Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025. कार्तिक कृष्ण द्वितीया

राहू काळ – सकाळी 10:30 ते 12

आज शुभ दिवस.
आज जन्मलेल्या बाळाची रास वृषभ
(परीघयोग शांती)

7 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

तुमच्यावर नेपच्यून आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे.
एक धर्माविषयी,तत्वज्ञान विषयी चमत्कारिक कल्पना असतात. ठराविक चाकोरीतून जाणे आवडत नाही .नेपच्यून ग्रह गुढ तत्वांचा असल्याने उच्च कोटीचा अहंकार वैयक्तिकरित्या जोपासला जातो .तुमची वागणूक बऱ्याच वेळा गुढ असते . प्रतिकूल परिस्थितीत तोंड देण्याची कुवत तुमच्याकडे आहे .तुमचे व्यक्तिमत्व मूलतः स्वतंत्र आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने प्रतिकार धाडस ,तडफदरपणा हे गुण तुमच्यात आहेत .तुम्हाला दूरच्या प्रदेशाची आवड असून काही ना काही निमित्ताने परदेशाचे संबंध येतो .पैसा मिळवण्याची कला तुमच्याकडे आहे. तुम्ही फक्त चांगल्याच गोष्टींची निवड करतात. भावनाप्रधान असून मूळ भावना लपवण्याकडे कल असतो. सर्वसामान्य माणसांमध्ये रमत नाही .मित्रांबद्दल आदर असून वेळप्रसंगी त्यांच्या बाजूने लढण्यास तयार असतात. सल्ला विचारल्यास तुम्ही खात्रीने अधिकारपूर्वक, खंबीरपणे देता. साशंक वृत्तीच्या असून स्वतःची खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. महत्त्वाकांक्षा व उत्साह चांगला असून चिकाटी ही चांगली असते .मोकळ्या मनाचे असतात . आपल्यावर अनाठायी निर्बंध पडत आहे असे वाटल्यास तुमच्यात बंड करण्याची वृत्ती उफाळून येते. बोलण्यात व वागण्यात फरक जाणवतो. तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते. आयुष्यात वारंवार बदल होत असल्यामुळे बचत करणे कठीण जाते , इतके असूनही पैशाच्या बाबतीत समाधानी असतात .तुमच्याकडे अमाप पैसा नसेल परंतु श्रीमंतीचा
दौल ठेवणे इतका पैसा मिळतो .स्वभाव उधळा असून घरामध्ये सर्व सुख सोयी करणे ठेवण्याकडे असतो. आवडीची नोकरी मिळाल्यास जीवनात चांगला पैसा मिळवून स्थिरता प्राप्त होते. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडता. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे प्रिय असते. तुमच्या स्वभाव हरहुन्नरी असून कोणत्याही एका गोष्टीत खोलवर अभ्यास करत नाही. नीटनेटकेपणा ,चांगल्या कपड्यांचे शौकीन, घरातील सजावट याकडे जास्त लक्ष पुरवता.तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते. ज्यांच्यात स्वतंत्र बाणा ,बुद्धिमत्ता ,कृतिशीलता हरहुन्नरी पण आहे असे लोक तुम्हाला प्रिय असतात.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार बुधवार ,गुरुवार

शुभ रंग:- पांढरा ,हिरवा पिवळसर

शुभ रत्न:- पुष्कराज ,पाचू मोती, लसण्या
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज बोलण्यात संयम ठेवा,गैरसमज टाळा.पतीशी संवाद जपावा.आर्थिक लाभ होतील.

वृषभ:- मैत्रीणींनो आज चन्द्र तुमच्याच राशीत आहे.आत्मविश्वास वाढेल.महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला काळ. कौटुंबिक सहकार्य मिळेल.

मिथुन:- मैत्रीणींनो आज मन चंचल राहील.अनपेक्षित खर्च होऊ शकतो. मैत्रीणी चा सल्ला घ्या पण निर्णय स्वतःच घ्या.आरोग्य सांभाळा.

कर्क:-मैत्रीणींनो आज प्रतिष्ठा वाढेल.नवीन ओळखी लाभदायक ठरतील.संध्याकाळ आनंदाची.

सिंह:- मैत्रिणींनो आज मेहनतीचे फळ मिळेल.पतीकडून कौतुक होईल.संवाद साधताना सावधगिरी बाळगा.अपत्य सुख लाभेल.

कन्या:- मैत्रीणींनो आज कामात एकाग्रतेचा अभाव राहू शकतो.धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.गृहसौख्य लाभेल.

तुळ:-मैत्रीणींनो आज कौटुंबिक प्रश्नांवर शांतपणे चर्चा करा.पैशांची देवघेव करताना काळजीपूर्वक करा.प्रवासात त्रास होऊ शकतो.

वृश्चिक:- मैत्रीणींनो आज जोडीदाराशी संवाद वाढवा.मनातल्या चिंता दूर होतील.नवीन संधी चालून येतील.नोकरीत स्थीरता वाढेल.

धनु:-मैत्रीणींनो आज कामाचा तणाव राहील.आरोग्य सुधारेल.आत्मविश्वास वाढेल.संध्याकाळ आरामाची.

मकर:- मैत्रीणींनो आज संतान सौख्य लाभेल.प्रेमात यश.कलात्मक कामात प्रगती.सर्जनशील ता वाढेल.घाई घाईत निर्णय नको.

कुंभ:- मैत्रीणींनो आज घरगूती विषयावर लक्ष केंद्रित होईल.मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला दिवस.प्राणायाम, ध्यान करा.

मीन:- मैत्रीणींनो आज मन द्विधा राहील.नात्यात वाद टाळा.लेखन,माध्यम क्षेत्रात यश.कल्पक विचार कराल

RELATED ARTICLES

Most Popular