Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

शनिवार, 8 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण तृतीया/चतुर्थी

राहू काळ – सकाळी 9 ते 10:30

आज क्षय तिथी .
आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ/सकाळी 11:14 नंतर मिथुन
(विष्टि करण शांती)
संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय नासिक:-रात्रौ 8:34
पुणे:-8:38
मुंबई:-8:41

8 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर शनि आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
शांतता व एकांत या गोष्टीची तुम्हाला आवड आहे .शास्त्रीय संगीताच्या आवड असते .शिस्त नियमितपणा ,टापटीप यांचे भोक्ते असतात .भविष्याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेणे तसेच काही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक विचार करणे ही तुमची वैशिष्ट्ये आहे. इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी,हुशार ,गंभीर असतात. तुमच्यावर मंगळ ग्रहाचा पण अंमल असल्यामुळे धाडस ,तडफ, तत्परता दर्शविते .वागण्यात आक्रमकता असून ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. तुमच्या बोलण्यात युक्तिवाद अथवा नाजूकपणा नसतो परंतु तुमच्या बोलण्याचा उद्देश नेहमी चांगला असतो. खेळाची आवड असते. तुम्ही शिस्तीचे भोक्ते ,निश्चयी, स्थिर, कर्तव्य तत्पर आहात .शनी ग्रहामुळे दोन्ही बाजूंच्या विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे असते. महत्त्वकांक्षी असून दीर्घोद्योगी असतात .हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते. तुम्ही कार्यशील कार्यक्षम असून अधिकार गाजवणाऱ्या आहात .तुमच्याबद्दल काही वेळा गैरसमज करून घेतले जातात .
तुम्ही समाजात वावरत असला तरी आपण एकटे आहोत याची सतत जाणीव असते गरिबांना मदत करतात .तुमचा स्वभाव तापट असतो ..मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तुम्ही तयार होतात .जीवनातील विविध क्षेत्रात योग्य तऱ्हेने व्यवस्थापन करण्यासाठी लागणारा अधिकार व वचक,जोर तुमच्याकडे भरपूर आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनात सतत अडचणी विलंब याचा अनुभव येतो .इतर लोकांना ज्यावेळेस मदतीची जरूर भासते त्यावेळेस ते तुमच्याकडे येतात याचे कारण इतरांच्या समस्या दुःखे तुम्ही उत्तम तऱ्हेने समजू शकता जीवनात .आपण अधिकार गाजवावा याबद्दल तुम्हाला आसक्ती असते .आयुष्यात उशीर ,अडचणी हे आर्थिक बाबतीतही अनुभव अनुभवास येते. जन्मभर कष्ट करून त्या प्रमाणात आर्थिक आवक मात्र मर्यादित स्वरूपात असते. उशीर व कष्ट या दोन्हीचा अनुभव तुम्हाला येतो .
तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर आहात. कौटुंबिक सुखाचा उपभोग घेता. मुले व नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करता. कोणत्याही रूढीला बांधून घेतलेले तुम्हाला पसंत नसते. चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते .अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी उद्भवतात .आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करतात. ज्यांच्यात ,उत्साह कार्यक्षमता, कल्पकता ,बुद्धिमत्ता नीतिमत्ता आहे अशांचे तुम्हाला आकर्षण वाटते.

शुभ दिवस:- बुधवार गुरुवार शनिवार

शुभ रंग:- गडद राखाडी ,निळा, काळा ,जांभळा

शुभ रत्न:- इंद्रनील ,काळा मोती किंवा काळा हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

♈ मेष
मैत्रीणींनो आज
आज प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी योग्य दिवस. सौंदर्य, मेकअप, वेशभूषा यामध्ये नवे प्रयोग करा. घरातील वातावरण आनंदी राहील.

♉ वृषभ
मैत्रीणींनो आज
आपला आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. घरातील स्त्रियांशी संवाद गोड ठेवा. थोडा विश्रांतीचा वेळ घ्या.

♊ मिथुन
मैत्रीणींनो आज
मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीशी छान गप्पा होतील. कलात्मकतेचा वापर करून आज काहीतरी नवीन साकाराल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

♋ कर्क
मैत्रीणींनो आज
घर-संसाराकडे लक्ष जाईल. नात्यात जिव्हाळा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. अन्न हलके व पौष्टिक घ्या.

♌ सिंह
मैत्रीणींनो आज
आज तुमच्या उपस्थितीने सर्वांना आनंद मिळेल. प्रेमसंबंधात उत्साह. कामात कौतुक मिळण्याचा योग. सौंदर्यविषयक खरेदी शुभ.

♍ कन्या
मैत्रीणींनो आज
गृहकार्य आणि नोकरी दोन्ही सांभाळताना थोडा थकवा येईल, पण तुमची जबाबदारीची भावना कौतुकास्पद ठरेल. आर्थिक स्थैर्य राखा.

♎ तुळ
मैत्रीणींनो आज
तुमचं आकर्षक व्यक्तिमत्त्व सर्वांना भुरळ घालेल. फॅशन, कपडे, सजावट याबाबत नवे निर्णय घ्या. जोडीदाराशी जिव्हाळ्याचा संवाद साधा.

♏ वृश्चिक
मैत्रीणींनो आज
भावनिक चढउतार जाणवतील. स्वतःला थोडा वेळ द्या. ध्यान, संगीत, वाचन यात शांतता मिळेल. वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा.

♐ धनु
मैत्रीणींनो आज
मैत्रिणींसोबत वेळ घालवा. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. नवीन कल्पना सुचतील. परंतु, घरगुती जबाबदाऱ्या विसरू नका.

♑ मकर
मैत्रीणींनो आज
कार्यस्थळी आदर आणि मान्यता मिळेल. गृहस्थजीवनात स्थैर्य. आरोग्याबाबत काळजी घ्या. आत्मविश्वासाने काम करा.

♒ कुंभ
मैत्रीणींनो आज
प्रवास, शिक्षण, संवाद या गोष्टीत प्रगती. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. नवीन विचारांनी आज प्रेरणा मिळेल.

♓ मीन
मैत्रीणींनो आज
भावनांना वाव द्या पण निर्णय शहाणपणाने घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. सौंदर्यविषयक किंवा अध्यात्मिक कार्यात आनंद मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular