Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण नवमी

राहू काळ – दुपारी 1:30 ते 3

आज चांगला दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास सिंह

13 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर हर्षल आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
तुमच्या जीवनात अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्ही बुद्धिमान असून उंच पुरे व दिसायला छान असता. दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्यांच्या अडचणींचा विचार करणे तुम्हाला आवडते. शास्त्रीय पुस्तकांची आवड असते .जीवनात जे काय मिळवायचे असेल ते शांतपणे व गाजावाजा न करता मिळावे. असे तुम्हाला वाटते मोठ्या उद्याच्या जागा व पैसा मिळतो. वयाच्या 31 वर्षापासून खरे आयुष्य सुरू होते. तुमच्या योजनांमध्ये बरेच बदल होतात. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव झाल्यास अशक्य असे काहीच नाही .स्वतंत्र विचार व आत्मविश्वास या गोष्टींमुळे प्रत्येक गोष्ट आपल्या हातात ठेवण्याची वृत्ती असते. इतर लोकांना तुमच्या सहवासात आनंद झालेला पाहून तुम्हाला मानसिक समाधान मिळते. तुमच्या योजना काळजीपूर्वक आता काटेकोरपणे आखल्या असल्याने शेवटी यश मिळते. हुशार बुद्धिमान वर्तुळातच वावरणे तुम्हाला आवडते. स्वतःच्या अति आक्रमक व्यक्तीला आळा घालून घातल्यास जीवन सुखदायी होते. आयुष्यात बरेच चढ -उतार येतात. अनेक अनपेक्षित व विलक्षण गोष्टींचा अनुभव येतो. कर्तुत्व असूनही विलक्षण घटना घडतात. तुम्ही तुमच्या व्यवसायात तसेच मैत्र परिवारात सतत बदल करतात. त्यामुळे अस्थिरता व अस्वस्थता निर्माण होते. तुम्ही उत्साही आणि प्रगतिशील आहात. तुमच्या मनाची पातळी खूप वरच्या दर्जाची असते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. जुन्या परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रामाणिक असते. तुमचा स्वभाव परखड असून इतरांचे विचार तुम्हाला सहजासहजी पटत नाहीत. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक दुखावले जातात. तुमच्या कामात कोणाची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास आयुष्यात तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही निर्भय असून कोणत्याही धोक्यास तोंड देण्याची तुमची तयारी असते. आयुष्यात सतत बदल हवा असतो त्यामुळे मनातून तुम्ही अवस्थ असतात. कौटुंबिक वादांपासून आणि नातेवाईकांपासून कधीकधी त्रास होऊ शकतो. आयुष्यात अनेक अडचणी विलंब असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .तुम्ही खर्चिक वृत्तीने असून घरामध्ये सर्व सुविधा ठेवण्याकडे प्रवृत्ती असते .पैशाने जेवढी सुखी उपभोक्ता येतील त्या सर्वांचा आनंद तुम्ही लुटता. वयाच्या चाळीस वर्षानंतर आर्थिक स्थैर्य लाभते .तुम्ही तल्लख व आकर्षक आहात .तीव्र इच्छाशक्ती असून नीट नेटकेपणा व उत्तम कपड्यांचे शौकीन आहात. महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होऊ शकता. आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. घरातली सजावट उत्तम रीतीने करतात .बऱ्याच वेळा स्वतःचा वरचढपणा दाखवण्याची लहर येते. काही वेळा आपल्या चमत्कारिक स्वभावामुळे तुमच्या सबंध दिवस खराब जातो .तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे पण ओढ नाही .बऱ्याच वेळा तुम्ही अस्वस्थ असतात.त्या वेळी तुम्ही 1 किंवा 2 भाग्यांक असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यास लाभ होतो.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा आणि गुलाबी,करडा

शुभ रत्न:- हिरा ,,मोती आणि पोवळे.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष महिला
मैत्रीणींनो आज
प्रेमसंबंधात उत्कटता, पण थोडा अहंकार टाळा. मुलांच्या बाबतीत अभिमान वाटेल. नवीन सृजनात्मक कल्पनांना वाव द्या.

♉ वृषभ महिला
मैत्रीणींनो आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. सजावट, स्वयंपाक, घरसौंदर्य याकडे ओढा. आईशी भावनिक जवळीक वाढेल.

♊ मिथुन महिला
मैत्रीणींनो आज
संवाद कौशल्य वाढेल. सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रशंसा मिळेल. प्रवासाचा योग शुभ.

♋ कर्क महिला
मैत्रीणींनो आज
घरात आनंदाचे वातावरण. आर्थिक स्थिती सुधारेल. अलंकार, वस्त्र किंवा सौंदर्यवर्धनात रस वाढेल.

♌ सिंह महिला
मैत्रीणींनो आज
चन्द्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व तेजस्वी दिसेल. नवीन प्रस्ताव, नातेसंबंध किंवा कामात नाव मिळू शकते.स्वतःसाठी खर्च कराल.

♍ कन्या महिला
मैत्रीणींनो आज
शारीरिक थकवा, पण मानसिक उर्जा चांगली राहील.आर्थिक लाभ होतील. स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, सौंदर्यसाधना फायदेशीर ठरेल.

♎ तुळ महिला
मैत्रीणींनो आज
मित्रमैत्रिणींच्या सहवासातून आनंद. नवे संपर्क लाभदायक ठरतील. आर्थिक फायदा व आनंददायी प्रसंग संभवतो.

♏ वृश्चिक महिला
मैत्रीणींनो आज
कामकाजात चमकदार यश. वरिष्ठांकडून प्रशंसा. घर व करिअर दोन्ही समतोल ठेवता येतील.

♐ धनु महिला
मैत्रीणींनो आज
नवीन अनुभव, प्रवास किंवा अध्यात्मात रस वाढेल. नात्यांमध्ये खुली चर्चा होईल. आनंदी ऊर्जा लाभेल.

♑ मकर महिला
मैत्रीणींनो आज
भावनिक अस्वस्थता संभवते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. गुप्त चिंता उघड होऊ शकतात — शांतता राखा.

♒ कुंभ महिला
मैत्रीणींनो आज
जोडीदाराशी प्रेमळ संवाद वाढेल. नवीन ओळखी लाभदायक. मित्रमैत्रिणींकडून प्रेरणा मिळेल.

♓ मीन महिला
मैत्रीणींनो आज
कामात चिकाटी ठेवा — यश मिळेल. आरोग्य सुधारेल. सौंदर्य, आरोग्य किंवा फिटनेसकडे लक्ष केंद्रित करा.

RELATED ARTICLES

Most Popular