लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर
सोमवार, 17 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण त्रयोदशी
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
आज वृद्धी तिथी .
आज जन्मलेल्या बाळाची रास कन्या/दुपारी 3:35 नंतर तुळ
सोम प्रदोष, संत ज्ञानेश्वर महासमाधी उत्सव, आळंदी
17 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर शनि आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
तुम्ही उत्कृष्ट संघटक व विचारी एक आहात. उत्साह, जोम, प्रगती ही तुमची वैशिष्ट्ये आहे .तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर मानवी कल्याणासाठी करतात .तुमचे विचार विधायक असतात. गुढ विद्या, हिप्नॉटिझम इत्यादी गोष्टींचे आकर्षण वाटते तुम्ही मानवी व गर्विष्ठ आहात .काही वेळा उदार असतात तर काही वेळा कंजूषणा दाखवतात संशोधनात रस असतो व ज्ञानाची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. लुच्चेगिरी व खोटेपणा तुम्हाला आवडत नाही .जीवनातील रुढी व बंधने तोडण्याचे सतत प्रयत्न करतात .जोरदारपणे प्रयत्न करून केल्यास तुम्हाला कोणतेही गोष्ट अशक्य नसते. स्वतःच्या कल्पनेतून विचारातूनच तुम्हाला यश मिळते .शांतता व एकांत या गोष्टीची तुम्हाला आवड आहे .शास्त्रीय संगीताच्या आवड असते .शिस्त नियमितपणा ,टापटीप यांचे भोक्ते असतात .भविष्याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेणे तसेच काही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक विचार करणे ही तुमची वैशिष्ट्ये आहे. इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी,हुशार ,गंभीर असतात. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा पण अंमल असल्यामुळे धाडस ,तडफ, तत्परता दर्शविते .वागण्यात आक्रमकता असून ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद अथवा नाजूकपणा नसतो परंतु तुमच्या बोलण्याचा उद्देश नेहमी चांगला असतो. खेळाची आवड असते. तुम्ही शिस्तीचे भोक्ते ,निश्चयी, स्थिर, कर्तव्य तत्पर आहात .शनी ग्रहामुळे दोन्ही बाजूंच्या विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे असते. महत्त्वकांक्षी असून दीर्घोद्योगी असतात .हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते. तुम्ही कार्यशील कार्यक्षम असून अधिकार गाजवणाऱ्या आहात .तुमच्याबद्दल काही वेळा गैरसमज करून घेतले जातात .
तुम्ही समाजात वावरत असला तरी आपण एकटे आहोत याची सतत जाणीव असते गरिबांना मदत करतात .तुमचा स्वभाव तापट असतो ..मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तुम्ही तयार होतात .जीवनातील विविध क्षेत्रात योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा अधिकार व वचक,जोर तुमच्याकडे भरपूर आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनात सतत अडचणी विलंब याचा अनुभव येतो .इतर लोकांना ज्यावेळेस मदतीची जरूर भासते त्यावेळेस ते तुमच्याकडे येतात याचे कारण इतरांच्या समस्या दुःखे तुम्ही उत्तम तऱ्हेने समजू शकता जीवनात .आपण अधिकार गाजवावा याबद्दल तुम्हाला आसक्ती असते .आयुष्यात उशीर ,अडचणी हे आर्थिक बाबतीतही अनुभव अनुभवास येते. जन्मभर कष्ट करून त्या प्रमाणात आर्थिक आवक मात्र मर्यादित स्वरूपात असते. उशीर व कष्ट या दोन्हीचा अनुभव तुम्हाला येतो .
तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर आहात. कौटुंबिक सुखाचा उपभोग घेता. मुले व नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करता. कोणत्याही रूढीला बांधून घेतलेले तुम्हाला पसंत नसते. चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते .अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी उद्भवतात .आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. ज्यांच्यात ,उत्साह कार्यक्षमता, कल्पकता ,बुद्धिमत्ता नीतिमत्ता आहे अशांचे तुम्हाला आकर्षण वाटते.
शुभ दिवस:- बुधवार गुरुवार शनिवार
शुभ रंग:- गडद राखाडी ,निळा, काळा ,जांभळा
शुभ रत्न:- इंद्रनील ,काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज कामात तुमची पकड मजबूत राहील. वरिष्ठांकडून कौतुक. आर्थिक फायदे. दुपारनंतर नात्यांमध्ये सौहार्द.
♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
नवीन योजना यशस्वी. घरात आनंदाचे वातावरण. दुपारी महत्वाचे फोन/मीटिंग फायद्याचे ठरतील. मन शांत राहील.शैक्षणिक यश मिळेल.
♊ मिथुन
मैत्रीणींनो आज आर्थिक बाबतीत शुभ. प्रवासाचे योग. दुपारनंतर सामाजिक कार्यक्रमासाठी चांगला वेळ.
♋ कर्क
मैत्रीणींनो आज
कामातील ताण कमी होईल. पैशांबाबत चांगली बातमी. कुटुंबात समाधान. दुपारनंतर नवीन संधींचे संकेत.
♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद. पतीची साथ लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दुपारी नात्यांमध्ये सुधारणा.
♍ कन्या
मैत्रीणींनो आज
चन्द्र सकाळी तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढलेला. आरोग्यात सुधारणा. आर्थिक लाभ. दुपारी मन स्थिर.
♎ तुळ
मैत्रीणींनो आज
दुपारी ३:३५ नंतर चन्द्र तुमच्या राशीत — दिवसाचा दुसरा भाग अत्यंत शुभ. निर्णय फायदेशीर. नात्यांत आकर्षण वाढेल.
♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
व्यवसाय/नोकरीत चांगली प्रगती. पैशांच्या बाबतीत स्थैर्य. दुपारी मन शांत आणि आनंदी. नात्यांमध्ये सौम्यता.
♐ धनु
मैत्रीणींनो आज
महिलांना खास करून सन्मान किंवा प्रशंसा मिळण्याचा योग. नवे संपर्क फायद्याचे. आर्थिक प्रगती. दुपारी संतुलन वाढेल.
♑ मकर
मैत्रीणींनो आज
कामातील ताण कमी होईल. पतीकडून मदत. दुपारी महत्वाचा निर्णय लाभदायक ठरेल. कुटुंबात आनंद.
♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
प्रवास, सहकार्य आणि संवादासाठी चांगला दिवस. दुपारनंतर मन प्रसन्न. कामात गती. नात्यांत आकर्षण.
♓ मीन
मैत्रीणींनो आज
तुम्हाला आज विशेष लाभ होतील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. दुपारनंतर घर, सौंदर्य व संतुलनाकडे लक्ष.