Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.वार

सोमवार, 6 जूलै 2026. निज जेष्ठ कृष्ण षष्ठी
सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश वाहन घोडा

राहू काळ – सकाळी 7:30 ते 9

आज दुपारी 2 पर्यंत चांगला दिवस.

आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ/सकाळी 9:58 नंतर मीन
विष्टि करण शांती करणे.

6 जूलै रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

    तुमच्यावर शुक्र आणि चंद् नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. 
 तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्याने भेटणाऱ्याला आनं वाटतो .तुमच्या सहवास नेहमीच उत्साहवर्धक असतो .कला, नृत्य ,गायन याची आ असते .गुढ विद्येचे पण आवड असते पण तुमच्यात अंधश्रद्धा नसते. आईकडील नातेकांबद्दल तुम्हाला आदर व आपलेपणा असतो .सहा अंक हा सौंदर्य आरोग्य ,सामर्थ, प्रेम ,आपुलकी आकर्षण यांचा निदर्शक आहे. पैसे वाचवण्यापेक्षा खर्च करण्याची तुमची वृत्ती असते. भावना प्रधान असूनही भावनांवर ताबा ठेवतात. वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने तुम्हाला पैसा मिळतो. पैसा ,श्रीमंती ,समृद्धी या बेताच्याच असतात ,परंतु जमाखर्चाची तोंड मिळवणे करण्याची कला अवगत असते. तुमच्यात अति सहनशीलता असल्यामुळे अनेक मानसिक ताण सहन करतात .आदर्श पत्नी व माता म्हणून तुम्हाला गौरवले जाते .संसारासाठी पतीने केलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही समाधानी असतात. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असतात. चंद्र ,नेपच्यून यांचा प्रभाव असल्याने तुमच्यात लहरीपणा चमत्कारिकपणा, चंचलपणा या गोष्टीही निदर्शनास येतात. अशावेळी हुकमत गाजवण्याची वृत्ती निर्माण होते.

शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,शुक्रवार, गुरुवार

शुभ रंग:- निळा किंवा गुलाबी

शुभ रत्न:- हिरा,मोती, पाचू

(रत्ने घेण्यापूर्वी पत्रिका नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष

मैत्रिणींनो आज
आज महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुं सहकार्य करेल.

वृषभ

मैत्रिणींनो आज
आर्थिक नियोजनासाठी दिवस उत्तम आहे. एखादा जुना प्रश्न मार्गी लागू शकतो. आरोग्याची योग्य काळजी घ्या.

मिथुन

मैत्रिणींनो आज
संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थिनींना अभ्यासात चांगले यश मिळेल. नवीन माहिती लाभदायक ठरेल.

कर्क

मैत्रिणींनो आज
भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार करा. घरातील वातावरण आनंदी राहील. महिलांना नवीन जबाबदारी मिळू शकते.

सिंह

मैत्रिणींनो आज
सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण चमकतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल.

कन्या

मैत्रिणींनो आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.

तूळ

मैत्रिणींनो आज
प्रवासाचे योग संभवतात. सवंगड्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराशी संवाद अधिक दृढ होईल.

वृश्चिक

मैत्रिणींनो आज
गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे. अंतरमनाच्या आधारे घेतलेला निर्णय लाभदायक ठरू शकतो.

धनु

मैत्रिणींनो आज
भागीदारीच्या कामात यश मिळेल.पतीचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वासामुळे नवीन संधींचा लाभ घेता येईल. वादविवाद टाळा.

मकर

मैत्रिणींनो आज
कामात शिस्त आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

आजचा दिवस बुद्धिमत्ता, अंतर्ज्ञान आणि सकारात्मक बदलांचा आहे. सकाळपर्यंत सामाजिक आणि व्यावहारिक कामांना गती मिळेल, तर दुपारनंतर मन अधिक संवेदनशील, सर्जनशील आणि आध्यात्मिक होईल. बुध-गुरू त्रिकोणामुळे योग्य निर्णयक्षमता वाढेल, तर नेपच्यून युतीमुळे कल्पनाशक्ती आणि अंतर्मनाचा आवाज अधिक प्रभावी राहील. रवी-शनी केंद्र योगामुळे जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण संयम ठेवल्यास यश निश्चित मिळेल..

मीन
मैत्रिणींनो आज कामे बरीच असतील पण आळस असेल पण
दुपारनंतर चंद्र राशीत आल्याने आत्मविश्वास, आकर्षण आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. कला, लेखन, संगीत किंवा आध्यात्मिक कार्यात विशेष यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर मोबाईल नंबर 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular