Homeईपेपरबाबुराव आंबेगाव यांचा पराभव नसून विजय आहे.

बाबुराव आंबेगाव यांचा पराभव नसून विजय आहे.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर. दिनांक 16/2/2026 परवाच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती उमेदवार पुंडलिक जाधव जिल्हा परिषद उमेदवार सौ साधना बाबुराव आंबेगाव याने शिवसेने तर्फे निवडणूक लढवली. निवडणूक ही चुरशीची ठरली. बाबुराव आंबेगाव हे एक छोट्याशा सुमठाणा गावातील चळवतील कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आंबेगाव हे हमेशा चळवळीत काम करायचे त्यांनी गावात सरपंच म्हणून दहा वर्ष पारदर्शक कार्यकाल पार पाडला. परवाच एक महिन्या खाली शिवसेने मध्ये प्रवेश करून जिल्हा परिषद निवडणुक लढवली. अवघ्या एक महिन्याच्या आत प्रवेश घेऊन अचानक निवडणुकीला धनुष्यबाण घेऊन जाणे फार अवघड होते. तरीही त्यांच्या गोडस स्वभावामुळे त्यांच्या संपर्कमामुळे समोरील भारतीय जनता पार्टीचे नेते पंडित सूर्यवंशी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले होते. जिल्हा परिषद निवडणूक ही शंभर टक्के जिंकणार असे वातावरण तयार झाले होते. व जनता त्यांच्या पाठीशी उभी होती. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती .म्हणून बाबुराव आंबेगावे यांचा विजय शतप्रतिशत पक्का होता. परंतु विघ्न संतोषी म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री ब्रह्माजी केंद्रे याने बाबुराव आंबेगाव यांच्या वाटेमध्ये अडसर निर्माण केला. ब्रह्माजी केंद्रे हे जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाले होते. त्याचाच मनाशी राग धरून बाबुराव आंबेगावे यांचा करेक्ट कार्यक्रम केला. ब्रह्माजी केंद्रे हे केवळ आपल्या हट्टा पायी नावंदी. असो पिंपरी. असो देवुळवाडी. असो जेथे जेथे त्यांचा संपर्क अथवा कार्यकर्ते होते त्या त्या ठिकाणी बाबुराव आंबेगाव यांना मताधिक्य कसे कमी पडेल याची खबरदारी त्याने घेऊन बाबुराव आंबेगावे यांना केवळ 450 मताने पराजयास सामोरे जावे लागले. ब्रह्माजी केंद्रे सारखा सुजाण कार्यकर्ता या निवडणुकीत असे वागल्यामुळे नळगीर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वसामान्य जनता परेशान झाली आहे. बाबुराव आंबेगाव यांचा पराभव नसून विजय आहे. कारण अशा वातावरणामध्ये पाच हजार मते त्यांनी घेतली म्हणून ही निवडणूक जिंकली असे म्हणायला काही हरकत नाही असे कार्यकर्त्यातून जनतेतून सूर निघत आहे..

RELATED ARTICLES

Most Popular