लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार मंगळवार, 3 मार्च 2026.
फाल्गुन पौर्णिमा.
खग्रास चन्द्र ग्रहण (धुलीवंदन)
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज ग्रहण वर्ज दिवस.आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह आहे.
3 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर सर्वार्थाने गुरूग्रहाचा प्रभाव आहे. पतीला योग्य ती सर्वसाधारण देण्यात तुम्ही वाकबगार असता. गृह कृत्य व मुलाबाळांचे संगोपन करण्यात तुम्ही जागरूक असता. आपल्या पतीला व्यवसायात मनापासून रस घेऊन त्याला मदत करायला आवडते. महत्वकांक्षी असून मान मर्यादा व प्रतिष्ठेला जपणारे असतात. कोणताही प्रश्न अभ्यास पूर्ण रीतीने सोडवता त्याकरता सतत प्रयत्न करतात. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. इतरांच्या भावना सहजपणे समजावून घेतात, सहानुभूती असते, प्रेम असते त्यामुळे इतरांशी संवाद साधणे शक्य होते. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. प्रतिष्ठा जपतात. वृत्ती धार्मिक असते आणि गूढ गोष्टींकडे ओढा असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. स्वभाव उत्साही आहे. कोणतेही प्रश्न तुम्ही अभ्यासपूर्ण रीतीने सोडवतात. दीर्घोउद्योगी आहात. बुद्धिमान आणि संशोधक लोकांकडे तुमचा ओढा असतो. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे पसंत नसते. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. आत्मविश्वास भरपूर असतो. स्वतःला निर्णयक्षमता असते. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. वृत्ती आनंदी असते. मन तरुण असते. मैदानी आणि शारीरिक खेळांची आवड असते. तुम्ही एक विश्वास पात्र व्यक्ती आहात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असेल. दिखाऊ पणाची आवड असून पद्धतशीरपणा व टापटीप असतो आनंदी वृत्ती असून मन तरुण असते .चालीरीती पाळण्याची आवड असते .उच्च श्रेणीचा व्यवसाय किंवा नोकरी मिळण्याची तुमची क्षमता असल्याने पैशाच्या बाबतीत तुम्ही सुखी असता .तुमचे जीवनमान चांगले असले तरी अनावश्यक गोष्टीवर खर्च करीत नाहीत. पैशावर आधारित सर्व सुखे तुम्हाला प्राप्त होतात.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग – पिवळा, हिरवा, जांभळा.
शुभ रत्न-पुष्कराज
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
कामाच्या ठिकाणी मतभेद संभव. संयमाने वागा.वरिष्ठांशी वाद टाळा.
आर्थिक मध्यम लाभ.
जोडीदाराशी अहंकार टाळा.
रक्तदाब/उष्णता वाढू शकते.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
प्रवास किंवा शिक्षण विषयात चांगली बातमी मिळू शकते.
करिअर: नवीन संधी.
चन्द्र गुरु लाभायोगामुळे फायदा.
सकारात्मक संवादआवश्यक.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
बुध प्रतियुतीमुळे संभाषणात गैरसमज संभव. शब्द काळजीपूर्वक वापरा.
लिखाण/मिटिंगमध्ये सावधगिरी.
खर्च वाढू शकतो.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
भागीदारीत तणाव संभव. पण गुरु लाभामुळे परिस्थिती सुधारेल.
करिअर मध्ये सहकार्याने काम करा.
जोडीदाराशी मोकळेपणा ठेवा.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
चंद्र आपल्या राशीत आहे. आत्मविश्वास वाढेल पण अहंकार टाळा.
करिअरमध्ये नेतृत्वाची संधी.
आर्थिक लाभाची शक्यता.
संयम आवश्यक.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
गुप्त चिंता त्रास देऊ शकते. निर्णय घाईत घेऊ नका.
संयमाने काम करा.
आर्थिक मध्यम लाभ.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
मित्रांकडून मदत मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
सामुहिक वर्क यशस्वी.
प्रेमात गोडवा वाढेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
कार्यक्षेत्रात तणाव संभव. वरिष्ठांशी वाद टाळा.
आर्थिक जोखीम टाळा.
भावनिक संतुलन ठेवा.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
भाग्याची साथ आहे. गुरु लाभामुळे शुभ बातमी मिळेल.
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत.
आर्थिक लाभ होतील.
घरात आनंदी वातावरण.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
आर्थिक व्यवहारात सावधगिरी. कुटुंबात वाद टाळा.
कामात शिस्त पाळा.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
पतीशी मतभेद संभव. पण शेवटी परिस्थिती अनुकूल होईल.
आर्थिक स्थिरता.
जोडीदाराशी सुसंवाद साधा.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
आरोग्याकडे लक्ष द्या. कामात ताण येऊ शकतो.
सबुरीने घ्या.