लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक, *21 मार्च 2026*. चैत्र शुक्ल तृतिया.*गौरी तिज* *गणगौर* सौभाग्य शयन व्रतराहुकाळ – सकाळी 9 ते 10:30 आज संध्याकाळी 7 पर्यंत चांगला दिवस.आज जन्मलेल्या बाळाची मेष रास आहे.*21* मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐 तुमच्यावर सर्वार्थाने गुरूग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ ,उदार व दयाळू पिता म्हणून समजले जाता. जीवनाच्या अगदी शेवटच्या काळात प्रसिद्धी कीर्ती मान प्राप्त होते .स्वतःच्या मानापमान च्या बद्दल तुम्ही जागरूक असता.कला साहित्य मनोरंजन हे गुण तुमच्यात असतात. तुम्ही उत्साही असून धार्मिक स्थळांना भेट देणे आवडते. पतीला योग्य ती सर्वसाधारण देण्यात तुम्ही वाकबगार असता. गृह कृत्य व मुलाबाळांचे संगोपन करण्यात तुम्ही जागरूक असता. आपल्या पतीला व्यवसायात मनापासून रस घेऊन त्याला मदत करायला आवडते. महत्वकांक्षी असून मान मर्यादा व प्रतिष्ठेला जपणारे असतात. कोणताही प्रश्न अभ्यास पूर्ण रीतीने सोडवता त्याकरता सतत प्रयत्न करतात. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. इतरांच्या भावना सहजपणे समजावून घेतात, सहानुभूती असते, प्रेम असते त्यामुळे इतरांशी संवाद साधणे शक्य होते. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. प्रतिष्ठा जपतात. वृत्ती धार्मिक असते आणि गूढ गोष्टींकडे ओढा असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. स्वभाव उत्साही आहे. कोणतेही प्रश्न तुम्ही अभ्यासपूर्ण रीतीने सोडवतात. दीर्घोउद्योगी आहात. बुद्धिमान आणि संशोधक लोकांकडे तुमचा ओढा असतो. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे पसंत नसते. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. आत्मविश्वास भरपूर असतो. स्वतःला निर्णयक्षमता असते. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. वृत्ती आनंदी असते. मन तरुण असते. मैदानी आणि शारीरिक खेळांची आवड असते. तुम्ही एक विश्वास पात्र व्यक्ती आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असेल. दिखाऊ पणाची आवड असून पद्धतशीरपणा व टापटीप असतो आनंदी वृत्ती असून मन तरुण असते .चालीरीती पाळण्याची आवड असते .उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची तुमची क्षमता असल्याने पैशाच्या बाबतीत तुम्ही सुखी असता .तुमचे जीवनमान चांगले असले तरी अनावश्यक गोष्टीवर खर्च करीत नाहीत. पैशावर आधारित सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात.शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार. शुभ रंग – पिवळा, हिरवा, जांभळा.शुभ रत्न-पुष्कराज(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)*आजचे राशिभविष्य*♈ मेषमैत्रीणींनो आज तुमच्या च राशीत चन्द्र आहेआज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.तुमचं वर्चस्व वाढेल.कुटुंबात तुमचा शब्द प्रमाण ठरेल.प्रवासाचे योग.♉ वृषभमैत्रीणींनो आज व्ययस्थानी चन्द्र आहेआर्थिक बाबतीत लाभ. शांततेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.एखादी छान बातमी मिळेल.♊ मिथुनमैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.मैत्र परिवारासह आनंदी क्षण व्यतीत कराल.संवादातून मोठा फायदा. मुलाखत, व्यवहार यशस्वी.महत्वाचे करार होतील.व्यवहार चातुर्याने कामे करून घ्याल.अचानक आर्थिक लाभ होईल.♋ कर्कमैत्रीणींनो आज दशमस्थानी चन्द्र आहे.मन स्थिर राहील.योग्य समजावून सांगितल्याने कामे पूर्ण होतील.नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.कुटुंबात आनंद. भावनिक समाधान. घरात सकारात्मक ऊर्जा.♌ सिंहमैत्रीणींनो आज भाग्यस्थानी चन्द्र आहेनेतृत्वगुण ठळक दिसतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी.उच्च शिक्षणात यश.दूरचे प्रवास घडतील. ♍ कन्यामैत्रीणींनो आज अष्टमस्थानी चन्द्र आहे.कामात अचूकता. आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस.संवादातून गैरसमज दूर होतील.नवीन जबाबदारी मिळू शकते.♎ तुळमैत्रीणींनो आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.प्रवास घडेल.प्रेम, सौंदर्य आणि आनंद नात्यांमध्ये गोडवा वाढेल.♏ वृश्चिकमैत्रीणींनो आज षष्ठस्थानी चन्द्र आहेधाडसी निर्णय फायदेशीर. अडचणींवर मात कराल.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.करीयर मध्ये प्रमोशन,बदली ची शक्यता.♐ धनुमैत्रीणींनो आज पंचमस्थानी चन्द्र आहे.लेखन ,शिक्षण यात प्रगती घडेल.भाग्याची साथ. प्रवास, करिअरमध्ये यश.♑ मकरमैत्रीणींनो आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.घरगुती निर्णय घेतलेले फायदेशीर होतील.मेहनतीचे फळ. वरिष्ठांकडून सन्मान. आर्थिक सुधारणा.♒ कुंभमैत्रीणींनो आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.नवीन ओळखी होतील.सोशल मीडियावर प्रसिद्धी लाभेल.छोटे प्रवास घडतील.कलाकारांना उत्तम दिवस.नवीन कल्पना यशस्वी. मित्रांचे सहकार्य लाभदायक.♓ मीनमैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.गोड बोलून कामे करून घ्याल.वक्तृत्व उजळेल.मन प्रसन्न. आध्यात्मिक झुकाव वाढेल. प्रेमात समाधान. श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर * मो 9561796324 लग्न ,करियर, गुण मीलन विषयी *सशुल्क पत्रिका* पाहण्यासाठी संपर्क साधावा.