, नियोजन, माहिती गोळा करणे यात यश. आरोग्याची थोडी काळजी घ्या. कामगिरी उत्कृष्ट.

♋ कर्क
मैत्रीणींनो आज
चंद्र-नेपच्यून त्रिकोण — सर्जनशीलता आणि कल्पकता वाढेल. मुलांशी संबंधित शुभ बातमी. प्रेमसंबंधात रोमँटिक वातावरण. भेटवस्तू मिळेल.

♌ सिंह
मैत्रीणींनो आज
घर, परिवारात महत्वाचा निर्णय. रिअल इस्टेट किंवा संपत्तीविषयक हालचाली फायदेशीर. भावनिक स्थैर्य वाढेल. कुटुंबातील नाती अधिक जवळ येतील.

♍ कन्या
मैत्रीणींनो आज
प्रवास, मीटिंग्स, महत्वाचे कॉल यशस्वी. बुध-रवि योग तुमच्या भाषणात, संवादात प्रभाव वाढवतो. अचानक एखादी लाभदायक संधी मिळू शकते.

♎ तुळ
मैत्रीणींनो आज
आर्थिक स्थितीत सुधारणा. चंद्र-प्लूटो लाभामुळे पैसे, मालमत्ता किंवा करारांमध्ये फायदा. खरेदीची इच्छा वाढेल. स्वतःची किंमत वाढेल.

♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत — दिवस शक्तिशाली! उत्साह, आत्मविश्वास, आकर्षण वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम. प्रेमात उत्कटता.प्रवास घडतील.

♐ धनु
मैत्रीणींनो आज
अंतर्मुखता वाढेल. शांततेत घेतलेले निर्णय उत्तम होतील. अध्यात्म, ध्यान, अंतर्ज्ञान यासाठी दिवस अनुकूल. आरोग्याकडे लक्ष द्या.

♑ मकर
मैत्रीणींनो आज
मैत्र, सहकारी यांच्याकडून मदत. नवीन योजना, ऑनलाइन काम, ग्रुप प्रोजेक्टमध्ये यश. मान-सन्मान वाढेल. अनपेक्षित प्रगतीचा योग.

♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये चमक दिसेल. वरिष्ठांची विशेष मेहेरनजर तुमच्यावर राहील. हर्षल-नेपच्यून लाभामुळे अचानक फायदा, ओळख, बढती सारखे संकेत.

♓ मीन
मैत्रीणींनो आज
प्रवास, शिक्षण, आध्यात्मिकता यासाठी उत्तम दिवस. चंद्र-नेपच्यून त्रिकोण अंतत्स्फूर्ती देईल. नात्यात शांतता. मानसिक

RELATED ARTICLES

Most Popular