लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 8/10/2025 गुजरात बॉर्डर वर वाढवण बंदर निर्माण करून खऱ्या अर्थाने मुंबई येथे असलेल्या जेएनपीटी बंदर ला बंद पाडून महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात बॉर्डर वरील जमिनीवर मोठ्या प्रमाणात – १)वेअर हाऊस, २) उद्योग धंदे ,३) हॉटेल ४) इंडस्ट्री असे अनेक व्यवसाय संप्पन करून गुजरात चां विकास साधण्यासाठी हा छुपा अजेंडा आहे.
आत्तातरी गुजरात बॉर्डर वर चवथी मुंबई तयार करण्यात येणार असे आपलेच मुख्यमंत्री मा देवभाऊ नवी मुंबई एअरपोर्टवर अशवासित करत आहेत
याचाच अर्थ असा आहे की, आज देशात आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे उद्योग व्यवसाय गुजरात बॉर्डर वरील जमिनीवर सहज नेऊन ठेवायचे आणि गुजरात हे राज्य विकासात आर्थिक व्यवहार त्यांचा देशात एक नंबर वाढवायचा आणि हि मुंबई महाराष्ट्र उद्योग व्यवसाय पासून खिळखिळा करून टाकायचा प्रयत्न हे गुजरात चे व्यापारी तत्त्वावर सुरू असलेले सरकार मधील नेते आर्थिक राजधानी यापुढे गुजरात करण्याचा हा मिश्किल डाव साधला जात आहे त्याचेच कारण > १)मुंबई गुजरात बुलेट ट्रेन आहे .
२) वाढवण बंदर आहे .
आता तरी ३) चवथी मुंबई तयार < आपलेच राजकारणी सत्तेसाठी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब लाडके देवाभाऊ गुजरात च्य्या इशाऱ्यावर काम करणार असतील तर या राजकारण करणाऱ्या धोकेबाज सरकारला महाराष्ट्र राज्य वाचवायचे असेल तर यांना धडा शिकवा हि महाराष्ट्र राज्यातील जनतेनी गुजरातपासून महाराष्ट्र राज्य वाचवा हे आंदोलन उभा करण्याची खरी गरज आली आहे .
देशातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र वाचवा उठा जागे व्हा आपला महाराष्ट्र वाचवा …!!!
सुधाकर भालेराव माजी आमदार उदगीर जिल्हा लातूर
प्रवक्ते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)