Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं बुधवार, 12 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण अष्टमी

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज चांगला दिवस.कालाष्टमी, कालभैरव जयंती
आज जन्मलेल्या बाळाची रास कर्क/संध्याकाळी 6:36 नंतर सिंह

12 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा सुखासिन जीवनाकडे ओढा असून विरुद्ध लिंगी व्यक्ती तुम्हाला प्रिय असते. इतरांचे बारीक-सारीक दोष तुम्ही सहजरीत्या काढू शकता. अधिकार प्रतिष्ठा तुम्हाला आपोआपच मिळते. दिमाख, हुशारकी ,पोकळ अभिमान हे तुमचे वैशिष्ट्य आहे .तुम्ही दुसऱ्यासाठी स्वार्थ त्याग करता परंतु त्याच्या कारस्थानाला बळी पडता. तुम्हाला उपजत ज्ञान असून पुढे घडणाऱ्या घटनांची जाणीव होते.तुम्हाला फाजील महत्त्वाकांक्षा असते. संवेदनाशील असल्यामुळे स्वभावामध्ये आणि कर्तुत्वात विरोधाभास जाणवतो. काही वेळा एका एकांतात राहता अशा वेळी तुमच्या वागण्यामागील गुढ इतरांना अवाक करते.
तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आयुष्यात पुढे देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. स्वतःच्या ज्ञानाविषयी आत्मविश्वासाबरोबरच गर्विष्ठपणाही असतो. धर्माविषयी ओढ असते पण कर्मकांडावर विश्वास नसतो. योग्य व्यक्तीला मदत करायला आवडते . न्यायाची आवड व शुद्ध प्रेम ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .दुसऱ्याच्या भल्यासाठी तुम्ही कष्ट उपसता ,अडचणीत आलेल्यांना सहानुभूती दाखवता. तुम्ही उत्साही आहात, परंतु राग येत असून दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणारे आहात. कोणत्याही उद्योगधंद्याचे संचालन तुम्ही उत्तम तर्हेने करू शकता. तुम्ही स्वतंत्र बाण्याचे असून तुमच्यावर सोपवलेले काम उत्तम तऱ्हेने करता .तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडत नाही .तुम्ही तुमचे डोके शांत ठेवल्यास कोणतेही गोष्ट मिळवणे तुम्हाला शक्य होते. तुमचा उद्धटपणा व हट्टीपणा हे तुमचे शत्रू असून त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडचणी निर्माण होतात .तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते .तुमच्यात दिमाख असून टापटीप व व्यवस्थितपणा काटेकोरपणे पाळता. स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात. तुमच्या बोलण्यात मोकळेपणा आहे. उत्तम संभाषण तुम्ही करू शकता अनेक खेळांची आवड असते. विशाल दृष्टिकोन असून विनोद बुद्धी चांगली असते. पैशाने जेवढी सुखी उपभोक्ता येतील त्या सर्वांचा आनंद लुटता.आर्थिक बाबतीत सुखी असून जीवन आरामदायक कसे जाईल याकडे लक्ष असते. तुमची इच्छा शक्ती तीव्र असून बुद्धी तल्लख असते. तुमचा स्वभाव हरहुन्नरी असतो. तुम्ही प्रेमळ व निष्ठावान आहात. लहरी स्वभाव असून मनाने हळव्या आहात .आपल्या पतीला एक सर्व प्रकारे योग्य ती साथ देण्यात तुम्ही वाकबगार असतात .उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता.

शुभ रंग:- अंजिरी, पिवळा जांभळा.

शुभ दिवस:- शुक्रवार, गुरुवार मंगळवार .

शुभ रत्ने:- पुष्कराज, अमेथिस्ट,लसण्या.(रत्न वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज चतुर्थ आणि पंचम स्थानी चन्द्र आहे .उत्साह वाढेल. कामाच्या ठिकाणी संवाद साधताना शांतता ठेवा. हट्टी पणाने निर्णय नको. पतीशी वाद टाळा.

वृषभ:- मैत्रीणींनो आज घरातल्या महिलांच्या सोबतीने मस्त दिवस व्यतित कराल. आर्थिक दृष्टीने चांगला.आरोग्य सांभाळा. छोटे प्रवास घडतील.

मिथुन:- मैत्रीणींनो आज बुद्धीमत्ता वापरून कामे कराल.कामाचा तणाव राहील.चर्चेत तुमच्या शब्दास किंमत असेल.

कर्क:-मैत्रीणींनो आज स्वतःच्या साठी वेळ काढाल. पतीकडून अपेक्षित साथ मिळणार नाही.घरगुती जबाबदारी वाढेल.खट्टू होउ नका.

सिंह:- मैत्रिणींनो आज सकाळ च्या सत्रात महत्त्वाची कामे,प्रवास पुढे ढकला.संध्याकाळी कामे सुकर होतील. आत्मविश्वास वाढेल.कामाचे कौतुक होईल.

कन्या:- मैत्रीणींनो आज आर्थिक लाभ होतील.व्यवसाय वाढेल.सोशल मीडियावर कौतुक होईल.मनातल्या इच्छा पूर्ण होतील.आवडत्या मित्रमैत्रिणींशी भेट घडेल.संध्याकाळ विश्रांती ची.

तुळ:-मैत्रीणींनो आज नात्यात सुसंवाद साधा.केलेल्या कष्टाचे चीज होईल.स्वप्न पुर्ती होईल.मानसन्मान मिळेल.फॅशन,कलाकारांना यश.गोड बोलण्याने लाभ होतील.

वृश्चिक:- मैत्रीणींनो आज भाग्यवर्धक घटना घडतील.संध्याकाळ तणावाची.आवडत्या संगीत किंवा छंदाचा आनंद मन उत्साहि ठेवेल.राग टाळा.सासुरवाडी च्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.

धनु:-मैत्रीणींनो आज गुपित उघड करू नका.गूढ विषयांकडे ओढा राहील.अचानक अडचणी येऊ शकतात. संध्याकाळ आनंदी.

मकर:- मैत्रीणींनो आज मेहनत वाढेल.वरीष्ठ कौतुक करतील.जोडीदारासोबत मस्त खरेदी, शॉपिंग ला जाल.

कुंभ:- मैत्रीणींनो आज कल्पनाशक्ती ने हातून लेखन होईल.सोशल मीडियावर तुमच्या टिप्पणी चे कौतुक होईल.प्रकृती ची काळजी घ्या.हितशत्रुं वर लक्ष ठेवा.एखाद्या मैत्रिणीचा विचित्र अनुभव येऊ शकतो.

मीन:- मैत्रीणींनो आज खेळाडू ना यशदायक काळ .संतती कडून खूष खबर मिळेल.नोकरी इच्छुकांना चांगली बातमी मिळे

RELATED ARTICLES

Most Popular