लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 23/3/2026 गते शोको न कर्तव्यः”गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत् । वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः ।।”जे गेले त्याबद्दल शोक करू नये आणि जे अजून झालेले नाही त्याबद्दल चिंता करू नये. बुद्धिमान लोक सदैव वर्तमानकाळात जगतात आणि त्यानुसार वागतात. हा श्लोक शोक, चिंता आणि वर्तमानकाळाच्या महत्त्वावर भर देतो. भूतकाळाबद्दल शोक करणे किंवा भविष्याबद्दल अत्यधिक चिंता करणे यामुळे मनुष्य वर्तमानकाळातील संधी गमावतो. शहाणे लोक भूतकाळाच्या पश्चात्तापात अडकत नाहीत किंवा भविष्याच्या भीतीत जगत नाहीत; ते वर्तमानकाळाचा योग्य उपयोग करतात आणि यशस्वी होतात. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏