लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं
रविवार, 19 ऑक्टोबर 2025. अश्विन कृष्ण त्रयोदशी
राहू काळ – दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6
आज त्रयोदशी वर्ज दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या.
19 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर रवी आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
चांगल्या व श्रीमंत घराण्यात तुम्ही जन्मलेले असता. एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे हुशार असूनही शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. संशोधक वृत्ती असून पद्धतशीरपणा व व्यवस्थितपणा असतो. १९ तारखे मधील नऊ हा आकडा मंगळाच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे तापट स्वभाव, हेकटपणा ही तुमची वैशिष्ट्य आहे. भांडणाचे प्रसंग निर्माण होतात .स्वभाव उतावळा असल्यामुळे झटपट प्रतिसादाची अपेक्षा करता.अधिकार व प्रतिष्ठा तुम्हाला आपोआप मिळतात. तुमच्या शब्दात व कृती ठाम पण आहे. स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती असते. कोणाची ही कामात ढवळाढवळ तुम्हाला चालत नाही .तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. तुमची वृत्ती स्वतंत्र असून विचारातही स्वतंत्रपणा आहे .सतत बदल करण्याकडे ओढ असतो. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते .उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते .प्रेम, सहानुभूती, आदर ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .कला व प्रवासाची आवड आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून सांगतात .उच्च प्रतीचे कपडे, दागदागिने ,सुगंधी द्रव्य याची तुम्हाला आवड असते. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळतो. परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्चीक वृत्ती असते .मुले व प्राणी फार प्रिय असतात. हुशार व शास्त्राची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे व झटपट काम करणारे असतात. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे पूर्वनियोजन तुम्ही करता. विशाल दृष्टीकोन असतो. इच्छाशक्ती दांडगी असते. व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा खपत नाही. संशोधक वृत्ती असते. भाषा चातुर्य असल्याने दुसऱ्यावर झटकन छाप पडते. उद्योगधंद्याशी संबंध असल्याने समृद्ध असता .चाणाक्ष व धूर्त स्वभाव असतो ,त्यामुळे कष्टाचा मोबदला उत्तम प्रकारे मिळतो. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते .तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो. स्वभाव रुढीनिष्ठ नसतो .स्वतःचा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालता . महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होता .उत्तम गृहिणी असून गृह कृत्यदक्ष असता.
शुभ दिवस :-रविवार ,सोमवार गुरुवार ,शुक्रवार
शुभ रंग :-सोनेरी ,पिवळा नारंगी ,निळा
शुभ रत्ने:- माणिक, पाचु,मोती
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज लक्ष्मी प्रसन्न राहील.हाताखालचे कामगार साथ देतील.आरोग्य सांभाळा.
वृषभ:- मैत्रिणींनो आज मस्त दिवस आहे.संतती साठी खर्च कराल.अकल्पित धनप्राप्ती चे योग. प्रेमात यश.विवाह इच्छुकांना शुभ बातमी मिळेल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज अत्यंत सुंदर दिवस आहे.नवीन वाहन खरेदीचे योग. वाहन सौख्याचा दिवस.सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.
कर्क:-मैत्रिणींनो आज पत्रव्यवहार, इमेल द्वारा लाभ घडेल.भावंडाकडून लाभ होईल.छोटे प्रवास होतील.
सिंह:- मैत्रिणींनो आज कलाकारांना सुसंधी प्राप्तीचे योग. सुरुची भोजनाचा आस्वाद घ्याल.दागिने,वस्त्र खरेदीची शक्यता.
कन्या:- मैत्रिणींनो आज अचानक लाभाचे योग. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.मौल्यवान वस्तू खरेदी होईल.
तुळ:-मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे.
योग्य कारणास्तव खर्च कराल.
घाईघाईने निर्णय घेऊ नयेत.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज अत्यंत सुंदर दिवस.मैत्रिणींशी भेटीगाठी होतील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.मौजमजेचा दिवस.
धनु:-मैत्रिणींनो आज कामात सुयश मिळेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल.महिलांच्या मार्फत लाभ होतील.
मकर:- मैत्रिणींनो आज एखाद्या घरगूती समारंभात मित्रमैत्रिणी सोबत मज्जा कराल. स्वप्ने पूर्ण होतील. दूरचे प्रवास घडतील.वृद्धांच्या कडून लाभ होतील.
कुंभ:- मैत्रिणींनो आज अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. स्त्रीधन वाढेल.वारसाहक्क,लॉटरी मध्ये लाभ होतील.
मीन:- मैत्रिणींनो आज विवाह सौख्य लाभेल.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते. पतीसोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.नवीन खरेदी होईल.