लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार दिनांक १५/९/२०२५ उदगीर जळकोट मतदार संघातील सर्व बंजारा समाज अखिल भारतीय बंजाराआरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अशी आव्हान करण्यात येते की. आपला बंजारा समाज हा इतिहासकालीन सर्व कार्यामध्ये सक्रिय होता आपल्या समाजाची वेगळीच ओळख आहे . आपण आतापर्यंत आरक्षणाचा मुद्दा सरकार दरबारी दाखल न केल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय झाला असे म्हणायला हरकत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट ची अंमलबजावणी करून मराठा समाजास कुणबी मराठा नोंदणी नुसार आरक्षण देण्याचा जीआर काढला . त्याच समान न्यायाने महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजास अनुसूचित जमाती नोंदणी नुसार एसटी आरक्षण देण्याचे मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्याचे ठरवले आहे .तरी उदगीर जळकोट मतदार संघातील सकल बंजारा समाजास अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती यांच्याकडून विनंती करण्यात येते की वसंतराव नाईक चौक देगलूर रोड उदगीर येथे दिनांक 16/ 9 /2025 रोजी सकाळी दहा वाजून 30 मिनिटाला सर्व समाज बांधव सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहावे अशी विनंती अखिल भारतीय बंजारा समाज आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.
.
.