लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार सोमवार, 16 फेब्रुवारी 2027. माघ कृष्ण चतुर्दशी
सोमवती अमावस्या
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
आज चतुर्दशी वर्ज्य दिवस आहे.
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर(शकुनी करण, चतुष्पाद योग शांती)
16 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि आणि नेपच्यून आणि चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
तुमच्या स्वभाव विनोदी असून मनाने उदार असतात. भावनाप्रधान असून मनाने हळवे असतात. तुम्ही लवकर अस्वस्थ होता व शांतही लवकर होतात प्रकृतीची कुरबुर चालू राहते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यूनता जाणवते. वरून जरी शांत दिसला तरी मनात सदैव अस्वस्थता असते त्यामुळे रागीटपणा वाढतो. इतरांची लुडबूड, ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र ,विनयशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करीत नाही .जीवनातील सूक्ष्म गोष्टींकडे तुमचा ओढा असतो. एकीकडे तुम्हाला रहस्य कथा,CID सारख्या मालिका आवडतात तर दुसरीकडे तुम्ही गंभीर विषयातही रमता .तुम्ही शांतता प्रिय असून फार कष्टाची कामे तुम्हाला आवडत नाहीत. चांगले व यशस्वी मुले होण्यात तुम्ही नशीबवान असतात. तुमच्या वागण्यास सावधगिरी असते लोकांना आकर्षित करण्याची सुप्त शक्ती तुमच्यात आहे ,मात्र तुम्ही तुमच्या भावना सहजासहजी व्यक्त करीत नाही. तुम्हाला वरचेवर आरामाची जरुरी आहे, कारण मनाची एकाग्रता तुम्हाला निराशा आणते. तुमच्याकडे धारिष्ट असून कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी असते.
तुमच्यावर नेपच्यून ग्रहाचा प्रभाव असल्याने छान छान रहाणे, सतत आनंदी असणे, स्वप्नात आणि प्रेमात दंग होणे तुम्हाला आवडते. तुम्हाला मोकळ्या आकाशात स्वैर विहार करावासा वाटतो. परंपरांबद्दल तुम्हाला फारशी आत्मीयता नाही. परदेशाबद्दल जवळीक वाटते व काही ना काही प्रकारे परदेशांशी संबंध येतो. तुम्ही निसर्गतः अस्वस्थ असतात. ठराविक चाकोरीतून जाणे तुम्हाला आवडत नाही. तुमची वागणूक बऱ्याच वेळा गुढ असते. सर्वसाधारण विचारसरणीच्या किंवा सामान्य माणसात रमणे पसंत नसते. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्याची मताची उपेक्षा केली जाते. फक्त चांगल्याच गोष्टींची निवड करणे तुम्हाला पसंत असते .आयुष्यात सतत बदल आवडतो. स्वतःचे ज्ञान अधिकार याची पूर्ण जाणीव आहे. कोणी सल्ला मागितल्यास तुम्ही अधिकाराने व खंबीरपणे देता .खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या अंतिम परिणामांचा विचार करता. महत्त्वाकांक्षा व उत्साह असून चिकाटी चांगली असते .स्वतंत्र बाणा असल्यामुळे दुसऱ्याचे वर्चस्व सहन होत नाही .मनमोकळे असता.
तुम्ही हुशार असून तुमचे वागणे मात्र अनाकलनीय असते.अतिशय अस्वस्थ असून लहानसहान गोष्टीवरून चिडचिड करता.मैत्रिणींना जेवायला बोलावणे,आदरातिथ्य करणे मनापासून आवडते. नवऱ्याने तुमच्याकडे सदैव लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते .रूढी परंपरेला चिकटून राहणे आवडत नाही. चांगली गृहिणी म्हणून तुम्ही नावाजल्या जाता. सोज्वळ असलेले ,कल्पकता असलेल्या अशा मैत्रिणींशी तुमचे छान जमते . आयुष्यात वारंवार बदल होत असल्याने बचत करणे कठीण होते .जीवनात आराम व सर्व सुख सोयी मिळतात .परंतु शनी ग्रहाच्या मुळे अडचणी आणि विडंब याचा अनुभव येतो. जीवनात आर्थिक स्थैर्य 43 व्या वर्षानंतर मिळू लागते.
शुभ रंग:-हिरवा,जांभळा
शुभ दिवस:-सोमवार, बुधवार, गुरूवार
शुभ रत्न:-पुष्कराज, हिरा,लसण्या
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा असेल. कर्तृत्व दाखवाल.रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. घरात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.विद्यार्थिनींनी झटून अभ्यास करावा.
.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आर्थिक बाजू मजबूत होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. जोडीदाराशी मनमोकळा संवाद करा, गैरसमज दूर होतील.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज वाहन जपून चालवा.वारसहक्कांच्या कामात कटकट होऊ शकते.
बुद्धीचा उत्तम वापर होईल. मुलाखत, परीक्षा, बोलणी यामध्ये यश मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
भावनिक स्थैर्य वाढेल.जोडीदाराची मर्जी सांभाळा. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. आत्मविश्वासामुळे कठीण कामे सोपी वाटतील.शत्रूंचा पराभव होईल.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
आज तुमचे नियोजन अचूक ठरेल. आरोग्य सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य मिळेल.संतती कडे लक्ष द्या.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. सौंदर्य, कला किंवा फॅशनशी संबंधित कामात लाभ होईल. मन प्रसन्न राहील.वास्तू संबंधित कामे रेंगाळतील.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
आज धाडसी निर्णय घ्याल. अडथळे दूर होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर वाद होऊ शकतात.
♐ धनु
मैत्रीणींनो आज मोठे खर्च होतील.
नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. प्रवासाचे योग आहेत. शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती होईल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुमचा प्रभाव वाढेल.मात्र क्रोध टाळा. मेहनतीचे फळ मिळेल. प्रतिष्ठा आणि यश दोन्ही मिळतील.लक्ष्मी प्राप्ती होईल.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. अचानक आर्थिक लाभ संभवतो.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
मन स्वास्थ्य चांगले राहील.विरोधकांवर विजय प्राप्त होईल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रेमात संयम ठेवल्यास नातं मजबूत होईल.