Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वारं

बुधवार, 8 ऑक्टोबर 2025. अश्विन कृष्ण द्वितीया

राहू काळ – दुपारी 12 ते 1:30

आज शुभ दिवस.घबाड 2:21 पर्यंत
आज जन्मलेल्या बाळाची रास मेष.

8 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेणे तुम्हाला पसंत नसते. समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:-मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.हितशत्रूं चा त्रास जाणवेल.प्रवासात त्रास होऊ शकतो. पतीची साथ मिळेल.कोर्ट कामकाजात यश मिळणार नाही.

वृषभ:- मैत्रिणींनो आज व्यय स्थानी चन्द्र आहे.आर्थिक लाभ होतील.मौजमजा कराल.वाहन जपून चालवा.एखादी टिप्पणी अंगाशी येऊ शकते.

मिथुन:-मैत्रिणींनो आज लाभस्थानी चन्द्र आहे.घरगूती कुरबुरी संभवतात. निर्णय चुकीचे घेऊ शकतात.मित्रमंडळी च्या मदतीचा फायदा होईल. खाण्याची पथ्ये पाळा.

कर्क:-मैत्रिणींनो आज धनलाभ होईल.प्रगती होइल. मन अस्वस्थ असेल.वास्तू विषयक कामे होतील.पाळीव प्राण्यांच्या बाबतीत कनवाळू पणा दिसून येईल.

सिंह:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.धडाडीने वागाल.बढती, बदली चे योग. दागिने खरेदी ची शक्यता. खर्च होईल.

कन्या:- मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.प्रतिकूल दिवस.कटू बोलण्याने शत्रू वाढू शकतात. मत्सर वाटेल.पैशाची देवघेव करताना सावध रहा.

तुळ:-मैत्रिणींनो आज सप्तमात चन्द्र आहे.जखडून ठेवल्यासारखं वाटेल.विनाकारण कटकटी होऊ शकतात. पतीची नाराजी होऊ शकते. पित्ताचा त्रास जाणवेल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज नवीन खरेदी होईल.आर्थिक लाभ होईल.पतीशी मतभेद होऊ शकतात. मैत्र मंडळींशी भांडण होऊ शकते.

धनु:-मैत्रिणींनो आज धनलाभ होईल. नवीन वाहन खरेदी चे योग. सर्व कामात यश.भरभराट होईल.

मकर:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.आरोग्य सांभाळा. प्रवासात लाभ होईल.कामात प्रयत्न कमी पडू नका.

कुंभ:- मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने उत्तम .पदभ्रष्ट होऊ शकतात. कामात अडचणी येऊ शकतात. कंटाळवाणे कामे करावी लागू शकतात.

मीन:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. मुत्सद्दी पणा ने कामे करवून घ्याल.वाहन काळजीपूर्वक चालवा.

RELATED ARTICLES

Most Popular