Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 17 फेब्रुवारी 2026. माघ अमावस्या, दर्श अमावस्या
आजचे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही,त्या मुळे वेध पाळण्याची गरज नाही

राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
आज अमावस्या वर्ज्य दिवस आहे”
आज जन्मलेल्या बाळाची रास मकर/सकाळी 9:06 मी नंतर कुंभ( परीघ योग, नाग /किंस्तुघन करण शांती)

17 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शनि आणि चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे.
तुम्हाला गुढविद्या ,हिप्नॉटिझम तत्सम गोष्टीबद्दल आकर्षण असते .तुम्ही धाडसी असून गर्विष्ठ असतात .तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. बुद्धिमान व हुशार आहात.काही वेळा अतिशय उदार स्वभावे असतो तर काही वेळा अतिशय कंजुषपणा दाखवितात. संशोधनात रस व ज्ञानाबद्दल आवड असते. वरचढपणा गाजवणे आवडते. तुम्ही उत्कृष्ट संघटक व विचारी आहात. तुमचे विचार विधायक व क्रियाशील असतात .शांतता प्रिय असून लोककल्याणाकरता प्रयत्न करता. जोरदारपणे प्रयत्न केल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही .स्वतःच्या कल्पनेतून व विचारातूनच तुम्हाला यश मिळते.
तुम्हाला शांतता व एकांत या गोष्टीची आवड असते, निसर्ग सौंदर्य फुले यामध्ये तुम्ही रमता. शनी ग्रह हा समतोल स्वभावाचा असल्यामुळे दोन्ही बाजूचा विचार करून तुम्ही निर्णय घेता. खिन्नता व निराशा अनेक वेळा जीवनात येते शास्त्रीय संगीताची आवड असते.कडक शिस्त ,पद्धतशिरपणा व काटेकोर वृत्ती असते. इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणे हुशार असतात फार उचला तुम्ही कागद ठेवता महत्त्वकांक्षा असून सतत कामात मग्न राहता .इष्ट गोष्ट प्राप्त करण्यासाठी श्रम घ्यायची तयारी असते .संशयखोर वृत्ती असून चिवटपणा असतो. तुम्ही कार्यक्षम कार्यक्षम व अधिकार गाजवणारे असतात. तुमच्याबद्दल काही वेळा गैरसमज निर्माण होतात .गरीब दुबळ्या लोकांबद्दल आपुलकी आदर दाखवतात .जन्मतःच उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून काम घेणे उत्तम जमते .सतत अडचणी, विलंब याचा जीवनात भरपूर अनुभव येतो .व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभतेने हाताळता. पैशाचे नियोजन काळजीपूर्वक केले जाते .जेव्हा इतरांना मदतीची गरज असेल तेव्हा ते तुमच्याकडे येतात, कारण तुम्ही इतरांच्या समस्या, दुःखे उत्तम तऱ्हेने समजू शकता. जीवनात आपण अधिकार गाजवावा अशी आसक्ती असते. कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असतात कौटुंबिक सुखाचा उपभोग घेता .नवरा व मुले यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करता. स्त्री सुलभ प्रेम किंवा मृदूपणा याचा काही प्रमाणात अभाव असतो. तुम्ही समाजप्रिय असता. खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेतलेले तुम्हाला आवडत नाही .चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते.

शुभ रंग:-हिरवा,जांभळा
शुभ दिवस:-सोमवार, बुधवार, गुरूवार
शुभ रत्न:-पुष्कराज, हिरा,लसण्या
(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

♈ मेष

मैत्रीणींनो आज
आज तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. आरोग्य सुधारेल, कामात वेग येईल. पतीकडून कौतुक होऊ शकते.

♉ वृषभ

मैत्रीणींनो आज
आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. घरात आनंदी वातावरण राहील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

♊ मिथुन

मैत्रीणींनो आज
आज संवाद कौशल्य चमकेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.
.
♋ कर्क

मैत्रीणींनो आज
मन सकारात्मक राहील. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थैर्य वाढेल.

♌ सिंह

मैत्रीणींनो आज
नेतृत्वगुण आज ठळक दिसतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल.

♍ कन्या

मैत्रीणींनो आज
कामात अचूकता आणि संयम दिसेल. आरोग्य उत्तम राहील. खर्च नियंत्रणात ठेवल्यास फायदा होईल.

♎ तुळ

मैत्रीणींनो आज
प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. कला, सौंदर्य, डिझाइनशी संबंधित कामात लाभ होईल. मन प्रसन्न राहील.

♏ वृश्चिक

मैत्रीणींनो आज
आज धैर्य वाढेल. अडचणींवर मात कराल. मात्र उतावळेपणा टाळा.

♐ धनु

मैत्रीणींनो आज
नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग आहेत. शिक्षण व करिअरमध्ये यश मिळेल.

♑ मकर

मैत्रीणींनो आज
सकाळपर्यंत जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल. मेहनतीचे फळ नक्की मिळेल.

♒ कुंभ

मैत्रीणींनो आज
९:०६ नंतर तुमच्यासाठी दिवस खास अनुकूल बनेल.आत्मविश्वास वाढेल. कल्पक विचार, नवीन योजना फायदेशीर ठरतील.

♓ मीन

मैत्रीणींनो आज सकाळीच महत्त्वाची कामे उरका.नंतर
आध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत राहील. प्रेमात समजूतदारपणा ठेवल्यास नाते दृढ होईल.

RELATED ARTICLES

Most Popular