Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

बुधवार, 18 मार्च 2026. फाल्गुन चतुर्दशी/अमावास्या, दर्श अमावस्या

राहुकाळ – दुपारी 12 ते 1:30

आज चतुर्दशी वर्ज दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास कुंभ/रात्री 11:36 नंतर मीन रास(शकुनी/चतुष्पाद करण शांती)

18 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर गुरू आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे.  तुम्ही सभ्य व मोठ्या मनाचे असतात. प्रामाणिक असून सर्व जबाबदाऱ्यांमध्ये यश मिळते. गुप्त शत्रूंपासून तुम्हाला त्रास होतो त्यामुळे खोट्या आरोप करणाऱ्या पासून तुम्ही सावध राहा .कोर्टकचेरी करण्याची पाळी आल्यास तुमच्यावर अन्याय होतो. इच्छाशक्ती करारीपणा यांच्या जोरावर कोणत्याही अडचणीवर मात करू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते. तुम्ही हुशार असून योग्य निर्णय घेता. स्मरणशक्ती चांगली असून जुन्या घटना तुम्हाला स्पष्टपणे आठवतात.

मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे आक्रमकता, प्रतिकार, धाडस ,तडफ व तत्परता दाखवते तुम्ही लढाव वृत्तीचे असतात तुम्हाला दुसऱ्याची खोडी काढायला आवडते. कितीही विरोधी परिस्थिती असली तरीही तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहता. पराभव तुम्हाला मान्य नसतो. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. तुमच्या बोलण्यात नाजूकपणा किंवा युक्तिवाद नसतो परंतु तुमचा हेतू मात्र चांगला असतो .काहीही विचार न करता उतावळेपणाने नवीन योजनेत घुसण्याची तुमची वृत्ती असते. तुम्ही तापट व धाडसी असून भावनाशील नसता. तुमची लक्षात येते परंतु तुम्हाला ते मान्य होत नाही. खोटा अभिमान व मानीपणा तुमच्यात असतो .शक्यतो दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळावे .खेळाची व शक्तिशाली व्यायामाची तुम्हाला आवड असते .शूर असल्याने भांडणाची फिकीर करीत नाही .दुबळ्या लोकांबद्दल दया वाटते. तापट असल्या तरीही गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे स्वतःवर ताबा ठेवण्याची क्षमता तुमच्याकडे असते आणि त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. मुले व प्राणी प्रिय असतात. मित्र-मैत्रिणींबद्दल प्रेम असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तुम्ही तयार होतात. विश्वासू व जबाबदारीच्या जागा सांभाळू शकता. महत्त्वकांक्षा, पुढारी पण ,धार्मिक वृत्ती मानमरातब ,निसर्गप्रेम हे गुण विशेषता आढळतात .तुम्ही अभ्यासू व विचारवंत असतात. सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा तुमचे विचार फार पुढारलेले असतात ,त्यामुळे इतर लोक तुमचा सल्ला घेतात. मात्र मित्र व मैत्रिणी नातेवाईक यांच्याबाबत पैशाची देवाण-घेवाण करताना सारासार विचार जरूर करावा. तुमच्या आवडीनिवडी बाबत तुम्ही ठाम भूमिका घेता. तुमची तत्त्वे तुम्ही सोडत नाहीत. तुम्ही महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता. पत्नीला त्याच्या कामात साथ देता.
.स्वतःचाही उद्योग धंदा करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता.विनोदी स्वभाव व संभाषण कौशल्य असल्यामुळे सामाजिक जीवनात यश मिळते.

शुभ दिवस:- सोमवार मंगळवार ,गुरुवार ,शुक्रवार

शुभ रंग – तांबडा, पांढरा ,पिवळा

शुभ रत्ने:- पुष्कराज, मोती माणिक
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.
आज अनपेक्षित आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. मित्रमैत्रिणींच्या मदतीने एखादे काम पूर्ण होईल.नात्यातून शुभ समाचार मिळू शकतो.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज दशमस्थानी चन्द्र आहे.
कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. पतीकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.नवीन कामातून यश मिळेल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज भाग्यस्थानी चन्द्र आहे.भाग्यवृद्धी, सकारात्मकता, योग्य निर्णय घ्याल.
भाग्याची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते.

♋ कर्क

मैत्रीणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज सप्तमात चंद्र आहे.पतीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकते,।
नातेसंबंधात आनंद आणि समतोल राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज षष्ठ स्थानी चंद्र आहे.
कामात प्रगती आणि यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.अचानक एखादा लाभ होऊ शकतो.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज पंचम स्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांशी किंवा कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील.अचानक एखादी चांगली बातमी, संधी किंवा लाभ मिळू शकतो.अविवाहितांसाठी नवीन ओळख किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
.
♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
घरगुती सुख आणि मानसिक शांतता मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल.घर आणि काम यामध्ये संतुलन ठेवणे महत्त्वाचे ठरेल.घराशी संबंधित खर्च होऊ शकतो.

♐ धनु

मैत्रीणींनो आज तृतीयात चन्द्र आहे.
धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन संपर्क आणि संधी मिळतील.छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून मदत मिळू शकते. सोशल नेटवर्क किंवा संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे.
स्व प्रयत्नाने लाभ मिळवाल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.गोड बोलण्याने कामे सुकर होतील.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.नवीन ओळखी होऊ शकतात. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.मानसन्मान मिळेल.

♓ मीन

मैत्रीणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.नात्यात गैरसमज होऊ शकतो.अनपेक्षित खर्च उदभवण्याची शक्यता.
मन शांत आणि आध्यात्मिक राहील. अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा.

श्री निलेश अंबादास देशमुख बैग॔लोर. मोबाईल.9561796324.
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.9561796324.

RELATED ARTICLES

Most Popular