Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.वार

मंगळवार, 7 जूलै 2026. निज जेष्ठ कृष्ण अष्टमी
कालाष्टमी

राहू काळ – दुपारी 3 ते 4:30

आज चांगला दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास मीन.

7 जूलै रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

    तुमच्यावर  चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. 
      तुमची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असल्याने इच्छाशक्ती व व्यक्तिमत्व यांचा विकास केल्यास चंद्र व नेपच्यून या ग्रहांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल, जीवन खुलून दिसेल .तुमच्या विचारांच्या दिशा चाकोरी बाहेरील असतात. तुम्ही भावनाप्रधान असतात आत्मिक शक्तीची देणगी असते. दूरच्या प्रदेशाबद्दल आवड असून काही ना काही निमित्ताने परदेशाशी संबंध येतो .मोठमोठे भविष्यवादी, अध्यात्मवादी यांच्यावर नेपच्यून ग्रहाचे प्राबल्य असते. सर्वसाधारण विचारसरणीच्या व सामान्य माणसांमध्ये मिसळणे आवडत नाही .प्रकृती अस्वस्थ असून जीवनात सतत बदल करावा असे वाटते .बऱ्याच वेळा विचारात मग्न असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते .आपल्या आवडत्या छंद मध्ये रमणे तुम्हाला जास्त प्रिय असते. आयुष्यात वारंवार बदल होण्याची शक्यता असल्याने बचत करणे कठीण जाते. आवडीची नोकरी मिळाल्यास जीवनात चांगला पैसा मिळवून स्थिरता प्राप्त होते. तुमच्यामध्ये सहानुभूती ,सहकार्य व समाधान या गोष्टी आढळतात. त्यामुळे स्वतःचे काम व दर्जा याबाबतीत समाधानी असतात. आपल्या संसारावर तुमचे प्रेम असून आदर्श माता म्हणून नाव मिळवता .मित्र मैत्रिणींना जेवायला बोलावणे, मेजवान्या देणे ,आलेल्याचे आदरातिथ्य करणे तुम्हाला प्रिय असते. तुमचे काही वेळा वागणे अनकलनीय असते. अतिशय अस्वस्थ असून लहानसहान गोष्टींवरून चिडत राहतात. नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे ही तुमची अपेक्षा असते, त्यामुळे घरामध्ये कटकटी चे वातावरण निर्माण होते.

शुभ दिवस:- रविवार ,सोमवार बुधवार ,गुरुवार

शुभ रंग:- हिरवा, पिवळा

शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू

(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष

मैत्रिणींनो आज
कामात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस अधिक लाभदायक ठरेल.

वृषभ

मैत्रिणींनो आज
आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस. घरातील वातावरण शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन

मैत्रिणींनो आज
संवादातून अडकलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थिनींना अभ्यासात प्रगती होईल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.

कर्क

मैत्रिणींनो आज
घर आणि करिअर यांचा समतोल साधण्यात यश मिळेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मनातील चिंता कमी होईल.

सिंह

मैत्रिणींनो आज
सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.

कन्या

मैत्रिणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

तूळ

मैत्रिणींनो आज
प्रवासाचे योग संभवतात. मित्र आणि भावंडांचे सहकार्य मिळेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.

वृश्चिक

मैत्रिणींनो आज
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. संयम आणि शिस्त यामुळे यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु

मैत्रिणींनो आज
मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आत्मविश्वास कायम ठेवा.

मकर

मैत्रिणींनो आज
रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मानसिक ताण कमी होईल.

कुंभ

मैत्रिणींनो आज
मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन संधींचा लाभ घ्या.

मीन

मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान वाढेल. चंद्र-शनी युतीमुळे काही जबाबदाऱ्या वाढतील, पण मंगळाच्या लाभयोगामुळे त्यात यश मिळेल. मन शांत ठेवून काम केल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular