Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य.

लातूर प्रतिनिधी वार

मंगळवार, 2 जुन 2026. अधिक जेष्ठ कृष्ण द्वितीया

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30

आज चांगला दिवस आहे .आज जन्मलेल्या बाळाची रास धनु.(मूळ नक्षत्र)

2 जून रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर बुध , चन्द्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
. तुम्ही ध्येयवादी असून उत्तम कल्पनाशक्ती असते .तुमच्या स्वभाव स्वप्नाळू असतो .इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकता दुसऱ्याचे विचार कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तुत्व तुमच्यात आहे. मानमरातब, प्रतिष्ठा यांची आवड असते .तुम्ही समाजप्रिय आहात. नावीन्य व प्रवासाची आवड ही तुमची वैशिष्ट्य आहे. तुम्ही हुशार ,तल्लख, शास्त्रीय गोष्टींची आवड असलेले असतात. तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो. मित्र-मैत्रिणींच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करता. चांगले व वाईट यातला फरक तुम्ही सहजपणे समजू शकता. कल्पना व उत्साह यांचा संगम झाल्याने मोठे मोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला आनंद वाटतो स्वतःच्या उद्योगात सतत मग्न राहणे आवडते. तुमच्यात नम्रपणा असूनही आपली गुणवैशिष्ट्ये दुसऱ्याच्या नजरेस आणण्यास प्रयत्न करता.कायदा पाळणे आवडते .वयाच्या 38 व्या वर्षापासून आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होता. परंतु बचत योजनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी पैसा खर्च होतो .उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात. हुशार हरहुन्नरी व कर्तुत्वान असून अतिशय जुळवून घेता. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणारे जाणारे बरेच असतात .वैवाहिक जीवनात ल्या अडचणींना यशस्वी तोंड देता .घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी रमता. विनोदी स्वभाव ,संभाषण चातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो.
शुभ दिवस :- सोमवार , गुरुवार,शुक्रवार

शुभ रंग :- पांढरा ,पिवळा निळा,जांभळा .

शुभ रत्न :- हिरा,मोती

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रिणींनो आज
कामात धाडसी निर्णय घेण्याची संधी मिळेल. महिलांना नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.

♉ वृषभ

मैत्रिणींनो आज
कुटुंबातील एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. भावनांपेक्षा व्यवहाराला महत्त्व दिल्यास फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

♊ मिथुन

मैत्रिणींनो आज
चंद्र-बुध प्रतियुतीमुळे संवादात गैरसमज होऊ शकतात. बोलताना शब्द जपून वापरा. विद्यार्थिनींसाठी अभ्यासात प्रगतीचे संकेत आहेत.

♋ कर्क

मैत्रिणींनो आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरगुती कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. एखादी जुनी समस्या दूर होईल.

♌ सिंह

मैत्रिणींनो आज
आत्मविश्वास आणि उत्साह वाढलेला राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

♍ कन्या

मैत्रिणींनो आज
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.कामानिमित्त प्रवास घडेल. वाहन जपून चालवा.नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित आहे. आरोग्याची काळजी घ्या.

♎ तुळ

मैत्रिणींनो आज
प्रवास, शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी दिवस उत्तम आहे. महिलांना सर्जनशील कामातून समाधान मिळेल.

♏ वृश्चिक

मैत्रिणींनो आज
भावनिक बाबींमध्ये संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संध्याकाळनंतर मन अधिक प्रसन्न राहील.

♐ धनू

मैत्रिणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. वैयक्तिक कामे पूर्ण होतील. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.कागदपत्रे नीट तपासून घ्या.मोजके बोला.

♑ मकर

मैत्रिणींनो आज
रवी-शनि लाभ योगामुळे मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते.

♒ कुंभ

मैत्रिणींनो आज
मैत्रपरिवार आणि सामाजिक संबंधांमधून लाभ होईल.प्रवासात किंवा सोशल मीडिया द्वारे लाभ होण्याची संभावना. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

♓ मीन

मैत्रिणींनो आज
नेपच्यूनच्या प्रभावामुळे कल्पकता आणि अंतर्ज्ञान वाढेल. कला, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रातील महिलांसाठी दिवस विशेष लाभदायक आहे. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर.
मोबाईल 9561796324
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular