लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार गुरूवार, 5 मार्च 2026. फाल्गुन कृष्ण द्वितीया
संत तुकाराम बीज
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
आज शुभ दिवस आहे.आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या.(शूल योग)
5 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर गुरू आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे.
तुमच्या धूर्तपणा झटपट व व्यापारी वृत्ती आहे. आपल्या आवाजाची देणगी असून त्याचा व्यवहारात उत्तम उपयोग करता. स्वतःचे विचार दुसऱ्याला सांगण्याची हौस असते. तुमचे ध्येय कार्य आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न सतत करीत असता. तुम्हाला खेळण्याची व प्रवासाची आवड आहे .तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा आवडत नाही .तुम्हाला समाजात मिसळणे निरनिराळ्या समारंभात भाग घेणे आवडते. कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे याचा मार्गदर्शन आपोआप मिळते. सहकारी वृत्ती असून दुसऱ्याला मदत करायला आवडते धर्म व तत्वज्ञान गोष्टीच्या आवड असते. हातातील कामात यश कसे मिळवावे याचे नियोजन तुम्ही करता .तुमच्या महत्त्वकांक्षा हा आर्थिक आणि वैचारिक स्वरूपाचे असतात भविष्यात चढ-उत्तर अपेक्षित असतात. पैशाच्या बाबतीत निष्कळजी असल्यामुळे काहीच पैशाची साठवण कमीच असते. चाणाक्ष दृष्टिकोनामुळे यश मिळते, कष्टाची चीज होते. पतीला योग्य ती साथ तुम्ही देता ,त्याच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करतात. आरामशीर आयुष्याची आवड असून बराच वेळ आपल्या रिकामपणात घालवता. घरात बाहेर दोन्ही ठिकाणी रमता .घरात टापटीप , व्यवस्थित पणा ठेवता पण ही कामे दुसऱ्यांकडून घेण्यात तुम्ही हुशार असता.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शुक्रवार
शुभ रंग – पांढरा, पिवळा ,हिरवा
शुभ रत्ने:-हिरा, पाचू किंवा नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
कामात शिस्त आणि नियोजन आवश्यक. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल.
घरातील वडीलधाऱ्यांचे ऐका. जोडीदाराशी सौम्यतेने बोला.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस. लहान गुंतवणूक फायदेशीर.
कामाचे कौतुक होईल.
जोडीदारावर विश्वास वाढेल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज सरकारकडून लाभ होईल.
बौद्धिक कामात यश. लेखन, शिक्षण, स्पर्धा परीक्षा यासाठी चांगला काळ.
आरोग्य: पचनाची काळजी घ्या. संवादातून गैरसमज दूर होतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज मानसन्मान मिळेल.भावंडाशी हितगुज कराल.भेटवस्तू मिळू शकते.
मन प्रसन्न राहिल. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
खर्चावर नियंत्रण ठेवा.
समजूतदारपणा आवश्यक.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
रवि-गुरू योगामुळे आत्मविश्वास वाढेल.सरकारी नोकरी इच्छुकांना खूष खबर मिळू शकते. नेतृत्वगुण दिसतील.
बढती किंवा जबाबदारी वाढू शकते.
जोडीदाराचा अभिमान वाटेल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने मन स्थिर आणि निर्णयक्षम राहील.
प्रलंबित कामे पूर्ण होतील.
ताण तणाव टाळा.
प्रेमात स्पष्ट संवाद ठेवा.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
सामाजिक कार्यक्रमात सहभाग. नवीन ओळखी फायदेशीर.
आर्थिक अनपेक्षित लाभ.
प्रेमात रोमँटिक वातावरण.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे.
चंद्र- प्लूटो त्रिकोणामुळे अंतर्मुखता वाढेल. जुन्या समस्या सुटतील.
गुप्त शत्रूंवर विजय.
प्रेमात प्रामाणिकपणा ठेवा.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
रवि-गुरू त्रिकोणामुळे भाग्यवृद्धी.
नोकरी मध्ये नवीन संधी चालून येतील. लाभदायक व्यवहार होतील.
आनंददायक बातमी मिळेल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
जबाबदारी वाढेल पण गुरू बळ मिळेल.
कामात स्थिरता येइल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
नवीन कल्पना सुचतील. तांत्रिक कामात प्रगती. मैत्री अधिक घट्ट होईल.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
गुरूचा सकारात्मक प्रभाव.सरकारी कामात यश. आध्यात्मिक विचार वाढतील.
कौटुंबिक वातावरण शांत राहील. भावनिक आधार मिळेल.