Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य भविष्य.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

बुधवार, 1 ऑक्टोबर 2025. अश्विन शुक्ल नवमी

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज चांगला दिवस.महा नवमी,शस्त्र पूजन,नवरात्रोस्थापन

आज जन्मलेल्या बाळाची रास धनू/दुपारी 2 वा 27 मि नंतर मकर ,
अतिगंड योग शांती करून घेणे.

1 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर रवी आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची वृत्ती स्वतंत्र असून विचारातही स्वतंत्रपणा आहे .सतत बदल करण्याकडे ओढ असतो. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते .उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते .प्रेम, सहानुभूती, आदर ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .कला व प्रवासाची आवड आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून सांगतात .उच्च प्रतीचे कपडे, दागदागिने ,सुगंधी द्रव्य याची तुम्हाला आवड असते. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळतो. परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्चीक वृत्ती असते .मुले व प्राणी फार प्रिय असतात. हुशार व शास्त्राची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे व झटपट काम करणारे असतात. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे पूर्वनियोजन तुम्ही करता. विशाल दृष्टीकोन असतो. इच्छाशक्ती दांडगी असते. व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा खपत नाही. संशोधक वृत्ती असते. भाषा चातुर्य असल्याने दुसऱ्यावर झटकन छाप पडते. उद्योगधंद्याशी संबंध असल्याने समृद्ध असता .चाणाक्ष व धूर्त स्वभाव असतो ,त्यामुळे कष्टाचा मोबदला उत्तम प्रकारे मिळतो. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते .तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो. स्वभाव रुढीनिष्ठ नसतो .स्वतःचा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालता . महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होता .उत्तम गृहिणी असून गृह कृत्यदक्ष असता.

शुभ दिवस :-रविवार ,सोमवार गुरुवार ,शुक्रवार

शुभ रंग :-सोनेरी ,पिवळा नारंगी ,निळा

शुभ रत्ने:- माणिक, पाचु,मोती

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज गुंतवणूक करताना जपून निर्णय घ्या. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.दुपारनंतर कामे मनासारखी पार पडतील. नोकरी च्या ठिकाणी अनपेक्षित लाभ होतील.

वृषभ:-मैत्रिणींनो आज मेहनत जास्त करावी लागेल. सकाळ काहीशी कटकटी ची राहील.खर्च वाढेल.दुपारनंतर अचानक लाभ होतील.वडीलधाऱ्या ची मदत मिळेल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज महत्वाची कामे सकाळीच पूर्ण करा.त्यात पण मनाप्रमाणे यश मिळणार नाही.काही सुखद गोष्टी।मात्र घडतील. पतीकडून अचानक लाभ होतील.

कर्क:-मैत्रिणींनो आज धार्मिक कामासाठी खर्च कराल.प्रवासाचे योग. कामाच्या ठिकाणी मनासारखी मदत मिळेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज छान शॉपिंग होईल.संतती कडून छान बातमी मिळेल.कामाच्या ठिकाणी अचानक सुखद घटना घडेल.

कन्या:- मैत्रिणींनो आज कमीतकमी बोलणे हिताचे ठरेल.प्रेमात यश.कमी श्रमात शैक्षणिक यश मिळेक. संतती कडून छान बातमी मिळेल.

तुळ:-मैत्रिणींनो आज सर्वार्थाने छान दिवस.धडाडीने कामे कराल.कुलदेवता प्रसन्न राहील.नवीन वास्तू खरेदीची शक्यता.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज बोलण्यातून गैरसमज होऊ देऊ नका.निर्णय घेताना नीट विचार करा.दुपारनंतर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे परदेश गमन होऊ शकते.

धनु:-मैत्रिणींनो आज सकाळी तुमच्याच राशीत चन्द्र आहे.स्वतःसाठी खर्च कराल.मन आनंदी राहील.दुपारनंतर अचानक लाभ होतील.मेजवानी मिळेल.पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.

मकर:- मैत्रिणींनो आज रुटीन चालू ठेवा. काळजी घ्या.दानधर्म करा. दुपारनंतर कामाला वेग येईल.

कुंभ:- मैत्रिणींनो आज सकाळ मनासारखी राहील.महत्वाची कामे उरकून घ्या.संततीशी हितगूज करा,त्यांच्या अडचणी समजून घ्या.दुपारनंतर खर्च वाढतील.

मीन:-मैत्रिणींनो आज झटून कामे पूर्ण करा.आत्मबल चांगले राहील.व्ययसाय वाढेल. दुपारनंतर सवंगड्याशी गप्पा रंगतील.भेटी होतील.त्यांच्या कडून फायदा होई.

RELATED ARTICLES

Most Popular