संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/3/2026 मंगळवार
' एक ब नो, नेक ब नो,एकीने रहा, नेकीने वागा.' असे संत महात्मे महामानव, थोर पुरुष,आईवडील,म्हातारी माणसे सांगत असतात,अनेक वर्षापासून सांगत पण आलेत. तरी पण नीतीने वागणाऱ्यांची संख्या कमी आणि अनितीने वागणाऱ्यांचीच संख्या जास्त असते.हे प्रमाण कमी जास्त होत नाही.तेव्हढेच राहते.म्हणजे अनितीचा आलेख नेहमीच चढताच असतो.नीतीचा आलेख नेहमीच खाली असतो.असे का ? यावर विचार होणे जरुरीचे आहे.
अर्थात अनितीने वागणारी माणसे ही गरीबच असतात असे नाही,तर श्रीमंत मध्यम,भांडवलदार,जमीनदार ,सत्ताधारी हे त्यांच्यापेक्षा जास्त अनितीचा वापर करतात.अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार,पिळवणूक,काळाबाजार,साठेबाजी,नफेखोरी, या साऱ्या अनितीच्या गोष्टी श्रीमंत माणसे च जास्त करीत असतात.गरीब या गोष्टी करीत नाहीत,मध्यम वर्गीय पण अशा गोष्टी कमीच करतात.पण शोषणाचा मार्ग हा श्रीमंत वर्ग पत्करतो,म्हणून ते जास्तीत जास्त अनितीने वागतात.ग्राहक ( मध्यम वर्ग) यांचे शोषण,आणि श्रमिकांच्या वेळेचे,श्रमाचे शोषण हे श्रीमंत करीत असतात,या शिवाय अवैध मार्गाने पैसे कमावणे, नशिले पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणे , या सगळ्या अनितीच्या गोष्टी हा श्रीमंत वर्ग करीत असतो यांच्या तुलनेत गरीब वर्ग फारच कमी असतो, अशा आणि तिच्या गोष्टी करणे म्हणजेच धार्मिक दृष्ट्या पाप करणे असे पण समजले जाते, श्रीमंत वर्ग , आणि मध्यमवर्ग हा फारच धार्मिक असतो, पापा पुण्याच्या गोष्टी करत असतो, कथा कीर्तनातून याची चर्चा असते, तरीपण पाप करणे काही सोडत नाहीत, म्हणजेच आणि वागायचं आणि तिने, आणि बोलायचं मात्र नीतीच्या गोष्टी, अशी दुटप्पी भूमिका ही मध्यमवर्गीयांची आणि श्रीमंत वर्गाची असते, गरीब वर्ग हा पापभिरू असतो, म्हणजेच पाप करण्याबद्दल त्याला भीती वाटते, तरी परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणजेच गरीबीमुळे तो अनेक चुका करतो, आणि तिच्या गोष्टी पण करत असतो, याला कारण गरिबी असते, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे माहीत असूनही श्रीमंत वर्ग पाप करीत असतो कारण त्याला माहीत असते की, अशी कृती केल्याशिवाय आपल्याला श्रीमंतच होता येत नाही, शोषण अन्याय अत्याचार केल्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळवू शकत नाही, हे त्यांना माहीत असते, ही त्यांची मजबुरी असते, म्हणून ते एकीकडे सर्व प्रकारची पाप कमी करतात, पाप केल्यास केल्याचे शैल्य मनात घुसत असते, मग मनाला समाधानी म्हणून बालाजीच्या पाहिलीत नोटा सोना जड हिरे टाकून किंवा गंगा स्नान करून पाप धुतल्याचे समाधान मानतात, कारण महाराज लोक पण सांगत असतात की, तेरा पाप कोटी कट जाये, भजन कर एक घडी, तुम्ही आयुष्यात कितीही पापे करा, पण श्रीमंत व्हा, श्रीमंत होण्यासाठी केलेली पापे धुऊन काढण्यासाठी मार्ग आहेत ते म्हणजे धर्म पाळणे, देव देव करणे, तीर्थाटन करणे, दादा धर्म करणे, या सर्व मार्गाने अनितीच्या गोष्टी नष्ट होऊन शेवटी तुम्ही नीतिमान म्हणून जगात वावरू शकता, हे धर्माचे तत्त्वज्ञान आहे. म्हणून श्रीमंत लोक मोठमोठ्या महाराजांना हजारो रुपये देऊन, त्यांचे कथा कीर्तन आणि सप्ताह करीत असतात,
गरीब माणूस त्याच्या आर्थिक टंचाईमुळे अस्तित्वाची लढाई लढत असतो, निकृष्ट अन्न खावे लागते, कमी किमतीची कपडे वापरावे लागते, चार भिंतीच्या पत्र्याच्या घरात राहावे लागते, पाणी लाईट नसते, रस्ता नीट नसतो, यासाठी म्हणजे अस्तित्वासाठी तो सतत दैनंदिन लढाई करीत असतो, आणि ही लढाई लढत असताना नाईलाजाने म्हणून तो नीती सुद्धा सोडतो, एखाद्याचे घेतलेले पैसे बुडवितो, किती काम करतो तिथे कमी पैसे मिळत असतील तर ते काम सोडून जिथे जास्त पैसे मिळतात तिकडे तो धावतो, याचा अर्थ तो करार मोडत असतो, करार मोडणे म्हणजेच नीती सोडणे होय, याची जाणीव त्याला पण असते, जसे श्रीमंत माणूस व्याज देताना नफा कमवताना किंवा एखाद्याला बुडविताना त्याला जाणीव असते की मी ही चूक करीत आहे तरी परंतु हव्यासापोटी श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी, तो आणि तिचा वापर करीत असतो, तसेच हा गरीब माणूस पण आणि तिचा वापर करीत असतो, पण या दोघांमध्ये फरक हा आहे, की, गरीब माणूस हा गरीबीमुळे अनिती चा वापर करतो, आणि श्रीमंत माणूस हा गरीबी नसताना पण आणि तिचा वापर करतो, थोडक्यात काय तर, गरीब असो की श्रीमंत की मध्यम साऱ्याच वर्गातले लोक आणि तिने वागतात, याचा अर्थ 100% लोक आणि तिनेच वागतात असे नाही, त्यातील काही लोक विचारपूर्वक नीतीने पण वागतात, नीतीने वागणाऱ्यात गरीब आहेत आणि श्रीमंत पण आहेत, पण टक्केवारी अत्यंत कमी आहे, म्हणजेच नीतीने वागणारी माणसे केवळ पंचवीस टक्केच असावेत असा माझा अंदाज आहे, कारण हे विचाराचे पक्के असल्यामुळे. यांना त्रास होतो, परंतु हे विचाराचे पक्के असल्यामुळे नीतीने वागतात हे तितकेच खरे आहे.
नीती ,अनीती, पाप पुण्य, ह्या संकल्पना का निर्माण झाल्या ? त्याचे कारण म्हणजे ही व्यवस्था आहे, जिथे विषमतावादी व्यवस्था आहे, तिथे गरीब मध्यम श्रीमंत हे वर्ग आहेत, आणि हे वर्ग एकमेकांचे शोषण करीत असतात, या तिन्ही वर्गांचा व्यवहार हा सरळ सरळ नसतो तर वाकडा असतो, एकमेकांना फसविण्याचे एकमेकांना टोप्या घालण्याचे काम हे वर्ग करीत असतात, ते केवळ या विषमतावादी व्यवस्था असल्यामुळेच.
या विषमतावादी व्यवस्थेचे वैशिष्ट्य हे की, हे तिने वर्ग शोषणास मान्यता देतात, बळी तो कान पिळी,tit for tat, म्हणजे जशास तसे, हा निसर्ग नियमच आहे, अशी धारणी अशी धारणा यांच्या मनात आणि बुद्धीत रुजविलेली असल्यामुळे, आणि या धारणेला देव आणि धर्माचा मुलामा दिल्यामुळे शोषणाची ही धारणा, तसेच जिसकी लाठी उसकी भैस, तसेच जंगली कायदा, म्हणजे जंगलात जनावरे जसे वागतात, त्याप्रमाणे माणसे पण एकमेकांशी वागतात, आणि हे योग्यच आहे, ही मानसिकता या विषमतावादी व्यवस्थेमुळे तयार झालेली आहे. इथे जर समतावादी व्यवस्था राहिली असती, तर ह्या विचाराची मानसिकता निर्माण झाले नसते. कारण शोषणमुक्त समाज, आणि अन्याय अत्याचार मुक्त व्यवहार झाला असता. कोणी कोणाचे शोषण करायचे नाही, कोणी कोणावर अन्याय अत्याचार करायचा नाही, ही सांगण्याची सुद्धा गरज पडली नसती, जर साम्यवादी समाज रचना अस्तित्वात राहिली असती तर, या जगात अगदी सुरुवातीला अदिन साम्यवाद होता, आदिम साम्यवादी व्यवस्था होती, म्हणजेच हे निसर्ग साधन संपत्ती, म्हणजे जल जंगल पाणी माती ही कुणाच्या मालकीची नव्हती, तर सर्वांच्याच मालकीची होती, यावर सर्वांचाच अधिकार समान होता, तसेच जनजीवन फुलवण्यासाठी, शेती कारखाने उद्योग जे निर्माण होत निर्माण होत होते, ते सर्वांनी मिळून सर्व करतात तयार केलेले होते, आणि त्यातून ज्या काही गरजेच्या वस्तू निर्माण होत होत्या, जे अन्नधान्य निर्माण होऊन होत होते, ते सारे गरजेनुसार सगळ्यांना वाटप होत होते, मिळत होते, अशा प्रकारची आदिम साम्यवादी समाज रचना, आर्थिक रचना, शोषण विरहित आणि शासन विरहित होती, तेव्हा नीती अनिती हा विषय नव्हताच. एवढेच नाही तर, कुणी आणि तिने वागण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच सोशल अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला किंवा विचार केला किंवा त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न केला तर त्या स तशी संधीच मिळत नसे, शिवाय असा प्रयत्न करणाऱ्याला सर्व समाज वाळीत टाकल्यासारखे वागणूक देत होता, म्हणून नितीन, पाप पुण्य, म्हणून यासाठी देव धर्म हा विषयच नव्हता.
थोडक्यात सांगायचे झाले तर, निती अनीती,पापपुण्य, या गोष्टी समाज रचनेवर म्हणजेच व्यवस्थेवर अवलंबून असतात, विषमतावादी व्यवस्थेत ह्या गोष्टी विद्यमान असतात, आणि समतावादी व्यवस्थेत या गोष्टींना थारा नसतो.
लेखक: दत्ता तुमवाड, सत्यशोधक समाज नांदेड, दिनांक: तीन मार्च 2026,