ठाणे 15/2/2026 प्रतिनिधी “काया रा रक्षण, जीव रा जतन” हा संदेश जगाला देणारे थोर विचारवंत, मानवतावादी संत आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत ‘संत सेवालाल महाराज’ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
यावेळी शिवसेनेचे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, सोलापूर जिल्हाप्रमुख देवीदास चाळके, बालाजी पाटील खतगावकर, जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देवशेट्टे, सुभाष काटे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.